पंढरपूर | सूरज सरवदे
श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमधील परिचारक भालके यांच्या कर्मचारी आघाडीने येणाऱ्या सर्व निवडणुका समविचारी आघाडीच्या माध्यमातून लढवण्याचा आशावाद व्यक्त केला आहे. त्यामुळे आमदार समाधान अवताडे यांची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. Parichara-Bhalke Samavichhari Aghadi has increased the headache of MLA Saadhan Avtade in Pandharpur
नुकताच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये निवडून आलेल्या सरपंच आणि सदस्यांचा सत्कार माजी आमदार प्रशांत परिचारक आणि भगीरथ भालके यांच्या उपस्थितीमध्ये मंगळवेढा येथे पार पडला. त्यावेळी भगीरथ भालके यांनी आमदार समाधान अवताडे यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले होते. अलीकडच्या काळात परिचारक – भालके यांच्यात जवळीकता वाढली आहे.
श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्यामध्ये आमदार समाधान आवताडे यांचा पराभव करण्यासाठी परिचारक आणि भालके यांनी समविचारी आघाडी स्थापन केली. समविचारी आघाडीच्या माध्यमातून कारखान्याची निवडणूक लढवली होती. पहिल्याच प्रयत्नामध्ये समविचारी आघाडीला अभूतपूर्व यश मिळाले. आमदार समाधान आवताडे यांच्यासह त्यांच्या संपूर्ण पॅनलचा पराभव केला. परिचारक गटाचे शिवानंद पाटील अध्यक्ष झाले तर भालके गटाचे तानाजी खरात उपाध्यक्ष झाले. यात समाधान आवताडे गटाला पराभवाला सामोरे जावे लागले.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
दामाजी निवडणुकीत परिचारक – भालके यांच्या युतीला सुरवात झाली. येणाऱ्या नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकीत परिचारक – भालके यांची समविचारी आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढवण्याचा निर्धार केला व्यक्त केला जात आहे.
मंगळवेढा तालुक्यात परिचारक – भालके यांची युती आमदार समाधान आवताडे यांच्यासाठी डोकेदुखी ठरणार आहे. आमदार आवताडे यांच्या बालेकिल्ल्यात परिचारक – भालके यांच्या एकत्र आल्यामुळे आवताडे यांच्या साम्राज्यला धक्का देण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे. पक्षांतर्गत वादातून अवताडे यांना खिंडीत पकडण्याची एकही संधी परिचारक सोडताना दिसत नाहीत. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आल्यानंतर आवताडे – परिचारक एकत्र दिसतात आणि मंगळवेढ्यात मात्र परिचारक विरोधकांसोबत दिसतात.
□ आवताडे – परिचारक यांच्यात दुरावा वाढला
समाधान आवताडे यांनी इतिहासात प्रथमच पंढरपुरमध्ये कमळ फुलवले आहे. पहिल्यांदाच भाजपने पंढरपूरची जागा पटकावली. मात्र निवडणूक पूर्व आवताडे – परिचारक यांच्यातील जिव्हाळा निवडणुकीनंतर राहिला नाही. प्रशांत परिचारक विधानसभेची निवडणूक लढवणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळेच आवताडे- परिचारक यांच्यात दुरावा निर्माण झाला आहे.