Friday, January 27, 2023
Surajya Digital
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
  • ब्लॉग
  • अर्थाअर्थ
  • शिवार
  • Techनिक
No Result
View All Result
Surajya Digital
No Result
View All Result

ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर यात्रेतील विधींना उद्या होणार प्रारंभ

Rituals in village deity Shri Siddharameshwar Yatra will start tomorrow Solapur Akshata Sohla

Surajya Digital by Surajya Digital
January 10, 2023
in Hot News, सोलापूर
0
ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर यात्रेतील विधींना उद्या होणार प्रारंभ
0
SHARES
45
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

□ शनिवारी अक्षता सोहळा, वाहतूक मार्गात बदल

 

सोलापूर : ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर यात्रेतील विधींना उद्या गुरुवार, दि. ११ जानेवारी रोजी प्रारंभ होणार असून दरवर्षीप्रमाणे योगदंड पूजन, नंदीध्वजास साज चढविणे, तैलाभिषेक, अक्षता सोहळा, होम प्रदीपन, दारूकाम, नंदीध्वजांचे वस्त्र विसर्जन हे धार्मिक विधी होणार असल्याची माहिती ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर महायात्रेचे पहिल्या नंदीध्वजाचे मानकरी राजशेखर हिरेहब्बू यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. Rituals in village deity Shri Siddharameshwar Yatra will start tomorrow Solapur Akshata Sohla

 

बुधवार, ११ जानेवारी रोजी वाढदिवसाच्या पूजा शेटे वाड्यात होणार आहे. गुरुवार, १२ जानेवारी रोजी रात्री १२.०५ वाजता हिरेहब्बू वाड्यात मानाच्या पहिल्या आणि दुसऱ्या नंदीध्वजास साज चढविण्याचा कार्यक्रम होणार आहे.

शुक्रवार, दि. १३ जानेवारी रोजी श्री सिद्धरामेश्वरांनी स्थापन केलेल्या ६८ लिंगांना तैलाभिषेक करुन धार्मिक विधींना प्रारंभ होणार आहे. ही मिरवणूक सकाळी ८ वाजता हिरेहब्बू वाड्यापासून सुरुवात होणार आहे.

शनिवार, दि. १४ जानेवारी रोजी सकाळी ७ वाजता हिरेहब्बू वाड्यापासून नंदीध्वज मिरवणुकीस प्रारंभ होणार आहे. ही मिरवणूक ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर मंदिरात आल्यानंतर संमती कट्ट्यावर हजारो भाविकांच्या उपस्थितीत अक्षता सोहळा होणार आहे.

 

रविवार, दि. १५ जानेवारी रोजी मकर संक्रांतीच्या दिवशी होम मैदानावर होमप्रदीपनाचा समारंभ होणार आहे. सोमवार, दि. १६ जानेवारी रोजी किंक्रांत असून त्यादिवशी होम मैदानावर शोभेचे दारूकाम होणार आहे. तर मंगळवार, दि. १७ जानेवारी रोजी नंदीध्वजांच्या वस्त्रविसर्जनाचा कार्यक्रम होणार आहे.

 

श्री सिद्धेश्वर यात्रेसाठी महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक येथून जवळपास तीन ते चार लाख भाविक येतात. कोरोनाच्या दोन वर्षांनंतर पहिल्यांदाच यात्रा निर्बंधमुक्त पार पडत असल्याने भाविकांची गर्दी जास्त होईल, असा पोलिसांचा अंदाज आहे. नंदीध्वजांच्या मिरवणुकीला हिरेहब्बू मठातून सुरुवात होते. बाबा कादरी मशीद, डॉ. चिडगुपकर यांचे घर, दाते यांचे श्री गणपती मंदिर, हाजीभाई चौक, पंचकट्टा आणि रिपन हॉल येथून श्री सिद्धेश्वर मंदिर असा नंदीध्वज मिरवणुकीचा मार्ग असतो. तसेच नंदीध्वज 68 लिंग प्रदक्षिणादेखील असते.

या पत्रकार परिषदेस यात्रेचे मानकरी आणि आमदार विजयकुमार देशमुख मनोज हिरेहब्बू, जगदीश हिरेहब्बू, संजय हिरेहब्बू, संतोष हिरेहब्बू, धनेश हिरेहब्बू, विनोद हिरेहब्बू, विकास हिरेहब्बू, प्रथमेश हिरेहब्बू, ओंकार हिरेहब्बू, सर्वेश हिरेहब्बू, यश हिरेहब्बू, सुदेश देशमुख, मल्लिनाथ मसरे, सुधीर थोबडे, संदेश उघडे, सोमनाथ मेंगाणे, भीमाशंकर म्हेत्रे, भीमाशंकर कुंभार, योगीनाथ इटाणे, चिदानंद मुस्तारे तसेच विविध नंदीध्वजांचे मास्तर उपस्थित होते.

