□ एटीएम कार्डची आदलाबदल करून लुटण्याचा प्रकार उघडकीस
पंढरपूर : एटीएम कार्डची अदलाबदल करून नागरिकांची फसवणूक करणाऱ्या टोळीतील दोन गुन्हेगारांना पंढरपूर शहर पोलीस ठाणे व खंडणी विरोधी शाखा, पोलीस आयुक्तालय ठाणे शहर यांचे संयुक्त कारवाईमध्ये ताब्यात घेतले आहे. As many as 101 ATM cards seized in Solapur; Pandharpur police arrested two accused आरोपीकडे १०१ एटीएम कार्ड मिळवून आले असल्याची माहिती पंढरपूर शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण फुगे यांनी दिली.
ठाणे शहर, नवी मुंबई, नाशिक, पुणे, सोलापूर परिसरात एटीएममध्ये जाणा-या नागरिकांना बोलण्यात गुंतवून ठेवून त्यांचे एटीएम कार्डची अदलाबदली करून नागरिकांची फसवणूक करून रक्कम काढून घेण्याबाबतचे तकारींचे प्रमाण वाढले होते. त्या अनुषंगाने खंडणी विरोधी शाखा, पोलीस आयुक्तालय ठाणे शहर व सोलापूर ग्रामीण पोलीस दलातील पंढरपूर शहर पोलीस ठाणे यांना सदरचे फसवणुकीचे गुन्हयांबाबत प्रतिबंधात्मक उपाययोजना व दाखल गुन्ह्यांचा तपास करणेबाबत वेळोवेळी वरिष्ठांकडून सुचना व मार्गदर्शन मिळाले होते.
पोलीस आयुक्तालय ठाणे शहर व सोलापूर ग्रामीण पोलीस ठाण्याचे हद्दीमध्ये घडलेल्या गुन्ह्यांचा तपशील संकलित करून घटनास्थळांवरील तांत्रिक तपास करून अशा प्रकारचे गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांची माहिती मिळवली. एटीएम कार्ड बदली करून फसवणूक करणा-या सराईत गुन्हेगार यांचा माग काढत असताना ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील खंडणी विरोधी शाखा यांना पाहिजे असलेले आरोपी सनी उर्फ विकण्या मुन्ना सिंग (वय २७ रा. नेहरूनगर, विठ्ठलवाडी, कल्याण पुर्व, जि. ठाणे मुळ जि. कानपूर, उत्तरप्रदेश), श्रीकांत प्रकाश गोडबोले (वय २८ वर्ष, रा. भैयासाहेब आंबेडकर नगर, खेमाणी उल्हासनगर २, जि. ठाणे) हे २ जानेवारी २०२३ रोजी पंढरपूर शहर पोलीस ठाणे हद्दीत आहेत, अशी माहिती पोलीस उपनिरीक्षक महेश कावळे, नेमणुक खंडणी विरोधी शाखा, पोलीस आयुक्तालय ठाणे शहर यांना मिळाली.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
त्यांनी तात्काळ पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात संपर्क साधला असता सदर आरोपीबाबत माहिती कळविली. त्यानुसार पंढरपूर शहर पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी तात्काळ दोन पथके तयार करून आरोपीचा शोध घेण्यास सुरवात केली. तांत्रिक विश्लेषनाच्या आधारे सिनेस्टाईल प्रमाणे आरोपी पंढरपूर शहर पोलीसांनी ताब्यात घेतले.
त्यांचेकडे वेगवेगळ्या बँकांचे एकूण १०१ एटीएम कार्ड मिळाले असल्याचे निष्पन्न झाले आहे. याबाबत पोलिसांनी अधिक चौकशी केली असता आरोपींनी या पूर्वी ठाणे शहर, नवी मुंबई, पुणे, नाशिक, पंढरपूर या हद्दीत गुन्हे केल्याची कबुली दिली आहे.
या आरोपींना पंढरपूर शहर पोलीसांनी ताब्यात घेतले असुन पुढील कार्यवाही करीता खंडणी विरोधी शाखा, ठाणे शहर पोलीस आयुक्तालय यांचेकडे हस्तांतरीत करण्याची प्रकीया चालू आहे.
ही कारवाई सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, हिंमत जाधव अपर पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण, विक्रम कदम, उपविभागीय पोलीस अधिकारी पंढरपूर, अरुण फुगे वरीष्ठ पोलीस निरीक्षक पंढरपूर शहर पोलीस ठाणे यांचे मार्गदर्शनाखाली पंढरपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक प्रशांत भागवत, पोना प्रसाद औटी, पोना समाधान पाटील, पोशि माधव वडडेटीवार, पोशि निलेश कांबळे, चालक पोशि रामकिसन खेडकर सायबर पोलीस ठाण्याचे पोशि/ आत्तार तसेच खंडणी विरोधी शाखा, ठाणे शहर यांचेकडील पोलीस उपनिरीक्षक महेश कावळे यांनी पार पाडली. पुढील तपास खंडणी विरोधी शाखा, पोलीस आयुक्तालय ठाणे शहर हे करीत आहेत.