□ श्रमिकांच्या हक्काच्या घरकुलासाठी सर्वतोपरी सहकार्य – पालकमंत्री
सोलापूर : कुंभारी येथे रेनगर फेडरेशनच्या माध्यमातून साकारत असलेला 30 हजार घरांचा प्रकल्प हा भांडवलदारांचा नसून श्रमिक – कष्टकर्यांचा आहे. तेव्हा श्रमिकांना हक्काचा निवारा देणार्या या प्रकल्पपूर्तीसाठी आपले सर्वतोपरी सहकार्य राहील, अशी ग्वाही पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी शुक्रवारी दिली. Demand for declaration of municipality for Raynagar, Guardian Minister asked MLA Kalyanshetty to boat Narsayya Adam Solapur
पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी शुक्रवारी रेनगरला भेट देऊन या प्रकल्पाबाबत आढावा बैठक घेतली. यावेळी त्यांच्यासमोर या प्रकल्पाचे सादरीकरणही करण्यात आले. याप्रसंगी या प्रकल्पाचे मुख्य प्रवर्तक तथा माजी आमदार नरसय्या आडम, माजी नगरसेविका कामिनीआडम, माकपचे जिल्हा सचिव एम.एच. शेख. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, आ. सुभाष देशमुख, आ. राजेंद राऊत, म्हाडाचे सीईओ नितीन माने, जि.प.च्या सीईओ मनीषा आव्हाळे, एमजेपीचे अधिकारी उमाकांत माशाळे, बांधकाम खात्याचे अधिकारी महाजन, वीज वितरण कंपनीचे अधिकारी सांगळे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
प्रारंभी प्रकल्पाबाबत बोलताना नरसय्या आडम म्हणाले, प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत साकारत असलेल्या रेनगर गृहप्रकल्पाकडे खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विशेष लक्ष आहे. या प्रकल्पासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वी सर्वतोपरी सहकार्य केले असून आतादेखील संपूर्ण सहकार्याची त्यांची भूमिका आहे. हा प्रकल्प 31 डिसेंबर 2024 पर्यंत पूर्ण करण्याचे शासनाचे निर्देश आहेत. या प्रकल्पासाठी पाणी, रस्ते, वीज या मूलभूत सुविधांसाठी 300 कोटी मंजूर आहेत.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
रे नगर कार्यक्रमासह अधिक व्हिडिओ पाहण्यासाठी surajya digital फेसबुक पेजला भेट द्या
आडम मास्तर म्हणाले, या कामांच्या शुभारंभासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावे यासाठी आमचा जोरदार पाठपुरावा आहे, पण आचारसंहिता आदी कारणांमुळे ते येऊ शकले नाही. या पार्श्वभूमीवर फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री या कार्यक्रमासाठी यावेत, यादृष्टीने पालकमंत्र्यांनी प्रयत्न करावेत. आडम यांनी केल्या विविध मागण्या
यावेळी नरसय्या आडम यांनी विविध महत्वाच्या मागण्या मांडल्या.
रेनगरसाठी नगरपालिका घोषित करावी, ही मान्यता मिळाली तर नगरपालिकेच्या सर्व सुविधा या प्रकल्पाला मिळण्याचा मार्ग मोकळा होईल. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून या प्रकल्पाच्या पाणी योजनेच्या गुणवत्ता तपासणी अहवाल व तांत्रिक खर्चासाठी तीन टक्के शुल्काची आकारणी केली जात आहे. पण महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने आता अतिरिक्त एक टक्के वाढीव शुल्काची मागणी केली आहे. हे शुल्क अवाजवी असल्याने संपूर्ण शुल्कमाफी द्यावी, कॉ. मीनाक्षी साने विडी कामगार घरकुलासाठी असलेली स्टँपड्युटी 25 हजारांवरून एक हजार करावी, या प्रकल्पाच्या बांधकामासाठी निधीची कमतरता आहे, पण लाभार्थ्यांच्या गृहकर्जाबाबत विलंब होत असल्याने शासनाने म्हाडाला 15 टक्के रक्कम विशेष निधी म्हणून द्यावी. घरांचे वितरण होण्याआधी कर्जाची उपलब्धता झाल्यावर हा निधी शासनाला परत करू, अशा विविध मागण्या आडम यांनी केल्या.
आडम यांच्या मागण्यांबाबत बोलताना पालकमंत्री म्हणाले की, हा प्रकल्प श्रमिकांचा असल्याने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून संपूर्ण शुल्कमाफी मिळावी यासाठी शासनदरबारी प्रयत्न करेन. या नगराला नगरपालिकेचा दर्जा मिळवून देण्यासाठी आ. सचिन कल्याणशेट्टी यांनी प्रयत्न करावेत. या प्रकल्पासाठी माझ्या अखत्यारितील असलेल्या विषयांबाबत मी शंभर टक्के सकारात्मक निर्णय घेणार आणि अखत्यारितील नसलेल्या विषयांबाबत मी संबंधितांना शिफारस करणार आहे.
□ प्रातिनिधिक स्वरुपात गृहकर्जाचे वितरण
यावेळी प्रातिनिधिक स्वरुपात लाभार्थ्यांच्या गृहकर्जाच्या धनादेशांचे वितरण पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. प्रति एक लाख 92 हजार रुपयांचे धनादेश 10 लाभार्थ्यांना देण्यात आले.
प्रारंभी स्वागत रेनगर फेडरेशनचे सचिव युसूफ मेजर यांनी केले. सूृत्रसंचालन अॅड. अनिल वासम यांनी केले तर आभार फेडरेशनच्या अध्यक्षा नलिनी कलबर्गुी यांनी मानले.
कार्यक्रमास विविध राष्ट्रीयीकृत बँकांचे अधिकारी तसेच म्हाडा, वीज वितरण कंपनी, जिल्हा प्रशासनाचे संबंधित अधिकारी, रे नगर फेडरेशन चे सर्व पदाधिकारी व संचालक उपस्थित होते.