Friday, January 27, 2023
Surajya Digital
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
  • ब्लॉग
  • अर्थाअर्थ
  • शिवार
  • Techनिक
No Result
View All Result
Surajya Digital
No Result
View All Result

अंधश्रद्धेला फाटा देऊन शिवधर्म पद्धतीने केला अस्थि विसर्जनाचा कार्यक्रम

Wagholi Malshiras performed the bone immersion program in Shivdharma manner by breaking the superstitions

Surajya Digital by Surajya Digital
January 18, 2023
in Hot News, सोलापूर
0
अंधश्रद्धेला फाटा देऊन शिवधर्म पद्धतीने केला अस्थि विसर्जनाचा कार्यक्रम
0
SHARES
109
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

अकलूज :  माळशिरस तालुक्यातील  वाघोली येथील प्रतिष्ठित बागायतदार दत्तात्रेय नारायण मिसाळ यांचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने सोमवारी (ता. 16 जानेवारी) रोजी निधन झाले. आजचा तिसरा दिवस. त्याचं आज अस्थि अंधश्रद्धेला फाटा देऊन शिवधर्म पद्धतीने अस्थि विसर्जनाचा कार्यक्रम झाला. Wagholi Malshiras performed the bone immersion program in Shivdharma manner by breaking the superstitions

कैलासवासी दत्तात्रय नारायण मिसाळ यांच्या अस्थि विसर्जनाचा कार्यक्रम मौजे वाघोली तालुका माळशिरस येथे झाला. त्यांचे पुत्र माळशिरस तालुका संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष दिगंबर मिसाळ त्यांचे कुटुंबातील सर्व सदस्यांनी अस्थि विसर्जनाचा कार्यक्रम अंधश्रद्धेला फाटा देऊन कैलासवासी दत्तात्रय नारायण मिसाळ यांच्या अस्थी नदीच्या पाण्यात विसर्जित न करता वाघोली येथील स्मशानभूमीत सामाजिक कार्याचा भाग म्हणून विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड करून त्यात रोपांच्या खड्ड्यात विसर्जित करण्यात आल्या.

अस्थि विसर्जन व वृक्ष वृक्षारोपण करण्यापूर्वी राष्ट्रमाता जिजाऊ व कैलासवासी दत्तात्रय नारायण मिसाळ यांचे प्रतिमाचे पूजन करण्यात येऊन जिजाऊ वंदना म्हणण्यात आली. त्याच्यानंतर सदर स्मशानभूमीत मिसाळ यांच्या कुटुंबातील सर्व सदस्य नातेवाईक गावातील ज्येष्ठ लोकांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

यावेळी सोलापूर जिल्हा संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सचिन जगताप, पंचायत समितीचे माजी सदस्य सूर्यकांत शेंडगे, पुणे विभागीय मराठा सेवा संघाचे अध्यक्ष उत्तमराव माने तसेच माळशिरस तालुक्यातील संभाजी ब्रिगेड मराठा सेवा संघाचे पदाधिकारी, तंटामुक्त समितीचे माजी अध्यक्ष सुरेश पवार समस्त मिसाळ परिवाराचे नातेवाईक पंचक्रोशीतील ग्रामस्थ उपस्थित होते.

अंधश्रद्धेच्या आहारी न जाता कैलासवासी दत्तात्रय मिसाळ यांचा अस्थि विसर्जनानंतरचे होणारे सर्वच विधी सातव्या दिवशी करण्याचा निर्णय दिगंबर मिसाळ व त्यांच्या कुटुंबाने या ठिकाणी जाहीर केला. या निर्णयाचे सर्व स्तरातून कौतुक होत असून केलेल्या विधी बद्दल उपस्थितांनी समाधान व्यक्त केले.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

● स्थायी समितीचे माजी सभापती किरण पवार यांचे निधन

सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेचे स्थायी समितीचे माजी सभापती किरण गंगाधर पवार यांचं मंगळवारी  (ता. 17) सकाळी प्रदीर्घ आजाराने निधन झालं. ते 51 वर्षांचे होते. त्यांच्या निधनाबद्दल क्रिकेट संघटनेचे चेअरमन रणजितसिंह मोहिते-पाटील, सेक्रेटरी चंद्रकांत रेम्बुर्स यांच्यासह असोसिएशनचे इतर पदाधिकारी, सदस्य व क्रिकेट, खो-खो खेळाडू यांनी शोक व्यक्त केला आहे.

अत्यंत कमी वयात नगरसेवक आणि त्यानंतर सोलापूर महानगर पालिकेच्या स्थायी समितीचे सभापतीपद त्यांनी (2003) अत्यंत कुशलतेनं सांभाळलं. खिलाडू वृत्तीचे असलेले किरण पवार हे खो.खो चे राष्ट्रीय खेळाडू ही होते. त्यांनी विविध क्रीडा, सामाजिक संघटनांवर काम केलं आहे.

 

सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात मोहिते – पाटील यांचे ते अनेक वर्ष खंदे समर्थक म्हणून कार्यरत होते. थोरला मंगळवेढा तालीम मंडळाचे ते प्रमुख पदाधिकारी होते. अक्कलकोट येथील अन्नछत्र मंडळाचेही ते अनेक वर्ष सदस्य होते. त्यांचा मित्रपरिवार सोलापूर शहर जिल्ह्यासह राज्यात सर्वत्र आहे.

किरण गंगाधर पवार यांचा पार्थिव छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील जुन्या निवासस्थानी ठेवण्यात आले होते. सायंकाळी त्यांची अंत्ययात्रा निघून बाळे जुना पुणे नाका स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले.

Tags: #Wagholi #Malshiras #performed #bone #immersion #program #Shivdharma #manner #bybreaking #superstitions#माळशिरस #वाघोली #अंधश्रद्धा #फाटा #शिवधर्म #पद्धती #अस्थिविसर्जन #कार्यक्रम
Previous Post

सुब्रमण्यम स्वामी यांनी यापूर्वी श्री विठ्ठलाचे दर्शन घेतले होते का ? – भारत पाटणकर यांचा सवाल

Next Post

विठ्ठल दर्शनासाठी चाललेल्या भाविकांच्या बसला अपघात, एक ठार तर 35 जखमी

Surajya Digital

Surajya Digital

Next Post
विठ्ठल दर्शनासाठी चाललेल्या भाविकांच्या बसला अपघात, एक ठार तर 35 जखमी

विठ्ठल दर्शनासाठी चाललेल्या भाविकांच्या बसला अपघात, एक ठार तर 35 जखमी

वार्ता संग्रह

January 2023
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Dec    

ट्विटर पेज

Currently Playing

About Us

SurajyaDigital
सुराज्य डिजिटल हा ब्रँड जगाच्या काना-कोपऱ्यातील सर्वंकष माहितीचा अचूक खजिना आपल्यापर्यंत पोहोंचविण्याचे काम करतोय. टाईम मीडिया हाऊसचा हा ब्रँड अल्पावधीतच मराठी वाचकांचा अत्यंत विश्वासार्ह ब्रँड बनला आहे.जगभरातील घटनांचा वेगवान आढावा घेत त्यावर भाष्य करण्याबरोबरच वाचकांच्या आवडीचे विषय, करमणूक यासारखे दृक्श्राव्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी सुराज्य डिजिटल कटीबद्ध आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा timemediahouse@gmail.com timemarathi@gmail.com
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697