》 राज्य सरकारचा स्वीकृत नगरसेवक वाढीचा मास्टरस्ट्रोक
सोलापूर : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिंदे – फडणवीस सरकारने राज्यातील महापालिकांमध्ये स्वीकृत नगरसेवकांची संख्या वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा फायदा राज्यातील सर्व मोठ्या महापालिकांना होणार आहे. यामुळे कार्यकर्त्यांची बल्ले बल्ले होणार आहे. The number of approved corporators in Solapur will be doubled by the state government masterstroke
मंत्रिमंडळाच्या या निर्णयामुळे सोलापुरातील स्वीकृत नगरसेवकांची संख्या आता डबल होणार आहे. यापूर्वी सोलापूर महापालिकेत पाच स्वीकृत सदस्य होते आता त्याची संख्या दहावर जाणार आहे. राज्य सरकारच्या नवीन निर्णयामुळे सर्वच राजकीय पक्षांना याचा फायदा होणार आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मार्गदर्शनाखाली मंत्रिमंडळाची महत्त्वाची मंगळवारी पार पडली. या बैठकीत स्वीकृत सदस्य वाढीचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. यामध्ये मोठ्या महानगरपालिकांमध्ये स्वीकृत नगरसेवकांची संख्या १० करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचप्रमाणे लहान महापालिकांमध्ये सदस्य संख्येच्या १० टक्के स्वीकृत नगरसेवकांची निवड असू शकणार आहे.
यापैकी जी संख्या लहान असेल त्यानुसार स्वीकृत सदस्यांची निवड होणार आहे. यामुळे शंभरच्यावर नगरसेवकांची संख्या असलेल्या पक्षांना १० तर त्यापेक्षा कमी नगरसेवक असलेल्या पक्षांना अनुक्रमे १० व संख्याबळानुसार स्वीकृत नगरसेवकांची निवड करता येणे शक्य होणार आहे. यामुळे आता
निष्ठावंत कार्यकर्त्यांना संधी मिळणार आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
सोलापूर महापालिकेची सदस्य संख्या १०० पेक्षा जास्त आहे. त्यानुसार स्वीकृत नगरसेवक संख्या १० होणार आहे. पक्षातील ज्या मंडळींना निवडून येता आले नाही त्यांचं पुनर्वसन करण्याकरिता हा निर्णय फायद्याचा ठरणार आहे. सोलापूर महानगरपालिकांमध्ये स्वीकृत नगरसेवकांची संख्या अनुक्रमे ५ इतकी होती. आता ती दुपटीने वाढून म्हणजे १० होणार आहे.
□ सर्वच राजकीय पक्षांना फायदा
महापालिका कायद्यानुसार प्रत्येक महापालिकेतील स्वीकृत सदस्यांची संख्या निश्चित करण्यात आली आहे. या सदस्यांना मतदानाचा अधिकार वगळता इतर नगरसेवकांप्रमाणे सर्व अधिकार असतात.
महापालिकेतील संख्याबळानुसार प्रत्येक पक्षाला ठराविक कोट्यानुसार स्वीकृत सदस्यांची निवड करता येते. मात्र, राज्य सरकारच्या नवीन निर्णयामुळे सर्वच राजकीय पक्षांना याचा फायदा होणार आहे.
》 बाराबंदी बालकासमवेतच्या यात्रेत छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडचा सहभाग
सोलापूर – सोलापूरच्या सिध्दरामेश्वराची यात्रा ही देशांमध्ये प्रसिद्ध आहे. या यात्रेत सहभागी होणारा भक्त हा एक वेगळ्याच पोषाखात असतो ती म्हणजे शुभ्र वस्त्र परिधान केलेले “बाराबंदी “.
आज मंगळवारी शहरातील शाळेच्या विद्यार्थ्यांनी यात्रेची शोभा वाढावी म्हणून बाराबंदीच्या वेशात रॅली काढली. यात संगप्पा केंगनाळकर प्रशालेच्या विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडच्या वतीने बाराबंदी पोशाख देण्यात आले होते.
या बाल यात्रेत छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडचे शहराध्यक्ष हाजी मतीन बागवान जिल्हाध्यक्ष शफीक रचभरे उपाध्यक्ष राजू हुंडेकरी तन्वीर गुलजार सर्फराज शेख, अल्ताफ मुजावर, रऊफ मैंदर्गीकर, कय्युम मोहोळकर आदी मान्यवर उपस्थित होते.