मुंबई : शिवसेना पक्षप्रमुखपदी उद्धव ठाकरे यांची निवड बेकायदेशीर असल्याचा दावा शिंदे गटाने निवडणूक आयोगासमोर केला आहे. शिवसेना कोणाची याबाबतच्या निवडणूक आयोगासमोरील सुनावणीत शिंदे गटाने आज पक्षावर दावा करताना उद्धव ठाकरे यांचे पक्षप्रमुख पद बेकायदेशीर असल्याचे म्हटले आहे. Uddhav Thackeray’s election as party chief is illegal, Election Commission claims of Shinde group
एकनाथ शिंदे यांची निवड जुलै 2022 ही राष्ट्रीय कार्यकारणीने केली आहे, त्यामुळे ही निवड योग्य असल्याचा दावा जेठमलानी यांनी केला आहे. उद्धव ठाकरेंचे शिवसेना पक्षप्रमुख हे पद बेकायदेशीर आहे, असा दावा शिंदे गटाचे वकील जेठमलानी यांनी केला आहे. बाळासाहेबांच्या निधनानंतर उद्धव ठाकरे यांनी घटनेत बदल केले आणि शिवसेना पक्षप्रमुख व मुख्य नेता असे पदे निर्माण केले असाही दावा त्यांनी केला आहे. तर राष्ट्रीय कार्यकारणीत शिंदेंची मुख्यनेता म्हणून निवड करण्यात आली होती, असा युक्तीवाद त्यांनी केला आहे.
शिवसेना पक्ष व धनुष्यबाण चिन्हाबाबत केंद्रीय निवडणूक आयोगासमोर आज झालेली सुनावणी संपली आहे. यावेळी दोन्ही गटाने आपली बाजू मांडली. पक्ष आणि धनुष्यबाण आमचाच आहे, असा दावा ठाकरे आणि शिंदे गटाने केला आहे. यावर आता पुढील सुनावणी 1 आठवड्यानंतर होण्याची शक्यता आहे. दरम्यान उद्धव ठाकरेंनी बेकायदेशीरपणे पक्षप्रमुखपद बळकावले, असा युक्तीवाद शिंदे गटाने केला आहे. तर आम्हीच खरी शिवसेना असे ठाकरे गटाने म्हटले.
शिवसेनेची जुनी घटना शिवसेना प्रमुख बाळासाहेब केंद्रित होती. पण, नंतर ती बदलत उद्धव ठाकरे यांनी शिवसेना पक्ष प्रमुख असे नाव स्वतःसाठी घेतले. शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांनी शिवसेनेच्या घटनेबद्दल निवडणुक आयागोसमोर माहिती दिली. चर्चेदरम्यान जेठमलानी यांनी पक्षाची रचना काय हे वाचून दाखवली. बाळासाहेबांचे निधन झाल्यावर उद्धव ठाकरे यांनी स्वतःकडे सगळे अधिकार घेणारे बदल शिवसेनेच्या घटनेत करणे हा खोटारडेपणा आहे. हे बदल बेकायदेशीर आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे शिवसेनेचे प्रमुख होत नाहीत असं महेश जेठमलानी यांचे एकनाथ शिंदे गटातर्फे म्हणणे आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
शिंदे गटाकडून केंद्रीय निवडणूक आयोगात प्रतिज्ञापत्रांच्या 4 मोठ्या बॅगा आणल्या गेल्या. दोन्ही गटाकडून लाखो प्रतिज्ञापत्र आणि पुरावे निवडणूक आयोगात दिली गेली. शिंदे गटाची सादर कागदपत्रे बोगस, असा ठाकरे गटाकडून युक्तिवाद करण्यात आला.
ठाकरे गटाकडून 22 लाख 24 हजार 950 तर शिंदे गटाकडून 4 लाख 51 हजार 127 इतके प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात आले आहेत. दोन्ही गटाकडून लाखोंच्या संख्येत प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात आले आहेत. लाखोंच्या संख्येने शिंदे गटाकडून चार बॅगमधून आणलेले कागदपत्रे जमा करण्यात आले आहेत.
शिंदे गटाकडून प्राथमिक सदस्य 4 लाख 48 हजार आहेत. 13 खासदार आणि 40 आमदारांसह संघटनात्मक प्रतिनिधी 711 आहेत.शिंदे गटाकडे एकूण 4 लाख 51 हजार 127 एवढी प्रतिज्ञापत्र असून आज शेवटच्या क्षणापर्यंत शिंदे गटाकडून कागदपत्रे आणली गेली. कागदपत्रांचे गठ्ठे एका मोठ्या खोलीत जमा करण्यात आली असून सुरक्षाव्यवस्थाही केली गेली आहे.
□ सत्तासंघर्षाची सुनावणी पुन्हा लांबणीवर
राज्यातील सत्तासंघर्षावरील सुप्रीम कोर्टातील सुनावणी पुन्हा एकदा लांबणीवर पडली आहे. या प्रकरणी आता थेट 14 फेब्रुवारीला सुनावणी होणार आहे. शिंदे गटातील 16 आमदारांच्या अपात्रतेसंदर्भातील प्रकरणावर आता पुढल्या महिन्यात निर्णय येण्याची शक्यता आहे. दरम्यान सध्या हे प्रकरण 5 न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे आहे. पण हे प्रकरण 7 न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे वर्ग करण्यात यावे, अशी मागणी ठाकरे गटाने केली आहे.