सोलापूर : सोलापुरातील पोलीस हेडकॉटर येथे गेल्या पाच दिवसापासून पोलीस भरती प्रक्रिया सुरू आहे. २० जानेवारीपर्यंत टप्प्या टप्प्याने ही भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. Solapur | Out of 900 candidates in police recruitment process field test, 187 out of 49 ineligible दरम्यान दि. ६ जानेवारी रोजी शहर पोलीस आयुक्तालयाने ९०० उमेदवारांना शारीरिक चाचणीसाठी बोलवण्यात आले होते. त्यातील ४९ उमेदवार शारीरिक चाचणीसाठी अपात्र ठरविण्यात आल्याची माहितीप्रशासनाकडून सांगण्यात आली.
या मैदानी चाचणी करता दि. ६ जानेवारी करिता ९०० उमेदवारांना बोलावले पैकी ७१३ उमेदवार उपस्थित होते तर १८७ उमेदवारांनी शारीरिक चाचणीस दांडी मारली. ६६४ उमेदवार हे शारीरिक चाचणीस पात्र ठरले. शहर व ग्रामीण पोलिस दलाअंतर्गत चालकांची १०१ तर पोलिस शिपायांची १२४ पदे भरली जाणार आहेत. ग्रामीण पोलिसांनी २ ते १० जानेवारीपर्यंत मैदानी परीक्षा घेण्याचे नियोजन केले आहे.
८ जानेवारीला (रविवारी) एक दिवस सुटी दिली आहे. ग्रामीण पोलिसांकडे २८ चालक पदांसाठी १ हजार ४२२ तर २६ पोलिस शिपाई पदांसाठी १ हजार ४५१ उमेदवारांनी अर्ज केले आहेत. शहर पोलिस आयुक्तालयाकडे ७३ चालक पदांसाठी ५ हजार ५५८ आणि ९८ पोलिस शिपायांसाठी ६ हजार ६२१ उमेदवारांनी अर्ज केले आहेत. दि. १२ ते १६ जानेवारी या काळात ग्रामदैवत श्री सिध्देश्वर यात्रेनिमित्त परीक्षेला सुटी दिली आहे. त्यानंतर ठरलेल्या वेळापत्रकानुसार परीक्षा होणार असल्याचे आयुक्त डॉ. राजेंद्र माने यांनी सांगितले.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
》 विजेच्या पोलचा शॉक बसून बालिकेचा मृत्यू
सोलापूर – नई जिंदगी परिसरातील प्रभाकर नगर येथे विजेच्या लोखंडी पोलचा शॉक बसल्याने ७ वर्षाची बालिका जागीच मयत झाली. ही घटना गुरुवारी (ता. 5) सायंकाळच्या सुमारास घडली.
ऐमन बंदेनवाज बिराजदार (वय ७ वर्षे रा. प्रभाकरनगर, फरगंदा शाळेच्या पाठीमागे, नई जिंदगी) असे मयत झालेल्या बालिकेचे नाव आहे. ती गुरुवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास इतर मुलासोबत घराजवळ खेळत होती. त्यावेळी विजेच्या खांबाला स्पर्श झाल्याने ती जागीच बेशुद्ध पडली. तिला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले असता ती उपचारापूर्वीच मयत झाली.
मयत ऐमन बिराजदार हिच्या पश्चात आई-वडील, एक भाऊ आणि एक बहीण असा परिवार आहे. तिचे वडील बंदेनवाज बिराजदार हे कंदलगाव येथील वीट भट्टीवर ड्रायव्हर म्हणून काम करतात. तर मयत ऐमन ही घराजवळच्या उर्दू शाळेत दुसरी इयत्तेत शिकत होती.
● पोलची केली होती दुरुस्ती
ज्या लोखंडी पोलला शॉक बसून दुर्घटना घडली. त्या पोलवरचा विद्युत दिवा गेल्या आठ दिवसापासून बंद होता. घटनेच्या दिवसाअगोदरच दुपारी विद्युत मंडळाच्या कर्मचाऱ्यांनी दुरुस्ती करून दिवा चालू केला होता. सायंकाळी लाईट लागल्यानंतर हा प्रकार घडला. त्यास विद्युत कंपनीचे कर्मचारी जबाबदार असल्याचा आरोप येथील नागरिकांनी केला आहे. या घटनेची नोंद एमआयडीसी पोलिसात झाली असून पुढील कारवाई पोलीस करीत आहेत.