Friday, January 27, 2023
Surajya Digital
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
  • ब्लॉग
  • अर्थाअर्थ
  • शिवार
  • Techनिक
No Result
View All Result
Surajya Digital
No Result
View All Result

सोलापुरात डोक्यात फरशी घालून एकाचा खून, जवळच आढळला फरशीचा तुकडा

In Solapur, a man was killed by a floor covering his head, a piece of floor was found near Chippa Market

Surajya Digital by Surajya Digital
January 15, 2023
in Uncategorized
0
सोलापुरात डोक्यात फरशी घालून एकाचा खून, जवळच आढळला फरशीचा तुकडा
0
SHARES
134
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

सोलापूर : सोलापुरात एका युवकाचा डोक्यात फरशी घालून निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. आज रविवारी (ता. 15) अशोक चौक परिसरातील चिप्पा मार्केटमध्ये सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारात ही घटना आली. In Solapur, a man was killed by a floor covering his head, a piece of floor was found near Chippa Market

घटना कळतात जेलरोड पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मृत युवकाचा ओळख पटली नसून अंदाजे ३५ – ४० वर्षाचा तरुण असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

भाजी विक्रेत्यांसाठी तयार करण्यात आलेल्या चिप्पा मार्केट परिसरात काल मध्यरात्री ही घटना घडली. घटनास्थळी मयत तरुण हा निपचित पडला होता. त्याच्या अंगावर मोठा फरशीचा तुकडा त्याच्या जवळच पडला होता. रक्ताचा सडा पडला होता. दरम्यान, घटनेची माहिती करतात शहरातील वरिष्ठ पोलीस अधिकारी हे घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर मृतदेह शव विच्छेदनासाठी पाठवण्यात आल्याचे सांगण्यात आले.

 

वजनाची फरशी रक्ताने माखलेली आढळली. कवटी फुटून मेंदू बाहेर आल्याने मयताचा चेहरा  ओळखू येत नव्हता.  पोलिसांनी श्वान पथकाद्वारे आरोपीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. पथकातील श्वान  काही अंतरापर्यंत जाऊन घुटमळत राहिला. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनाकरिता शासकीय रुग्णालयाकडे पाठवून दिले.

 

मयताच्या अंगावर लाल रंगाचे बारीक फुले असलेला पोपटी शर्ट आणि फिकट निळ्या रंगाची जीन्स पॅन्ट आहे.  त्याच्या उजव्या हातावर गोंदलेले अस्पष्ट खुण आहे.  या संदर्भात कोणास माहिती असल्यास त्यांनी जेलरोड पोलीस ठाण्यातील सहाय्यक निरीक्षक चिंताकिंदी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

 

महानगरपालिकेच्या या चिप्पा मार्केटमधील बरेच भाजी विक्रेते आणि इतर व्यापारी मार्केटमध्ये न बसता सत्तर फूट रोडवर व्यवसाय करतात. त्यामुळे या मार्केटमध्ये नेहमी शुकशुकाट असतो.  रात्रीच्या वेळी मात्र या ठिकाणी व्यसनी लोकांचा वावर असतो. त्यातूनच हा प्रकार घडला असावा अशी चर्चा  होती.

 

 

□ एटीएमचे कार्ड चोरून 73 हजार रुपये पळविले

 

सोलापूर – लग्नाच्या घाई गडबडीत कोणीतरी एटीएम कार्ड पळविले. आणि त्या कार्डचा वापर करून वृद्ध इसमाच्या खात्यातून ७३ हजार रुपये काढून नेल्याची घटना नरोटेवाडी (ता.उत्तर सोलापूर) येथे नुकतीच उघडकीस आली.

यासंदर्भात विठ्ठल कांबळे (वय ७७ रा. नरोटेवाडी) यांनी तालुका पोलीसात चोरीची फिर्याद दाखल केली. यांच्या भावाच्या घरी लग्नकार्य असल्यामुळे नातेवाईक आणि इतर लोक त्यांच्या घरी आले. या दरम्यान त्यांच्या घरातून एटीएम कार्ड चोरीस गेले. आणि चोरट्याने त्या कार्डचा गैरवापर करून कांबळे यांच्या खात्यातून ७३ हजार रुपये काढून घेतले.

