Tuesday, February 7, 2023
Surajya Digital
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
  • ब्लॉग
  • अर्थाअर्थ
  • शिवार
  • Techनिक
No Result
View All Result
Surajya Digital
No Result
View All Result

ऊस घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरला कंटेनरची धडक; ट्रॅक्टर चालक ठार

container crash into tractor carrying sugarcane; Tractor driver standing Solapur

Surajya Digital by Surajya Digital
January 14, 2023
in Uncategorized
0
ऊस घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरला कंटेनरची धडक; ट्रॅक्टर चालक ठार
0
SHARES
149
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

□ डिझेल टाकी फुटल्याने कंटेनरचे टायर जळून खाक, कंटेनरच्या केबिनमध्ये पोचली आग

 

सोलापूर : साखर कारखान्याला ऊस घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरला कंटेनरने समोरून जोरात धडक दिली. त्यात ट्रॅक्टर चालक कल्लप्पा भुताळी पुजारी (वय-४२) याचा जागीच मृत्यू झाला. कंटेनर चालक जखमी झाला असून त्याच्यावर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. container crash into tractor carrying sugarcane; Tractor driver standing Solapur

पुण्याहून विजयपूरकडे जाणारा कंटेनर भरधाव वेगाने जात होता. गुरूवारी (ता. 12 ) रात्री साडेदहाच्या सुमारास ट्रॅक्टर ऊस घेऊन विरूद्ध दिशेने सोलापूरकडे येत होता. कंटेनर चालकाला त्याचा अंदाज आलाच नाही. ट्रॅक्टर व कंटेनरची समोरासमोर जोरात धडक झाली. ही धडक एवढी जोरात होती की, ट्रॅक्टरचे बोनेट पूर्णपणे चेमटले होते. डिझेल टाकी फुटल्याने कंटेनरचे टायर जळून खाक झाले होते. लागलेली आग कंटेनरच्या केबिनपर्यत आग पोचली होती. जखमी कंटेनर चालक त्यात भाजला असून त्याच्या पोटाला व पाठीला जखम झाली आहे.

 

□ हायवा ट्रकची कारला धडक; ५० हजाराचे नुकसान

सोलापूर : सोलापूरहून तुळजापूरकडे कुटुंबासह दर्शनाकरिता निघालेल्या मुंबईतील एका व्यक्तीच्या कारला पाठीमागून धडक दिल्याने कारचे पन्नास हजाराच्या आसपास नुकसान झाले.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

 

घटनेची हाकिकत अशी की, मुंबई येथील मधुसूदन यशवंत पेंडणेकर (वय-५९ रा.बांद्रा ईस्ट,मुंबई) हे आपल्या कुटुंबासह तुळजाभवानी मातेच्या दर्शनाकरिता तुळजापूरकडे निघाले होते. जुना बोरामणी नाका येथे आज शुक्रवारी (ता. 13) सकाळी ११ वाजता सुमारास पाठीमागून आलेल्या हायवा ट्रक क्रमांक एम.एच.१३ सीयु.६१०० च्या चालक सोनप्पा सुभाष गायकवाड (रा.भोगाव ता. उत्तर सोलापूर) यांनी आपल्या ताब्यातील ट्रकने कारला धडक दिली.

 

यात कारच्या उजव्या बाजूचे टायर, दोन दरवाजे, काचा असे तुटून जवळपास ५० हजार रुपये नुकसान झाले. जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात ट्रक चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल भोगशेट्टी हे करत आहेत.

 

□ एटीएमचे कार्ड चोरून ७३ हजार रुपये पळविले

 

सोलापूर  – लग्नाच्या घाई गडबडीत कोणीतरी एटीएम कार्ड पळविले. आणि त्या कार्डचा वापर करून वृद्ध इसमाच्या खात्यातून ७३ हजार रुपये काढून नेल्याची घटना नरोटेवाडी (ता.उत्तर सोलापूर) येथे नुकतीच उघडकीस आली.
 यासंदर्भात विठ्ठल कांबळे (वय ७७ रा. नरोटेवाडी) यांनी तालुका पोलीसातचोरीची फिर्याद दाखल केली. यांच्या भावाच्या घरी लग्नकार्य असल्यामुळे नातेवाईक आणि इतर लोक त्यांच्या घरी आले. या दरम्यान त्यांच्या घरातून एटीएम कार्ड चोरीस गेले.
चोरट्याने त्या कार्डचा गैरवापर करून कांबळे यांच्या खात्यातून ७३ हजार रुपये काढून घेतले. दरम्यान कांबळे यांनी नान्नज येथील बँकेत जाऊन कार्ड हरवल्याशी तक्रार दाखल केली. तेव्हा त्यांना २५ ते २७ डिसेंबर या दरम्यान खात्यातून पैसे गायब झाल्याचे दिसून आले. पुढील तपास हवालदार चव्हाण करीत आहेत .

 

 

Tags: #container #crash #tractor #carrying #sugarcane #Tractor #driver #standing #Solapur#ऊस #ट्रॅक्टर #कंटेनर #धडक #ट्रॅक्टरचालक #ठार #सोलापूर
Previous Post

सोलापूर समांतर जलवाहिनीचे काम तत्काळ सुरू करण्याचे आदेश

Next Post

रेल्वेच्या डब्यात महिला प्रसूत; बाळ दगावले, बाळंतीण सुखरूप

Surajya Digital

Surajya Digital

Next Post
रेल्वेच्या डब्यात महिला प्रसूत; बाळ दगावले, बाळंतीण सुखरूप

रेल्वेच्या डब्यात महिला प्रसूत; बाळ दगावले, बाळंतीण सुखरूप

वार्ता संग्रह

January 2023
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Dec   Feb »

ट्विटर पेज

Currently Playing

About Us

SurajyaDigital
सुराज्य डिजिटल हा ब्रँड जगाच्या काना-कोपऱ्यातील सर्वंकष माहितीचा अचूक खजिना आपल्यापर्यंत पोहोंचविण्याचे काम करतोय. टाईम मीडिया हाऊसचा हा ब्रँड अल्पावधीतच मराठी वाचकांचा अत्यंत विश्वासार्ह ब्रँड बनला आहे.जगभरातील घटनांचा वेगवान आढावा घेत त्यावर भाष्य करण्याबरोबरच वाचकांच्या आवडीचे विषय, करमणूक यासारखे दृक्श्राव्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी सुराज्य डिजिटल कटीबद्ध आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा timemediahouse@gmail.com timemarathi@gmail.com
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697