□ पंढरीत विठोबा रखुमाई मुक्ती दिन साजरा
पंढरपूर : विठोबा रखुमाई मुक्ती दिन येथील संत तुकाराम भवन येथे दिनांक १७ जानेवारी रोजी साजरा करण्यात आला. यावेळी बोलताना कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी डॉ. भारत पाटणकर म्हणाले की आज हे विठ्ठल रुक्मिणी मंदिर हे शासनाच्या म्हणजे सरकारच्या ताब्यात आहे. Did Subramaniam Swamy have darshan of Sri Vitthala before? – Bharat Patankar’s Saval Vithoba Rakhumai Mukti Din म्हणजेच वारकऱ्यांच्या ताब्यात असल्याचे सांगत सुब्रमण्यम स्वामी यांनी यापूर्वी कधी श्री विठ्ठल रुक्मिणीमातेचे दर्शन घेतले आहे का? असा सवाल करत स्वामींना टोला लगावला.
पुढे बोलताना डॉ. पाटणकर म्हणाले की ज्या धर्म मार्तंडाची मक्तेदारी येथे होती. ती पांडुरंगाच्या कृपेने तसेच संत सज्जनांच्या प्रयत्नाने हे धर्म मार्तंडांना येथून घालवण्याचे कार्य श्री विठ्ठल रुक्मिणी यांच्या आशीर्वादाने झाले आहे. या ठिकाणी सर्व जाती धर्माचे लोक गोरगरीब, कष्टकरी, दिन दलित सर्व जातीतील लोक येथे भक्ती भावाने येतात. या सर्व भक्तांना ज्या पद्धतीने हे धर्म मार्तंड वागणूक देत होते. त्याची परिमिती म्हणून हे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर या धर्म मार्तंडाच्या ताब्यातून आज मुक्त झाले आहे. म्हणून श्री विठोबा रखुमाई मुक्ती दिन हा साजरा केला जात असल्याचे डॉ. पाटणकर यांनी सांगितले.
वारकऱ्यांनी ज्याप्रमाणे आषाढी, कार्तिकी व अन्य वारी वारीला जसे दिंडी, पताके घेऊन येतात अशाच प्रकारे पुढील मुक्ती दिनानिमित्त सर्व वारकऱ्यांनी पंढरपुरात दाखल व्हावे असे आवाहन कार्यक्रमाचे अतिथी कुरुंदकर महाराज यांनी केले.
यावेळी ह.भ.प बागल महाराज, विवेक पाटील, मोहन अनपट, किरणराज घाडगे, राधेश बादले-पाटील, बाळासाहेब बागल,रवींद्र सर्वगोड, सोपानकाका देशमुख,सागर चव्हाण आदी उपस्थित होते.
सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर बडवे आणि उत्पात सेवाधारी यांचे अधिकार संपुष्टात येऊन मंदिर शासनाच्या ताब्यात गेले. हा दिवस विठोबा रखुमाई मुक्ती दिन म्हणून श्री विठोबा रखुमाई मुक्ती आंदोलन या बॅनरखाली साजरा केला जातो.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
□ बंडातात्यांसारख्या महात्म्यांची या राज्याला व देशाला गरज : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
वेळापूर : महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. या संतांच्या विचारांचा जागर महाराष्ट्रभर करणारे श्रद्धेय बंडातात्या कराडकर हे आमच्यासाठी सदैव पूज्य आहेत. त्यांनी आज पावेतो केलेली संत साहित्याची साधना व व्यसनमुक्त महाराष्ट्र चळवळ याची नोंद संपूर्ण महाराष्ट्राकडे आहे. त्यांना झालेला पक्षघाताचा त्रास यासाठी ते मागील काही दिवसांपासून पुणे येथे अत्यावश्यक उपचारांसाठी दाखल झाले आहेत.
तात्यांच्या उपचारांचे वृत्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना समजता क्षणी बंडातात्या जितके समाजाचे तितकेच ते माझेदेखील आहेत, ही भावना मनाशी बाळगून एकनाथ शिंदेच्या वतीने मागील ३ दिवस स्वतः मुख्यमंत्री आरोग्य कक्ष प्रमुख मंगेश चिवटे हे मुंबई आणि नागपूरहून प्रवास करत व्यक्तिगतरित्या भेट देऊन सुरु असणाऱ्या उपचारांवर लक्ष ठेऊन आहेत.
दरम्यानच्या काळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट व्हिडिओ कॉलद्वारेही तात्यांशी संवाद साधला. तात्यांचा अनुयायी व परिवार वर्ग हा खूप मोठा आहे. मात्र तात्या हे माझ्या कुटूंबाचा भाग आहेत. त्यांनी आजपवेतो धर्मरक्षणासहित समाजहितासाठी दिलेलं योगदान पाहता त्यांच्या उपचारासाठी मी व्यक्तिगत लक्ष देणे गरजेचे तसेच माझे कर्तव्य आहे ही संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भावना आहे व त्यांच्या रुग्णालयातील सर्व उपचारांसाठी येणारा खर्च देखील त्यांच्या सर्व परिवाराचा आदर राखत आम्ही करणे हे माझे कर्तव्य आहे.
डॉ.श्रीकांत शिंदे यांचे देखील विशेष लक्ष उपचारांवर आहेत. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या वतीने तात्यांच्या उपचारार्थ येणाऱ्या संपूर्ण खर्चाचा धनादेश मंगेश चिवटे यांनी व्यसनमुक्त युवक संघाकडे केवळ सेवा या भावनेने कुठेही चर्चा न करता सुपूर्दही केला. धर्मवीर आध्यात्मिक सेनेचा प्रदेशाध्यक्ष या नात्याने व माझे तात्यांचे पारिवारिक सबंध असल्याने व्यक्तीगतरीत्या आम्ही देखील रुग्णालयातच बहुतांश वेळ उपस्थित आहोत.
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेला व्यसनमुक्त युवक संघाचा प्रत्येक कार्यकर्ता तात्यांवर जीवापाड किती प्रेम करतो हे याची देही याची डोळा मी मागील अनेक दिवस अनुभवतोय . माझ्या सर्व गुरुबंधूंना आपण दाखवलेल्या संयम व शिस्तीबद्दल देखील विशेष आभार मानतो.
या वेळी व्यसनमुक्त युवक संघटनेचे मार्गदर्शक बाळासाहेब निकम, विलास जवळ, शहाजी काळे, राजेंद्र आडसुले,भानुदास वैरट, नंदकुमार जगताप, नितीन माने देशमुख, कल्याण तावरे, संदीप होले, विवेक राऊत, स्वप्नील भापकर,राजेंद्र कानडे, दिपक जाधव आदी उपस्थित होते.