दरम्यान कांबळे यांनी नान्नज येथील बँकेत जाऊन कार्ड हरवल्याशी तक्रार दाखल केली. तेंव्हा त्यांना २५ ते २७ डिसेंबर या दरम्यान खात्यातून पैसे गायब झाल्याचे दिसून आले. पुढील तपास हवालदार चव्हाण करीत आहेत.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

 

□ मेंढापूर येथे मोटारीतून शेळ्या पळविल्या

मेंढापूर (ता. पंढरपूर) येथे राहणाऱ्या चांगदेव महादेव गोरे यांच्या पत्रा शेडमध्ये बांधलेल्या ५ शेळ्या आणि १ बोकड अशी हजाराची जनावरे चोरट्याने मोटारीतून पळून नेले ही घटना शुक्रवारी पहाटेच्या सुमारास घडले चोरट्याने जनावरांचे पत्राचे उघडून त्यातून पाच शेळ्या आणि एक बोकड असा अशी ३७ हजाराची जनावरे चौघा चोरट्यांनी काळ्या रंगाच्या मोटारीतून येथून पळून नेले. गोरे यांनी यासंदर्भात करकंब पोलिसात फिर्याद दाखल केली. हवालदार वाघमारे पुढील तपास करीत आहेत .

□ वटवटे येथे शेतीच्या वादातून चाकूने मारहाण

वटवटे (ता.मोहोळ) येथे शेतीच्या वादातून चाकू आणि काठीने केलेल्या मारहाणीत अमर हरी कांबळे (वय २६) हा तरुण जखमी झाला. ही घटना गुरुवारी (ता. 12) सायंकाळच्या सुमारास वटवटे गावात घडली. त्याला कामती येथे येथे प्राथमिक उपचार करून पुष्पा (आई) यांनी सोलापुरातील शासकीय रुग्णालयात दाखल केले. त्याला हसन बादशहा मुलानी आणि इतर ५ जणांनी मारहाण केली. अशी प्राथमिक नोंद तालुका पोलिसात झाली आहे.

 

□ कुरनूर येथे सळईने मारहाण

कुरनूर (ता. अक्कलकोट) येथे पैशाच्या वादातून सळई आणि काठीने केलेल्या मारहाणीत तौसिफ मगदूम पठाण (वय २५) हा जखमी झाला. ही घटना शुक्रवारी (ता. 13) सायंकाळच्या सुमारास घडली. त्याला उपचारासाठी सोलापुरातील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. सैपन सिकंदर पठाण, अशपाक पठाण आणि अन्य दोघांनी मारहाण केली. अशी नोंद तालुका पोलिसात झाली आहे.

Tags: #Solapur #man #killed #byafloor #covering #head #piece #floor #found #ChippaMarket#सोलापूर #अशोकचौक #चिप्पामार्केट #डोक्यात #फरशी #एकाचाखून #जवळच #आढळला #फरशी #तुकडा
Previous Post

watch video खासदार सुप्रिया सुळे यांची साडी पेटली, पहा व्हिडिओ

Next Post

सोलापुरातील गाव : एक लाख एकराला बांधच नाही, शेकडो वर्षाची परंपरा

Surajya Digital

Surajya Digital

Next Post
सोलापुरातील गाव : एक लाख एकराला बांधच नाही, शेकडो वर्षाची परंपरा

सोलापुरातील गाव : एक लाख एकराला बांधच नाही, शेकडो वर्षाची परंपरा

वार्ता संग्रह

January 2023
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Dec    

ट्विटर पेज

Currently Playing

About Us

SurajyaDigital
सुराज्य डिजिटल हा ब्रँड जगाच्या काना-कोपऱ्यातील सर्वंकष माहितीचा अचूक खजिना आपल्यापर्यंत पोहोंचविण्याचे काम करतोय. टाईम मीडिया हाऊसचा हा ब्रँड अल्पावधीतच मराठी वाचकांचा अत्यंत विश्वासार्ह ब्रँड बनला आहे.जगभरातील घटनांचा वेगवान आढावा घेत त्यावर भाष्य करण्याबरोबरच वाचकांच्या आवडीचे विषय, करमणूक यासारखे दृक्श्राव्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी सुराज्य डिजिटल कटीबद्ध आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा timemediahouse@gmail.com timemarathi@gmail.com
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697