Monday, January 30, 2023
Surajya Digital
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
  • ब्लॉग
  • अर्थाअर्थ
  • शिवार
  • Techनिक
No Result
View All Result
Surajya Digital
No Result
View All Result

सोलापुरातील गाव : एक लाख एकराला बांधच नाही, शेकडो वर्षाची परंपरा

Village in Solapur: One lakh acres is not built, hundreds of years of tradition Maharashtra Mangalvedha

Surajya Digital by Surajya Digital
January 15, 2023
in Hot News, शिवार, सोलापूर
0
सोलापुरातील गाव : एक लाख एकराला बांधच नाही, शेकडो वर्षाची परंपरा
0
SHARES
341
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

● महाराष्ट्रात एकमेव गाव; ना वाद ना तंटा; शेकडो वर्षाची परंपरा

सोलापूर / शिवाजी हळणवर

राज्यात सर्वात जास्त तंटे हे शेतीच्या बांधावरुन होत असतात. बांधाच्या वादावरून अगदी सख्खे भाऊ पक्के वैरी झाल्याचे अनेक ठिकाणी आपल्या वाचनात किंवा पाहण्यात येते. महसूल, पोलीस आणि न्यायालयात सर्वात जास्त वाद देखील बांधावरुन झाल्याचे दिसते. Village in Solapur: One lakh acres is not built, hundreds of years of tradition Maharashtra Mangalvedha  मात्र, महाराष्ट्रातातील एक असे गाव आहे की जिथे शेतीला बांधच नाही. शेतीला बांध न घालण्याची शेकडो वर्षाची अनोखी परंपरा आजही कायम आहे. सोलापूर जिल्ह्यातील संत दामाजी पंताच्या पदस्पर्शाने पावण झालेल्या मंगळवेढा शिवारात आजही जवळपास 38 हजार हेक्टर म्हणजे 1 लाख एकर शेतीला बांध नाहीत.

 

एका बाजूला राज्यात पिढ्या वाढतील तशी शेतीच्या तुकड्यांची संख्या वाढत चालली आहे. हे होत असताना बांधाचे वाद ही महाराष्ट्रासमोरची मोठी डोकेदुखी बनत चालली आहे. मंगळवेढ्यात आजही शेतीला बांध न घालण्याची शेकडो वर्षाची अनोखी परंपरा आजही कायम आहे. इथे शेतीच्या शिवेवरून किंवा बांधावरून कधी वादच होत नाहीत.

 

सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा हे शहर संत दामाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेले आणि संतपरंपरा असणारे शहर आहे. मंगळवेढ्यात जवळपास 38 हजार हेक्टर म्हणजे 1 लाख एकर शेतीला आजवर कधीच बांध घालण्याची परंपरा नाही. हे विशेष आहे. एखाद्या रोडवर सलग 15 किलोमीटरपर्यंत पाहत गेला तरी तुम्हाला बांध नावाचा प्रकार पाहायला मिळत नाही.

 

निसर्गाने दिलेल्या या परिस्थितीवर येथील हजारो शेतकऱ्यांनी समजूतदारपणे मात करीत महाराष्ट्रासमोर एक आदर्श उभा केला आहे. बांधावरून जीवघेण्यापर्यंत येणाऱ्या महाराष्ट्रातील इतर सुपीक बागायती गावांनी मंगळवेढ्याचा समजूतदारपणाचा आदर्श घेतल्यास यापुढे शेतीची शिव आणि बांधावरून होणारे वाद शमणार नसले तरी नक्की कमी होण्यास मदत होणार आहे. यासाठी फक्त स्वार्थीपणाला मुरड घालून थोडा समंजसपणा धरल्यास खऱ्या अर्थाने तंटामुक्त महाराष्ट्र झाल्याशिवाय राहणार नाही.

 

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

 

 

□ जमिनीला धर नसल्यानं शेतात टाकलेलं बांध टिकत नाही

 

मंगळवेढ्यातील जमिनीला धरच नसल्याने या शेतीत बांध केलेले टीकत नाहीत. एखाद्या पावसात केलेले बांध मोडून जातात. हा पूर्वापार चालत आलेला अनुभव असल्याने या भागातील शेतकरी कधी बांधाच घालण्याच्या भानगडीत पडत नाहीत. मग आपली जमीन केवळ नजरेवर ओळखायची कशी याचे टेक्निक देखील पिढ्यानपिढ्या चालत आलेले आहे.

तसे बांधावर असलेले एखादे झुडूप, एखादी दगडाची खून यावरून बांध नक्की होतात आणि यानंतर प्रत्येक शेतकरी आपल्या मालकीची जमीन लक्षात ठेवत असतो. याला शेजारी शेतकरी देखील कधी आक्षेप घेत नाही किंवा वाद करीत नाही.

