□ ढेंगळे – पाटील यांच्याकडून खुलासा घेणार : पालकमंत्री
सोलापूर : स्मार्ट सिटी योजनेंतर्गत असलेल्या महत्वपूर्ण उजनी – सोलापूर समांतर जलवाहिनीचे काम तत्कालीन सीईओ त्रिंबक ढेंगळे-पाटील यांनी शासनाच्या पूर्वसंमती शिवाय अधिकार कक्षेच्या बाहेर जाऊन हे काम थांबवले. याचा खुलासा त्यांच्याकडून घ्यावा आणि कामाची स्थगिती उठवावी, अशा स्पष्ट सूचना अधिकाऱ्यांना दिल्याची माहिती पालकमंत्री विखे-पाटील यांनी दिली. Order to start the work of Solapur parallel water channel immediately Guardian Minister disclosure
सोलापूर शहराची जीवनदायीनी मानल्या जाणाऱ्या उजनी – सोलापूर समांतर जलवाहिनी काम थांबवल्याबद्दल पालकमंत्री राधाकृष्ण विखे – पाटील यांनी नाराजी व्यक्त केली तसेच या जलवाहिनीचे काम सध्या मक्ता दिलेल्या नव्या ठेकेदाराकडून तातडीने सुरु करावे. काम व्यवस्थित न केलेल्या संबंधित मक्तेदाराला काळ्या यादी टाका, असे आदेश पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी आढावा बैठकीत दिले.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
□ पाणीपुरवठा नियमित व्हावा यासाठी दिल्या सूचना
प्रचलित पाणीपुरवठ्यात निष्काळजीपणा होऊ नये. तांत्रिक बाबी लक्षात घेऊन विलंब होणार नाही. याची दक्षता घ्यावी आणि नियमित पाणीपुरवठा व्हावा यासाठी आवश्यक ते नियोजन करावे. या संदर्भातही आयुक्तांना सूचना दिल्याचे पालकमंत्री विखे-पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले.
□ लोकप्रतिनिधींनी केल्या तक्रारी
या बैठकीत आमदार प्रणिती शिंदे व आमदार सुभाष देशमुखांनी समांतर जलवाहिनीचे थांबवलेले कामाबद्दल नाराजी व्यक्त केली. आमदार प्रणिती शिंदे व आमदार सुभाष देशमुख यांनी बैठकीत शहराला आता ५ दिवसाआड पाणीपुरवठा होतो. दररोज पाणी तर तेवढेच उचलले जाते, पण पाणी का दिले जात नाही असा सवाल उपस्थित केला.
काही काळापूर्वी चालू झालेले काम कोणतेही वैध कारण नसताना स्मार्ट सिटीच्या तत्कालीन सीईओंनी थांबवले होते. समांतर जलवाहिनीचे काम तत्काळ सुरू करावे. हे काम पूर्ण करण्यासाठी कालमर्यादा निश्चित करून तसा कार्यक्रम आखण्यात यावा अशी आग्रही मागणी केली. योजनेमध्ये मोठा गडबड घोटाळा आहे.
पैसे देऊन पाणी पुरवठा वळवण्यात येत असल्याचा खुलास पाकमंत्र्यांनी केला यांची चौकशी करण्याचे आश्वासन पालकमंत्र्यांनी यावेळी दिले. अमोल शिंदे यांनी स्मार्ट सिटीअंतर्गत शहरातील ज्या भागात सर्वाधिक निधी खर्च करण्यात आला. त्या भागाला सुरळीत व नियमित पाणीपुरवठा होत नसल्याची तक्रार केली.