Wednesday, May 31, 2023
Surajya Digital
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
  • ब्लॉग
  • अर्थाअर्थ
  • शिवार
  • Techनिक
No Result
View All Result
Surajya Digital
No Result
View All Result

जिल्हा नियोजन समितीवर वीस नव्या सदस्यांची निवड, शुक्रवारी डीपीसी बैठक

Election of 20 new members on District Planning Committee, DPC meeting on Friday BJP Shindesena

Surajya Digital by Surajya Digital
January 11, 2023
in Uncategorized
0
जिल्हा नियोजन समितीवर वीस नव्या सदस्यांची निवड, शुक्रवारी डीपीसी बैठक
0
SHARES
125
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

》 भाजप 14 तर शिंदे सेनेच्या सहा जणांना संधी

सोलापूर : जिल्हा नियोजन समितीवर वीस सदस्यांच्या नव्याने निवडी करण्यात आल्या आहेत. या निवडीत भारतीय जनता पक्षाने बाजी मारल्याचे दिसून येत आहे. यात 6 सदस्य शिंदे गटाचे असून इतर 14 भाजपचे सदस्य आहेत. Election of 20 new members on District Planning Committee, DPC meeting on Friday BJP Shindesena

 

सोलापूर शहरातून अमोल शिंदे व उमेश गायकवाड यांना शिंदे गटाने संधी दिली आहे. जिल्हा नियोजन समितीची सभा येत्या शुक्रवारी (ता.13) पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होत आहे.

त्याच पार्श्वभूमीवर या सदस्यांच्या निवडी झाल्या असून त्यामध्ये आमदार सचिन कल्याणशेट्टी आणि आमदार समाधान आवताडे (दोघेही भाजप) यांना संधी देण्यात आली आहे. जिल्हा नियोजनशी संबंधित ज्ञात असलेल्या समितीमधून जिल्हा परिषदेचे माजी सभागृह नेते अण्णाराव बाराचारे (कुंभारी, ता. दक्षिण सोलापूर), शिवाजी सावंत (शिंदे गट, वाकाव, ता. माढा), धैर्यशील मोहिते पाटील (भाजप, अकलूज, ता. माळशिरस), माजी आमदार प्रशांत परिचारक (भाजप, पंढरपूर) यांना संधी देण्यात आली आहे.

विशेष निमंत्रित सदस्य म्हणून चनगोंडा हावनाळे (बरुर, ता. दक्षिण सोलापूर), चेतनसिंह केदार (सांगोला भाजप), गणेश चिवटे (करमाळा भाजप), योगेश बोबडे (टेंभुर्णी, ता. माढा), केशवराव पाटील (निमगाव, ता. माळशिरस), सुनील चव्हाण (टाकळी सिकंदर, ता. मोहोळ), प्रदीप खांडेकर (भाजप, हिवरगाव, ता. मंगळवेढा), रफिक नदाफ (सांगोला), उमेश गायकवाड (सलगरवाडी सोलापूर), विजय गरड (पांगरी, ता. बार्शी), नारायण पाटील (जेऊर, ता. करमाळा, शिंदे गट), अमोल शिंदे (उत्तर कसबा, सोलापूर शिंदे गट), नागेश भोगडे(उत्तर कसबा, सोलापूर), अशोक दुस्सा (न्यू,पाच्छापेठ, सोलापूर) यांची निवड करण्यात आली आहे.

 

यापूर्वी राज्यामध्ये शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस या तीन पक्षाची महाविकास आघाडीची सत्ता असताना पालकमंत्रीपदी दत्तात्रय भरणे होते त्यावेळी झालेल्या निवडी नंतर सरकार बदलल्यावर रद्द झाल्या. त्यामुळे आता या नवीन 20 सदस्यांना जिल्हा नियोजन समितीवर सदस्य म्हणून घेण्यात आले आहे.

 

□ पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत शुक्रवारी नियोजन समितीची बैठक

 

 

जिल्हा नियोजन समितीची बैठक शुक्रवारी (दि.१३) सकाळी ११.३० वाजता सात रस्ताजवळील नियोजन भवन सभागृहात होणार आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक आयोजित केली आहे.

बैठकीस खासदार, आमदार आणि जिल्हा नियोजन समितीचे सदस्य उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत ४ ऑक्टोबर २०२२ रोजी झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीचे इतिवृत्तास, तसेच बैठकीचे इतिवृत्तावर केलेल्या अनुपालन अहवालास मान्यता देणे. ३१ डिसेंबर २०२२ अखेरील २०२२-२०२३ जिल्हा वार्षिक योजनेच्या सर्वसाधारण योजना, अनुसूचित जाती उपयोजना व आदिवासी क्षेत्राबाहेरील उपयोजना यांच्या खर्चाचा आढावा घेणे.

राज्यस्तरीय समितीपुढे सादर करावयाच्या २०२३-२४ जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण, अनुसूचित जाती उपयोजना व अधिवासी क्षेत्राबाहेरील उपयोजनेच्या प्रारूप आराखड्यास मान्यता देणे, आदी विषयांवर चर्चा होणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली.

Tags: #Election #20newmembers #District #Planning #Committee #DPCmeeting #Friday #BJP #Shindesena#सोलापूर #जिल्हा #नियोजन #समिती #वीस #नव्यासदस्य #निवड #शुक्रवारी #डीपीसी #बैठक #शिंदेसेना #भाजप
Previous Post

सोलापुरात स्वीकृत नगरसेवकांची संख्या दुपटीने वाढणार

Next Post

सोलापुरात विधवा भगिनींचा हळदी कुंकू लावून, संक्रांतीचे वाण देऊन सन्मान

Surajya Digital

Surajya Digital

Next Post
सोलापुरात विधवा भगिनींचा हळदी कुंकू लावून, संक्रांतीचे वाण देऊन सन्मान

सोलापुरात विधवा भगिनींचा हळदी कुंकू लावून, संक्रांतीचे वाण देऊन सन्मान

वार्ता संग्रह

January 2023
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Dec   Feb »

ट्विटर पेज

Currently Playing

About Us

SurajyaDigital
सुराज्य डिजिटल हा ब्रँड जगाच्या काना-कोपऱ्यातील सर्वंकष माहितीचा अचूक खजिना आपल्यापर्यंत पोहोंचविण्याचे काम करतोय. टाईम मीडिया हाऊसचा हा ब्रँड अल्पावधीतच मराठी वाचकांचा अत्यंत विश्वासार्ह ब्रँड बनला आहे.जगभरातील घटनांचा वेगवान आढावा घेत त्यावर भाष्य करण्याबरोबरच वाचकांच्या आवडीचे विषय, करमणूक यासारखे दृक्श्राव्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी सुराज्य डिजिटल कटीबद्ध आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा timemediahouse@gmail.com timemarathi@gmail.com
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697