पुणे : सुप्रिया सुळे यांच्यासोबत एक मोठी दुर्घटना घडली असून एका कार्यक्रमाच्या उद्घाटन करतांना दीप प्रज्वलन करून छत्रपती शिवरायांना फुले वाहतांना त्यांच्या साडीला आग लागल्याची घटना समोर आली आहे. त्यांचे लगेच लक्ष गेल्याने अनर्थ टळला आहे. हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. NCP MP Supriya Sule’s sari caught fire, watch video Pune Hinjewadi
खासदार सुप्रिया सुळे यांच्या साडीला आग लागल्याची मोठी बातमी समोर येत आहे. कार्यक्रमात दिप प्रज्वलन करताना ही घटना घडली आहे. आग लागल्यानंतर तात्काळ विजवली असून यामध्ये सुप्रिया सुळे यांना कोणतीही इजा झालेली नाही. कोणतीही इजा झाली नसून त्यांचे दैनंदिन कार्यक्रम ठरल्यानुसार सुरू राहणार आहेत. हा कार्यक्रम संपवून त्या बावधनमधील कार्यक्रमालाही गेल्या आहेत.
खासदार सुप्रिया सुळे पुण्यातील हिंजवडीत कराटे प्रशिक्षण कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या. कार्यक्रमात दिपप्रज्ज्वलन केल्यानंतर छ. शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला हार घालताना खासदार सुळे यांच्या साडीने पेट घेतला. साडीने पेट घेतल्याचे लक्षात येताच प्रसंगावधान राखत आग विझवण्यात आली. आज सकाळी साडे १० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे.
पुण्यातल्या सार्वजनिक कार्यक्रमात दीप प्रज्वलन करताना खासदार @supriya_sule यांच्या साडीने पेट घेतला. मात्र सुदैवानं साडी तातडीनं विझवण्यात आली. हा व्हिडीओ बघून व्यासपीठावर दिवे ठेवताना काळजी घेणं किती गरजेचं आहे हे दिसतंय. #Pune pic.twitter.com/hNNodJhMst
— Abhijit Karande (@AbhijitKaran25) January 15, 2023
याविषयी माध्यमांशी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, “ते फक्त दुर्दैव होतं बाकी काही नाही. मी थोडक्यात वाचले. आम्ही सगळे मुळशीला कराटे प्रशिक्षक केंद्राच्या उद्घाटनाला गेलो होतो. तिथे एक मेणबत्ती होती. त्यातूनच माझ्या साडीला आग लागली. साडीला आग लागली आहे, हे आमच्या लगेच लक्षात आलं. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. या घटनेनंतर माझे सलग कार्यक्रम होते.
त्यामुळे कपडे बदलायला मला वेळ मिळाला नाही.” पुणे येथील मुळशी भागामध्ये कराटे कोचिंग क्लासेसच्या उद्घाटन प्रसंगी सुप्रिया सुळे उपस्थित होत्या. या कार्यक्रमामध्ये त्या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. या कार्यक्रमामध्ये दीपप्रज्वलन करताना त्यांच्या साडीने अचानक पेट घेतला. साडीला आग लागली आहे, ही बाब लक्षात येतच त्यांनी लगेच आग विजवली. सुदैवाने सुप्रिया सुळे यांना कोणत्याही प्रकारची हानी झालेली नाही.
आमचे हितचिंतक, नागरिक, कार्यकर्ते व पदाधिकारी यांना माझी विनंती आहे की, मी सुरक्षित असून कृपया कुणीही काळजी करु नये. आपण दाखवित असलेले प्रेम, काळजी माझ्यासाठी मोलाचे आहे. आपणा सर्वांचे मनापासून आभार, अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिली आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
》 सुशीलकुमार शिंदेंचे नातू शिखर दिसले यात्रेत; वारसदाराची चर्चा झाली सुरू
सोलापूर : सोलापुरात शनिवारी ग्रामदैवत सिध्देश्वर महायात्रेचा महत्त्वपूर्ण विधी अक्षता सोहळा संमती कट्ट्यावर पार पडला. या अक्षता सोहळ्यात माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे हे पत्नी उज्वला शिंदे व नातू शिखर पहाड़िया यांच्यासह उपस्थित होते.
सुशीलकुमार शिंदे यांचे नातू शिखर हे सोलापूरमधील कोणत्याही सार्वजनिक उत्सवात कधी सहभागी होत नव्हते. पण शनिवारी रोजी सिध्देश्वर महायात्रेत सुशीलकुमार शिंदेंसह त्यांचे नातू शिखर देखील उपस्थित होते. मी आता दरवर्षी सिध्देश्वर महायात्रेला हजर राहणार, असे यावेळी शिखर यांनी सांगितले. सुशीलकुमार शिंदे यांना तीन मुलीच आहेत.
प्रणिती शिंदे या सोलापूरच्या राजकारणात सक्रिय आहेत. त्या सोलापूर शहर मध्यमधून आमदार आहेत. शिंदे यांना मुलगा नसल्याने त्यांचा वारस प्रणिती शिंदे यांच्याकडे पाहिले जात होते. मात्र, सुशीलकुमार शिंदेंनी शिखर पहाडिया यांना आणून चर्चा मात्र घडवून आणली आहे. शिंदेंचे नातू शिखर यांनी बोलताना माहिती दिली की, दरवर्षी मी सिध्देश्वर महायात्रेत येणार आहे. समाजकारणातून राजकारणात येणार का, असा प्रश्न विचारताच त्यांनी उत्तर देणे टाळले. याबाबत शिंदेंना देखील यावरच प्रश्न विचारला असता त्यांनी नातू शिखरकडे बोट केले.
सुशीलकुमार शिंदे यांनी त्यांची मोठी मुलगी स्मृती पहाडीया यांचे चिरंजीव शिखर यांना सिद्धेश्वर महायात्रेत आणले. याद्वारे त्यांनी आपल्या विरोधकांना झटका दिल्याचे बोलले जात आहे. यावरून आता आपल्या राजकारणाचा शिखर पहाडिया हेच वारस आहेत की काय असा संदेश तर ते देऊ पाहत नाहीत ना, अशी चर्चा सुरू झाली आहे.