अकलूज : संग्रामसिंह मोहिते पाटील मित्र मंडळ अकलूज व शिक्षण प्रसारक मंडळ अकलूज यांच्या संयुक्त विद्यमाने सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांच्या जयंतीनिमित्त राज्यस्तरीय भव्य लेझीम स्पर्धा होणार आहेत.Akluj Mohite-Patil Organized 17th State Level Lazim Competition in Solapur
९ आणि १० जानेवारी २०२३ या कालावधीत 17 व्या राज्यस्तरीय भव्य लेझीम स्पर्धेचे आयोजन केले असल्याची माहिती शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष व संग्रामसिंह मोहिते पाटील मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष संग्रामसिंह मोहिते पाटील व मंडळाच्या कार्याध्यक्ष कुमारी स्वरूपाराणी मोहिते पाटील यांनी दिली. ही स्पर्धा मंडळाचे मार्गदर्शक जयसिंह शंकरराव मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न होत आहेत.
आत्तापर्यंत मंडळाच्या वतीने ४५ हजारापेक्षा जास्त खेळाडू तयार केले असून विशेष बाब म्हणजे अकलूजच्या या लेझीम खेळाची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये झालेली आहे. विजय चौक अकलूज या ठिकाणी होणाऱ्या स्पर्धेसाठी शालेय शहरी व ग्रामीण मुले गट तसेच शालेय शहरी व ग्रामीण मुली गट प्राथमिक गट व अति ग्रामीण गट असे गट ठेवण्यात आले आहे.
या गटाकरिता प्रथम क्रमांक रुपये ३१०१/- द्वितीय क्रमांक रुपये २५०१ /- तृतीय क्रमांक रुपये २००१/- व स्मृतिचिन्ह तर प्राथमिक गटासाठी रुपये प्रथम क्रमांक २५०१ /- द्वितीयसाठी रुपये २००१/- व तृतीय साठी रुपये १५०१ /- व स्मृतिचिन्ह या बक्षीसा बरोबरच उत्कृष्ट लेझीम प्रशिक्षक, उत्कृष्ट हलगी वादक, उत्कृष्ट घुमके वादक, उत्कृष्ट सनई वादक अशी स्वतंत्र रोख रकमेची बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. मंडळाच्या वतीने प्रत्येक संघास मोफत भोजनाची सुविधा पुरविण्यात येणार आहे.
प्रत्येक संघात किमान ३० खेळाडू व प्रत्येक संघास दोन डाव सादर करावयाचे आहेत. खेळाडूंचा गणवेश एकसारखा असावा. स्पर्धा गुण पध्दतीने ठेवल्या जाणार असून याकरिता पन्नास पंच कार्यरत आहेत. या स्पर्धेसाठी विविध कमिट्या कार्यरत असून स्पर्धेमध्ये सहभाग घेण्यासाठी सचिव संजय राऊत ९८९०४३ ४२ १०, अर्जुन बनसोडे ९८६० ३३७९४३, बिबीशन जाधव ९८६०३९ ६०८, सुजित कांबळे ८४ २१ १० ११ २१, राजकुमार गोरे ९४२२ ० २८ ६६४ यांच्याकडे संपर्क साधण्याचे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे. स्पर्धा यशस्वी पार पाडण्यासाठी मंडळाचे सर्व सदस्य कार्यरत आहेत.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
》 सोलापूर | पोलीस भरती प्रक्रिया मैदानी चाचणीत 900 उमेदवारांपैकी,187 जणांची दांडी 49 अपात्र
सोलापूर : सोलापुरातील पोलीस हेडकॉटर येथे गेल्या पाच दिवसापासून पोलीस भरती प्रक्रिया सुरू आहे. २० जानेवारीपर्यंत टप्प्या टप्प्याने ही भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. दरम्यान दि. ६ जानेवारी रोजी शहर पोलीस आयुक्तालयाने ९०० उमेदवारांना शारीरिक चाचणीसाठी बोलवण्यात आले होते. त्यातील ४९ उमेदवार शारीरिक चाचणीसाठी अपात्र ठरविण्यात आल्याची माहितीप्रशासनाकडून सांगण्यात आली.
या मैदानी चाचणी करता दि. ६ जानेवारी करिता ९०० उमेदवारांना बोलावले पैकी ७१३ उमेदवार उपस्थित होते तर १८७ उमेदवारांनी शारीरिक चाचणीस दांडी मारली. ६६४ उमेदवार हे शारीरिक चाचणीस पात्र ठरले. शहर व ग्रामीण पोलिस दलाअंतर्गत चालकांची १०१ तर पोलिस शिपायांची १२४ पदे भरली जाणार आहेत. ग्रामीण पोलिसांनी २ ते १० जानेवारीपर्यंत मैदानी परीक्षा घेण्याचे नियोजन केले आहे.
८ जानेवारीला (रविवारी) एक दिवस सुटी दिली आहे. ग्रामीण पोलिसांकडे २८ चालक पदांसाठी १ हजार ४२२ तर २६ पोलिस शिपाई पदांसाठी १ हजार ४५१ उमेदवारांनी अर्ज केले आहेत. शहर पोलिस आयुक्तालयाकडे ७३ चालक पदांसाठी ५ हजार ५५८ आणि ९८ पोलिस शिपायांसाठी ६ हजार ६२१ उमेदवारांनी अर्ज केले आहेत. दि. १२ ते १६ जानेवारी या काळात ग्रामदैवत श्री सिध्देश्वर यात्रेनिमित्त परीक्षेला सुटी दिली आहे. त्यानंतर ठरलेल्या वेळापत्रकानुसार परीक्षा होणार असल्याचे आयुक्त डॉ. राजेंद्र माने यांनी सांगितले.