 

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

 

● नंदीध्वज मिरवणूक मार्गावरील अडथळ्यांबाबत प्रशासनाची चर्चा

 

नंदीध्वज मिरवणूक मार्गावरील अडथळ्यांबाबत प्रशासनाची चर्चा करण्यात आली असून महापालिका आणि पोलीस आयुक्त यांच्याशी बोलणी सुरू आहेत. याबाबत पुन्हा एकदा पाहणी करून अडथळे दूर करण्याबाबत प्रशासनाशी चर्चा करण्यात येणार आहे, असे राजशेखर हिरेहब्बु यांनी सांगितले.

 

● वाहतूक मार्गात बदल

पोलीस आयुक्त डॉ. राजेंद्र माने यांनी नवे आदेश काढले आहेत. त्यानुसार 13 ते 17 जानेवारी हे पाच दिवस नंदीध्वज मार्ग, सिद्धेश्वर मंदिर परिसर, श्री मल्लिकार्जुन मंदिर, संमती कट्टा, रेकणसिद्धेश्वर मंदिर व बाजार परिसरात ‘नो पार्किंग झोन’ असणार आहे.

होम मैदानावर 15 जानेवारीला होमविधी सोहळा, तर 16 जानेवारीला शोभेचे दारूकाम होईल. त्यावेळी हा आदेश लागू असणार आहे. या काळात वाहतूक मार्गातही बदल करण्यात आला आहे.

 

ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर यात्रेला कोणताही अडथळा होऊ नये म्हणून सात मार्गांवरील वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे. 13 ते 17 जानेवारी या काळात हा बदल असणार आहे. विजापूर केस ते पंचकट्टा आणि लक्ष्मी मार्केट ते पंचकट्टा या मार्गांवरील वाहतूक विजापूर केस ते बेगमपेठ पोलीस चौकीमार्गे अशी जाईल. स्टेट बँक ट्रेझरी शाखा ते पंचकट्टा या मार्गावरील वाहतूक पूनम चौक ते बेगमपेठ पोलीस चौकीमार्गे पुढे जाईल. स्टेट बँक ट्रेझरी शाखा ते पार्क चौक या मार्गावरील वाहतूक पूनम चौक, रंगभवन चौक, सात रस्ता, जुना एम्प्लॉयमेंट चौक, डफरीन चौक, पार्क चौक या मार्गावरून वळविण्यात येणार आहे. तसेच मार्केट पोलीस चौकी ते पंचकट्टा, पार्क चौक ते मार्केट चौकी, ज्ञानप्रबोधिनी प्रशाला ते फडकुले सभागृह हे मार्ग निर्बंधकाळात वाहतुकीसाठी बंद राहतील, असेही पोलीस आयुक्त डॉ. माने यांनी स्पष्ट केले आहे.

Tags: #Rituals #village #deity #ShriSiddharameshwarYatra #start #tomorrow #Solapur #AkshataSohla#ग्रामदैवत #श्रीसिद्धरामेश्वर #यात्रा #विधी #उद्या #प्रारंभ #वाहतूक #बदल #अक्षतासोहळा
Previous Post

सोलापूर | विनयभंगप्रकरणी आरोपीस तीन वर्षे सक्तमजुरी

Next Post

लकी चौकामधील लॉजमध्ये बांधकाम ठेकेदाराचा संशयास्पद मृत्यू

Surajya Digital

Surajya Digital

Next Post
लकी चौकामधील लॉजमध्ये बांधकाम ठेकेदाराचा संशयास्पद मृत्यू

लकी चौकामधील लॉजमध्ये बांधकाम ठेकेदाराचा संशयास्पद मृत्यू

वार्ता संग्रह

January 2023
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Dec    

ट्विटर पेज

Currently Playing

About Us

SurajyaDigital
सुराज्य डिजिटल हा ब्रँड जगाच्या काना-कोपऱ्यातील सर्वंकष माहितीचा अचूक खजिना आपल्यापर्यंत पोहोंचविण्याचे काम करतोय. टाईम मीडिया हाऊसचा हा ब्रँड अल्पावधीतच मराठी वाचकांचा अत्यंत विश्वासार्ह ब्रँड बनला आहे.जगभरातील घटनांचा वेगवान आढावा घेत त्यावर भाष्य करण्याबरोबरच वाचकांच्या आवडीचे विषय, करमणूक यासारखे दृक्श्राव्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी सुराज्य डिजिटल कटीबद्ध आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा timemediahouse@gmail.com timemarathi@gmail.com
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697