सोलापूर : महिलेचा विनयभंग करुन तिला मारहाण केल्याच्या आरोपावरुन आरोपी कल्याण मनोहर ऊर्फ बिटटू शिरसट (रा. मोहोळ) याला तीनवर्षे सक्तमजुरी व दंडाची शिक्षा जिल्हा व सत्र न्यायाधीश कविता शिरभाते यांनी ठोठावली. Solapur Court | Three years hard labor for accused in molestation case
फिर्यादीचे पती 2010 साली मयत झाले असून ती दोन मुलासह माहेरी राहत आहे. तिस आरोपीने वेळोवेळी रस्त्यात अडवून शरीर संबंध ठेवण्याच्या कारणावरुन दमदाटी करून तिच्या घरात मुलासह झोपली असताना आरोपीने घरी येवून दरवाजावर दगड मारले. त्यामुळे फिर्यादीने घराचा दरवाजा उघडला असता आरोपीने घरात अनाधिकाराने प्रवेश करुन तिला लाथाबुक्क्याने मारहाण करुन तिचा विनयभंग केल्याबाबतची फिर्याद दाखल केली.
पोलिसांनी याचा तपास करुन न्यायालयात दोषारोपत्र दाखल केल्यानंतर सरकारपक्षातर्फे 8 साक्षीदार तपासले. फिर्यादी व प्रत्यक्षदर्शी साक्षीदार तिचा मुलगा, वैद्यकीय अधिकारी व इतर साक्षीदारांच्या साक्षी पुराव्यावरुन आरोपीने विनयभंग करुन तिला मारहाण केल्याचा युक्तीवाद सरकारपक्षातर्फे करण्यात आला. तो ग्राह्य धरून जिल्हा व सत्र न्यायाधीश शिरभाते यांनी आरोपी कल्याण शिरसट यास तीनवर्षे सक्तमजुरी व साडेचार हजार रुपये दंड ठोठावला.
दंडाची संपूर्ण रक्कम पिडीतेस देण्याचे आदेशही न्यायाधीशांनी दिले आहेत. यात सरकारतर्फे अॅड. शीतल डोके, अॅड. प्रकाश जन्नू यांनी तर आरोपीतर्फे अॅड. के. एन. खडके, अॅड. डमढेरे यांनी काम पाहिले.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
》 हुंड्याच्या कारणावरून विवाहितेचा जाळून खून : पती सासू आणि सासरे निर्दोष मुक्त
सोलापूर : हुंड्याच्या कारणावरून विवाहितेच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून खून केल्याच्या आरोपातून मयताच्या पतीसह तिघांना गुन्हा शाबित न झाल्यामुळे निर्दोष मुक्त करण्याचा आदेश अतिरिक्त सत्रन्यायाधीश आर.डी.खेडेकर यांनी नुकताच दिला आहे.
व्यंकटेश शंकर कोंबेकर (पती), तुळसाबाई कोंबेकर (सासू) आणि सासरे शिवराम ऊर्फ शंकर नरसय्या कोंबेकर (सर्व रा.८७ जगजीवनराम झोपडपट्टी, सोलापूर) अशी निर्दोष मुक्त झालेल्या आरोपींची नावे आहेत. या तिघांनी मिळून अनुराधा व्यंकटेश कोंबेकर हिचा सोने आणि पैशासाठी छळ करुन दि.१२ एप्रिल २०१८ रोजी तिच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून तिचा खून केला असे सरकार पक्षाचे म्हणणे होते.
या खटल्याची थोडक्यात हकीकत अशी, व्यंकटेश कोंबेकर याचा विवाह २०१२ साली अनुराधा हिचेबरोबर झाला होता. लग्नानंतर पती, सासू, सासरा यांनी सोने व पैसे या कारणावरून अनुराधा हिचा छळ सुरु केला. त्याबाबत तिने न्यायालयात खटला दाखल केली होती. दरम्यान आरोपींनी तिला नांदावयास घेवून गेले होते. नांदण्यास घेवून गेल्यानंतर पुन्हा आरोपीनी संगनमताने तिला छळ सुरू केला. आणि घटनेच्या दिवशी म्हणजेच १२ एप्रिल २०१८ रोजी तिला त्याच कारणावरुन तिघांनी तिच्या अंगावर रॉकेल ओतून तिला पेटवुन दिले होते.उपचारा दरम्यान अनुराधा ही रुग्णालयात मरण पावली.
तिघांनी मिळून हुंड्याच्या कारणावरून आपल्या मुलीचा जाळून खून केला. अशा आशयाची फिर्याद अनुराधाच्या वडिलांनी सदर बझार पोलिसात दाखल केली होती. त्याप्रमाणे पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल केला होता.
या खटल्यात सरकार पक्षातर्फे एकूण १२ साक्षीदार तपासण्यात आले. त्यात समाजातील पंच, नेत्र साक्षीदार, नातेवाईक, मृत्यूपूर्व जबाब नोंदविणारे पोलीस अधिकारी, डॉक्टर इत्यादींच्या महत्वपूर्ण साक्षी झाल्या. सदर प्रकरणात आरोपीचे वकिलांनी सदरची घटना ही अपघात किंवा आत्महत्या असावी, आरोपीने मयताला वाचविण्याचा प्रयत्न केला आहे. मृत्यूपूर्व जबाब विश्वासार्ह नाही, साक्षीदारांच्या साक्षीमध्ये विसंगती खोटेपणा दर्शवते. पोलीसांनी प्रकरणात लहान मुलगा अनिकेत याची साक्ष का नोंदविली नाही. या आणि अशा इतर महत्वाच्या बाबींवरती युक्तीवाद मांडला होता. शिवाय काही महत्वाचे उच्च व सर्वोच्च न्यायालयाचे निवाडे सादर केले होते.
सरकार पक्षाने युक्तीवाद करुन गुन्हा सिध्द होत असल्याने त्यांना दोषी धरावे आणि शिक्षा करावी अशी मागणी केली. मात्र न्यायालयाने आरोपींच्या वकिलांनी मांडलेला युक्तिवाद ग्राह्य सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली.
या खटल्यात सरकार तर्फे अॅड. पी. एस. जन्नू, तर मुळ फिर्यादीतर्फे अॅड. इस्माईल शेख तर आरोपी तर्फे अॅड. शशि कुलकर्णी, अॅड. स्वप्निल सरवदे, अॅड. रणजीत चौधरी, अॅड. अशुतोष पुरवंत यांनी काम पाहिले.