पंढरपूर : आमच्या शेतामधून वाहने का घेऊन जाता अशी विचारणा करणाऱ्या महिलेस जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य संतोष सुळे व त्याच्या मेव्हण्याने जबर मारहाण केली असून याप्रकरणी मारहाणीसह विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Solapur | A case of molestation against former member of district planning, Pandharpur
तालुका पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सदर महिलेची तालुक्यातील ईश्वरवठार येथे शेती असून सोमवारी सदर महिला आपल्या शेतात काही कामानिमित्त गेली होती. यावेळी सदर महिलेने संतोष सुळे याच्या शेतातील गड्यास तुम्ही आमच्या शेतामधून न विचारता वाहने का घेऊन जाता असे विचारले. यावेळी संतापलेल्या संतोष सुळे याने या महिलेस लाथा बुक्क्याने मारहाण केली तसेच मनाला लज्जा वाटेल, असे कृत्य केले. तर त्याचा मेव्हणा बाळू गावडे याने देखील पीडित महिलेस मारहाण करून सदर तिचा मोबाईल जमिनीवर आपटून नुकसान केले.
संतोष सुळे व बाळू गावडे यांच्या विरोधात मारहाणीसह विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
□ मोहोळ नगरपरिषदेतून 35 हजार गायब, ‘ना दाद ना फिर्याद’ अशी अवस्था
मोहोळ : मोहोळ नगर परिषदेच्या कार्यालयातून मागील आठ दिवसापूर्वी वसुलीच्या पैशातील ३५ हजार रुपये गायब होऊनही याबाबत वरिष्ठांनी दखल न घेतल्याने ना दाद ना फिर्याद अशी परिस्थिती संबंधित कर्मचाऱ्यांच्या बाबतीत झाली आहे.
याबाबतची माहिती अशी की संगीता कुंभार ह्या मोहोळ नगर परिषदेमध्ये काम करतात. नगर परिषदेच्या ऑफिसमधील उतारे देणे त्याचबरोबर घरपट्टी पाणीपट्टीची वसुली करणे. यासारखी कामे त्या नियमित करत असतात. ४ जानेवारी रोजी बुधवारी वसुली करून आल्यानंतर ऑफिसमध्ये भरणा करण्यासाठी थांबल्या त्याचबरोबर पर्स मध्ये पैसे ठेवून बाकीची कामे ही त्यांनी केली. त्यानंतर त्यांनी ठेवलेले पैसे भरणा करण्यासाठी काढले असता त्यामध्ये त्यांनी मोजून लावून ठेवलेल्या नोटांमधून ३५ हजार रुपये कमी असल्याचे त्यांच्या लक्षात आले.
याबाबत तातडीने ही बाब त्यांनी त्यांच्या वरिष्ठांच्या कानावर घातली वरिष्ठांनी या घटनेची शहानिशा न करता याबाबत विचारपूस न करता त्यांनाच पूर्ण रक्कम भरण्याची तंबी दिली. त्यांनी बाहेरून ३५ हजार रुपये आणून त्या रकमेची पूर्तता केली व त्या दिवशीचा भरणा पूर्ण केला परंतु नंतरच्या कालावधीमध्ये आठ दिवसांमध्ये कार्यालयामध्ये चोरी होऊन वरिष्ठांनी याबाबत कोणतीही दखल घेतली नाही.
कार्यालयामध्ये सीसीटीव्ही असतानाही भर दिवसा होणाऱ्या चोरीची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे या घटनेबाबत मोहोळ येथील नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात आहे. ३५ हजार रुपये भर दिवसा पर्समधून काढून घेऊनही ना दाद ना फिर्याद अशी संगीता कुंभार यांची अवस्था झाली आहे. ही घटना त्यांनी स्वतः प्रतिनिधीशी संपर्क साधून या घटनेबाबत न्याय मिळवण्याची मागणी केली आहे.