सोलापूर – लकी चौकातील हॉटेल शिव पार्वती लॉज मधील खोलीमध्ये एका बांधकाम ठेकेदाराचा मृतदेह संशयास्पद रित्या सोमवारी (ता. 9) रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास आढळून आला. Suspicious death of construction contractor at lodge in Lucky Chowk Solapur Shivparvati
भीमाशंकर धावरू चव्हाण ( वय 43 वर्ष , रा . नरसिंग नगर, जुना विडी घरकुल, सोलापूर ) असे त्या मयत बांधकाम ठेकेदाराचे नाव असून ते मूळचे राहणारे कर्नाटक राज्यातील आनंदेश्वर गुलबर्गा येथील आहे. कामधंद्यासाठी ते दहा पंधरा वर्षांपूर्वी सोलापुरात स्थायिक झाले होते. घटनेच्या दोन दिवसांपूर्वी ते घरातून निघून गेले होते. यापूर्वी देखील ते याचप्रमाणे घरातून निघून गेले असल्यामुळे याबाबत घरच्यांनी पोलिसात मिसिंग दाखल केली नव्हती.
मयत लकी चौकातील शिवपार्वती लॉज मध्ये उतरले होते. सोमवारी दुपारी त्यांच्या रूमचा दरवाजा बंद होता. वेटरने आवाज दिला प्रतिसाद मिळाला नाही. फोनही केला त्यालाही प्रतिसाद न मिळाल्याने लॉज वाल्याने फौजदार चावडी पोलिसांना ही कल्पना दिली. तेव्हा पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून दरवाजा तोडला असता खोलीतील बाथरूम मध्ये भीमाशंकर चव्हाण हे मृतावस्थेत मिळून आले.
बांधकाम व्यवसायात अनेकांनी त्यांचे पैसे बुडविल्याने त्यांना कर्ज झाल्याचे त्यांच्या घरच्यांनी सांगितले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली, दोन मुले असा परिवार आहे
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
□ रोहन देशमुख यांच्याविरूध्द प्रोसेस इश्यूचा आदेश
सोलापूर : भाजपाचे दक्षिण सोलापूरचे आमदार सुभाष देशमुख यांचे पुत्र, ‘लोकमंगल’ मल्टीस्टेटचे अध्यक्ष रोहन देशमुख यांच्या विरोधात प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी डी. आर. भोला यांनी प्रोसेस इश्यूचे आदेश दिले आहेत.
करार करून घेतलेला जेसीबी बेकायदेशीरपणे अवैध उत्खननासाठी वापरल्याप्रकरणी आम दार सुभाष देशमुख यांचे पुत्र रोहन सुभाष देशमुख (रा. मित्रनगर, शेळगी) यांच्याविरूध्द न्यायालयाने प्रोसेस इश्यूचा आदेश दिला आहे.
यातील फिर्यादी रविराज सूर्यकांत कदम ( रा मित्र नगर, शेळगी )यांची जेसीबी होती. रोहन देशमुख यांनी फिर्यादी कदम यास जेसीबी व डोझर पुरविण्याच्या कामाबाबत वर्कऑर्डर दिली. जेसीबी हा संस्थेच्या कुमठे येथील रो हाउस बांधकामाचे – खड्डे मारण्याकरिता व इतर कामासाठी त्याचा वापर होईल, असा विश्वास देशमुख यांनी फिर्यादीस दिला. त्याप्रमाणे फिर्यादीने विश्वासाने त्याच्या मालकीचा जेसीबी जून २०१८ पासून संस्थेच्या कुमठे येथील साइटवर कामासाठी दिला.
तद्नंतर ऑगस्ट २०१८ रोजी तहसील कार्यालय उत्तर सोलापूर यांनी फिर्यादीस फिर्यादीचा जेसीब हा अवैधरीत्या गौण खनिज उत्खननासाठी वापरल्याचे पत्र दिले. यामुळे संस्थेने फिर्यादीच्या अपरोक्ष त्यांचा जेसीबी हा बेकायदेशीररीत्य अवैध उत्खननाकरिता वापरला त्याबाबत फिर्यादीने जाब विचारला असता त्यावेळी त्यांनी उडवा उडवीची उत्तरे दिली. यामुळे रोहन देशमुख यांनी कदम यांचा विश्वास संपादन करून विश्वासघात केला अशा आशयाची खाजगी फिर्याद फिर्यादीने कोर्टात दाखल केली. वकिलांमार्फत न्यायालयात धाव घेतली.
फिर्यादी कदम यांनी ५ जून २०१८ रोजीच्या वर्क ऑर्डरनुसार त्यांच्या मालकीचा जेसीबी दिला. १८ जून २०१८ रोजी तहसील कार्यालय उत्तर सोलापूर यांनी कदम यांना त्यांचा जेसीबी हा अवैधरीत्या गौण खनिज उत्खननाकरिता वापरल्याचे पत्र दिले. फिर्यादी कदम यांनी जाब विचारला तेव्हा उडवाउडवीची उत्तरे मिळाली.
त्यानंतर संस्थेने शासनाच्या ताब्यातून जेसीबी सोडवून खासगी गॅरेजमध्ये दुरुस्त केला. या प्रकरणात रोहन देशमुख यांनी विश्वासघात केला, अशी खासगी फिर्याद न्यायालयात दाखल केली. या प्रकरणी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी डी. आर. भोला यांनी प्रोसेस इश्यूचा आदेश पारित केला. फिर्यादीतर्फे ॲड. प्रशांत नवगिरे, ॲड. श्रीपाद देशकर, ॲड. सागर मंद्रूपकर यांनी काम पाहिले.