पुणे : पुण्याचा ‘महाराष्ट्र केसरी’ पैलवान अभिजित कटके याने तेलंगणात रविवारी प्रतिष्ठेच्या ‘हिंद केसरी’ किताबावर नाव कोरत आपल्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला. किताबी लढतीत त्याने हरियाणाच्या सोनू वीरचा ५ -० अशा गुणफरकाने पाडाव करीत विजेतेपदाला गवसणी घातली. Abhijit Katke from Pune is the winner of the ‘Hind Kesari’ title
हिंद केसरी हैदराबाद येथे झालेल्या या ५१ व्या हिंदकेसरी कुस्ती स्पर्धेच्या किताबी लढतीत अभिजित कटकेने पहिल्या फेरीतच हप्ता डावावर ४ गुणांची कमाई करीत जेतेपदाच्या दिशेने दमदार पाऊल टाकले होते. उत्तरार्धात आणखी एका गुणाची कमाई करीत त्याने जेतेपद निश्चित केले.
त्याआधी, उपांत्य लढतीत अभिजितने हरियाणाच्या मोनूकुमारचा ४-१ गुणफरकाने पराभव केला. याच मोनूकुमारने उपांत्यपूर्व फेरीत ‘महाराष्ट्र केसरी’चा हॅट्ट्रिकवीर विजय चौधरीला हरविले होते. अभिजितने प्राथमिक फेरीत उत्तर प्रदेशच्या गोपाल यादवला ७-० गुणफरकाने लोळवून या स्पर्धेतील आपल्या अभियानास प्रारंभ . केला होता. २०१७ मध्ये ‘महाराष्ट्र केसरी’ची गदा जिंकणाऱ्या अभिजित कटकेने राष्ट्रीय स्पर्धेतील ९६ किलो गटातही पदके जिंकली आहेत.
युवा राष्ट्रकुल स्पर्धेतील मॅटवरील या पुणेरी मल्लाने मातीवरील ‘हिंद केसरी’ स्पर्धेतही बाजी मारली, हे विशेष. आता हा ‘हिंद केसरी’ मल्ल मंगळवारपासून पुण्यात सुरू होणाऱ्या ‘महाराष्ट्र केसरी’ स्पर्धेतही जेतेपदाचा प्रबळ दावेदार असणार आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
अभिजित कटके हा एकवेळा महाराष्ट्र केसरी तर दोन वेळा उपमहाराष्ट्र केसरी ठरला आहे. अभिजीतने या पूर्वी दोन वेळा उपमहाराष्ट्र केसरी तर एकवेळा महाराष्ट्र केसरी किताब पटकावला आहे. त्यानंतर तो हिंद केसरीचा मानकरी ठरला. पुण्याच्या गणेश पेठेतल्या शिवरामदादा तालमीचा अभिजीत कटके हा पैलवान आहे. अभिजीतला अमर निंबाळकर, भरत म्हस्के आणि हणमंत गायकवाडांचं मार्गदर्शन लाभलं आहे.
अभिजीतनं 2015 साली युवा महाराष्ट्र केसरीचा मान मिळवला होता. 2016 साली त्यानं ज्युनियर राष्ट्रीय कुस्तीत कांस्यपदकाचा मान मिळवला होता. अभिजीत वयाच्या बाविशीतही एक परिपक्व पैलवान म्हणून ओळखला जातो.
● यंदा देशात विक्रमी गहू उत्पादन
देशात अन्नधान्याच्या तुटवडा निर्माण होणार नसल्याची माहिती केंद्र सरकारने दिली आहे. या वर्षी 3.32 कोटी हेक्टर जमिनीवर गव्हाची लागवड करण्यात आली आहे. ही लागवड मागील 2 वर्षांच्या तुलनेत अधिक आहे. 112 दशलक्ष टन गव्हाचे उत्पादन करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते, त्यापेक्षा अधिक गव्हाचे उत्पादन होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. कडधान्य, तेलबियांच्या लागवडीतही वाढ झाली आहे.