मंगळवेढा : पंढरपूर येथे विठ्ठलाच्या दर्शनाला जाणाऱ्या भाविकांच्या बसला भीषण अपघात झाला आहे. विजापूरहून पंढरपूरच्या दिशेने ही बस निघाली होती. चालकाचा बसच्या स्टेअरिंगवरील ताबा सुटल्याने बसला अपघात झाला. या अपघातात 1 जण ठार तर 35 जण जखमी झाल्याची माहिती आहे. चालकावर गुन्हा दाखल झाला असून अटक केलीय. Bus of devotees going for Vitthal darshan met with an accident, one killed and 35 injured Solapur Mangalvedha Pandharpur Gwalior
हा अपघात आज बुधवारी झाला. मंगळवेढ्याजवळ बसला हा अपघात झाला आहे. चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने बस पूर्णपणे पलटी झाली आहे. यानंतर मोठ्या प्रमाणावर बचावकार्य झाले. अतिवेगाने व निष्काळजीपणे लक्झरी बस चालवून पलटी करुन भावीक, महिला रामकुंवरबाई भूपतसिंह गुज्जर (वय 68 रा.मोहनगड,मध्यप्रदेश) हिच्या मृत्यूस व ट्रॅव्हल्समधील 35 भाविकांना गंभीर जखमी केल्याप्रकरणी चालक चंद्रकांत रामगोपाल उच्चार्या (रा.मिर्झापूर ग्वालियर) याला पोलिसांनी अटक केली आहे.
या घटनेची हकिकत अशी, यातील फिर्यादी हणविरसिंह भूपतसिंह गुज्जर (वय 30) हा मयत आई व इतर जखमी भाविक मध्य प्रदेशमधून विजापूर – मंगळवेढा मार्गे पंढरपूर येथे विठ्ठलाच्या दर्शनासाठी जात असताना आज बुधवारी (दि.18) सकाळी 6 वाजता जयभारत टुर्स अँड ट्रॅव्हल्स या कंपनीची लक्झरी (बस नं. यू.पी. 80 एफ. टी.8283 ) चालक चंद्रकांत उच्चार्या याने लक्झरी बस हयगयीने भरधाव वेगात निष्काळजीपणे चालवली.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
वाहन रस्त्याच्या खाली खड्ड्यात पलटी करुन फिर्यादीची आई रामकुंवरबाई गुज्जर (वय 68 ) हिच्या मृत्यूस कारणीभूत ठरला. तसेच अक्का ओझा (वय 60), मानसिंह राठोड, पार्वती गुज्जर (वय 60),सेफकुमारी शर्मा (वय 50), सरोज लोधी (वय 50), सरचनी कुमार कुशवाह,ढिला सिंग (वय 60), रामलाल (वय 65), महाविर राठोड ( वय 76), मुन्नीदेवी (वय 64), राजबाई राठोड (वय 50),खुवाज सिंग (वय 50), नाथूराम (वय 60), सुमेश कुशवाह (वय 25), रामचरण कुशवाह (वय 65), पुरणलाल ओझा (वय 60), रामनिवास राठोड (वय45), धिरजसिंग ओझा (वय 63),बाबुलाल राठोड (वय 70), सिताराम राठोड (वय 71),गोलकुमार कुशवाह (वय 33), मुन्नीबाई कुशवाह (वय 40),रामगोपाल चंदल (वय 40),मुन्नीदेव चंदल,गब्बलाल कुशवाह (वय70), गुलाब गजराम (वय 45),सुलतान पारेहा (वय 50),लिलाबाई कुशवाह (वय 60),गुलाबाई कुशवाह (वय 40), कुमारीबाई राठोड (वय 50), कस्तुरी राजदूत (वय 50),अशीर कुशवाह (वय 50),कुमान सिंह (वय 55),नाथीयाबाई सिंह (वय 55),सुमीकुमार कुशवाह (वय 17) आदी 35 भाविकांना या अपघातात जखमी झाले.
यामधील काही भाविक मंगळवेढा ग्रामीण रुग्णालयात, सोलापूर येथील शासकीय रुग्णालय व अन्य खाजगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले. हा अपघात विजापूर ते पंढरपूर जाणार्या मार्गावरील मंगळवेढा हद्दीतील डिकसळ गावचे शिवारात येड्राव फाट्याच्या जवळ झाला आहे. दरम्यान या अपघाताचे वृत्त समजताच पोलिस निरीक्षक रणजीत माने यांनी घटनास्थळी धाव घेवून जखमींना तात्काळ रुग्णवाहिकेच्या माध्यमातून उपचारासाठी विविध ठिकाणी दाखल केले.
याचा अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक सत्यजीत आवटे हे करीत आहेत. या अपघातामध्ये बाहेरील राज्यातील भाविक जखमी झाल्याने मंगळवेढा तालुक्यात दिवसभर अपघाताविषयी चर्चा होत होती. मोठ्या प्रमाणात अपघातात भाविक जखमी झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.