सांगली : भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांचा भाऊ ब्रम्हानंद पडळकर यांच्यासह 100 जणांविरोधात पोलीसांत गुन्हा दाखल झाला आहे. बेकायदेशीर जागेचा ताबा घेण्यासाठी सांगलीच्या मिरजमध्ये शुक्रवारी (ता. 6) रात्री जेसीबीच्या सहाय्याने दुकाने आणि हॉटेल पाडण्यात आले. Case registered against 100 people including MLA Gopichand Padalkar’s brother Sangli Miraj या ठिकाणी दोन हॉटेल, एक मेडिकल स्टोर, ट्रॅव्हल, ऑफिस, एक घर, पान शॉप मिळकती पाडण्यात आल्या आहेत. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
गोपीचंद पडळकर यांनी या प्रकरणी बोलताना, हॉटेल पाडण्यात आलेली जागेचा मुळ मालक हे ब्रह्मानंद पडळकर असल्याचे त्यांनी म्हटलं आहे. येथील ५१ गुंट्याचा प्लॉट हा त्यांच्या नावे आहे. त्यावर हे अतिक्रमण झालं होतं. ते काढण्यासाठी माहापालिकेकडून वारंवार या हॉटेल धारकांना सांगण्यात आलं होतं. जागा मालकीवरून हा प्रकार घडला असून या प्रकरणी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांचे बंधू जिल्हा परिषदेचे माजी सभापती ब्रम्हानंद पडळकर यांच्यासह १५० जणाविरूध्द शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महापालिकेकडून मालक ब्रह्मानंद पडळकरांना २४ तासाच्या आत अतिक्रम काढून घेण्यासंदर्भात सुचना मिळाल्या होत्या. त्याप्रमाणेच ते अतिक्रमण आम्ही काढून घेतल्याचं पडळकर म्हणाले. याबाबत विशाल सन्मुख यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पडळकर यांनी शंभर ते दीडशे लोकांचा जमाव हातात, लाठ्या, काठ्या, लोखंंडी सळई यासारखे घातक हत्यारे घेउन आला. दंगा करीत जेसीबीच्या मदतीने दुकाने पाडली.
यावेळी प्रतिकार करण्याच्या प्रयत्नात असताना मोहमंद लियाकत सय्यद हा जखमी झाला आहे. दुकाने पाडल्यानंतर हा जमाव यामागील झोपड्या घरे पाडण्यासाठी चाल करून आला. मात्र, महिला व पुरूषांनी जोरदार दगडफेक केली. यामध्ये पडळकर यांच्या मोटार कार वाहनाच्या काचा फुटल्या.
Case registered against 100 people including MLA Gopichand Padalkar’s brother Sangli Miraj
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
मिरज शहरात शुक्रवारी (ता. ६) मध्यरात्री दुकाने आणि हॉटेल जेसीबीच्या साह्याने पाडण्यात आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. रात्रीच्या अंधारात ही कारवाई करण्यात आली आहे. ब्रह्मानंद पडळकर यांनी बेकायदेशीरपने जागेचा ताबा घेण्याच्या उद्देशाने सात मिळकती पाडल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
दोन हॉटेल, एक मेडिकल स्टोर, ट्रॅव्हल, ऑफिस, एक घर, पान शॉप अश्या सात मिळकती पाडण्यात आल्या आहेत. दरम्यान, नागरिकांनी गर्दी केल्यामुळे घटनास्थळी मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. नागरिकांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. ब्रह्मानंद पडळकर हे आमदार गोपीचंद पडळकर यांचे बंधू आहेत. त्यामुळे या प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे. गावात तणावाचे वातावरण असून पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
जागा मिळविण्यासाठी कायदेशीर मार्ग उपलब्ध असताना रात्रीच्यावेळी गुंडगिरी करून जागा खाली करण्याचा हा प्रकार निषेधार्ह असून याची नैतिक जबाबदारी स्वीकारून आ. गोपीचंद पडळकर यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी एमआयएमचे जिल्हाध्यक्ष डॉ. महेशकुमार कांबळे यांनी केली आहे. तसेच या बेकायदा प्रकाराबाबत पालकमंत्री सुरेश खाडे यांनीही आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.