□ मंगळवेढ्याची ज्वारी सातासमुद्रापार

 

मंगळवेढ्याची ओळख ज्वारीचे कोठार म्हणून केली जाते. येथील मालदांडी ज्वारीला केंद्र सरकारचे GI मानांकन देऊन तिला सातासमुद्रापार पोहोचवले आहे. अगदी 200 मीटरपर्यंत धर नसलेली काळ्याशार जमिनीतून ही कसदार ज्वारी पिकते. त्यामुळेच या शिवारातील गुळभेंडी हुरड्याला देखील काही न्यारीच चव असते.

येथील काळ्या कसदार जमिनीतून केवळ एखाद्या पावसावर येणारी मोत्यासारखी पांढरी शुभ्र ज्वारी, हरभरा, करडई या पिकात औषधी गुणधर्म असल्याने याला फार मोठी मागणी असते. येथील शेतकऱ्यांनी कधीच ज्वारीचे बियाणे बाजारातून खरेदी केल्याचे ऐकिवात नाही. पिढ्यानपिढ्या शेतात आलेल्या ज्वारीतून दरवर्षी पुढच्या वर्षीच्या बियाणासाठी थोडी ज्वारी ठेवण्याची ही परंपरा शेकडो वर्षांपासून चालत आलेली आहे. त्यामुळेच की काय या परिसरात आजारी पाडण्याचे प्रमाण अत्यंत अत्यल्प असल्याने या भागात आयसीयू सेंटर देखील नसल्याचे अंकुश पडवळे  (कृषिभूषण, शेतकरी ) यांनी सांगितले.

□ हद्दीवरून दोन शेतकऱ्यांत कधीच वाद होत नाहीत

 

जमीन मालकासोबत बैलाला देखील मालकाच्या जमिनीच्या खुणा माहित असल्याने तो त्याच पद्धतीने नांगरट, पेरणी करीत असतो. तसेच आमच्या 10 पिढ्या जमीन कसत आहोत, जमिनीचे तुकडे पडत गेले तरी आमच्यात कधी हद्दीवरून आजवर वाद झाले नाहीत. जमिनीत धर नसल्याने येथील शेतकरी कधीच या शेतात वस्ती करून राहू शकत नाहीत. तसे येणारे पीक फक्त पावसावर अवलंबून असल्यानं आपल्या शेतावर येण्यासाठी सुद्धा घरातून पिण्यासाठी पाणी आणावे लागते.

काळ्या मातीमुळं इथे कोणत्याही शेतात ना विहीर आहे ना बोअरवेल आहे. त्यामुळं प्रत्येक शेतकरी सकाळी रानात येऊन संध्याकाळी परत जातो. पिढ्यानपिढ्या शेतकऱ्यांमध्ये असणाऱ्या या समजूतदारपणामुळं इथे कोणतेच वाद कधी होत नाहीत.

– मुरलीधर दत्तू
संचालक, संत दामाजी कारखाना

Tags: #Village #Solapur #One #lakh #acres #not #built #hundreds #years #tradition #Maharashtra #Mangalvedha #santdamaji#संतदामाजी #मंगळवेढा#सोलापूर #महाराष्ट्र #एकमेव #गाव #एकलाख #एकर #बांध #शेकडो #वर्ष #परंपरा #शेती #शेतकरी
Previous Post

सोलापुरात डोक्यात फरशी घालून एकाचा खून, जवळच आढळला फरशीचा तुकडा

Next Post

परिचारक – भालके समविचारी आघाडीने वाढवली आमदार अवताडेंची डोकेदुखी

Surajya Digital

Surajya Digital

Next Post
परिचारक – भालके समविचारी आघाडीने वाढवली आमदार अवताडेंची डोकेदुखी

परिचारक - भालके समविचारी आघाडीने वाढवली आमदार अवताडेंची डोकेदुखी

वार्ता संग्रह

January 2023
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Dec    

ट्विटर पेज

Currently Playing

About Us

SurajyaDigital
सुराज्य डिजिटल हा ब्रँड जगाच्या काना-कोपऱ्यातील सर्वंकष माहितीचा अचूक खजिना आपल्यापर्यंत पोहोंचविण्याचे काम करतोय. टाईम मीडिया हाऊसचा हा ब्रँड अल्पावधीतच मराठी वाचकांचा अत्यंत विश्वासार्ह ब्रँड बनला आहे.जगभरातील घटनांचा वेगवान आढावा घेत त्यावर भाष्य करण्याबरोबरच वाचकांच्या आवडीचे विषय, करमणूक यासारखे दृक्श्राव्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी सुराज्य डिजिटल कटीबद्ध आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा timemediahouse@gmail.com timemarathi@gmail.com
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697