Friday, January 27, 2023
Surajya Digital
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
  • ब्लॉग
  • अर्थाअर्थ
  • शिवार
  • Techनिक
No Result
View All Result
Surajya Digital
No Result
View All Result

फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन मुलीवर अत्याचार; तरुणाला सुनावली कोठडी

Abuse of girl by threatening to make photo viral; The youth was sentenced to custodial court and sentenced to hard labor for kidnapping

Surajya Digital by Surajya Digital
January 18, 2023
in Hot News, गुन्हेगारी, सोलापूर
0
फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन मुलीवर अत्याचार; तरुणाला सुनावली कोठडी
0
SHARES
137
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

सोलापूर – माढा तालुका परिसरात नातेवाईकाच्या घरात असताना अल्पवयीन तरुणीचे काढलेले फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी सुजित शिवाजी गाडे (वय २४ रा.सातोली ता.करमाळा) याला टेंभुर्णीच्या पोलिसांनी अटक केली. त्याला ७ दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश बार्शीच्या न्यायालयाने मंगळवारी दिला. Abuse of girl by threatening to make photo viral; The youth was sentenced to custodial court and sentenced to hard labor for kidnapping

 

ती अल्पवयीन तरुणी नातेवाईकाच्या घरात असताना सुजित गाडे या तरुणाने तिचे फोटो काढले होते. त्यानंतर फोटो मोबाईलवर व्हायरल करण्याची धमकी त्याला दिली होती. ती तरुणी लातूर येथे असताना तिला भेटून त्याने तिला ठार मारण्याची धमकी दिली. पुढे तुळजापूर येथील लॉजवर नेऊन तिच्यावर अत्याचार केला. हा प्रकार त्याने ऑक्टोबर २०२२ ते जानेवारी या दरम्यान केला. अशा आशयाची फिर्याद पीडित तरुणीने पोलिसात दाखल केली. त्याप्रमाणे पोलिसांनी सुजित गाडे याच्याविरुद्ध पोक्सो आणि अत्याचाराचा गुन्हा दाखल करून अटक केली. त्याला २३ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला. पुढील तपास सहाय्यक निरीक्षक जोग करीत आहेत.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

 

》 अपहरण प्रकरणी आरोपीस दोन वर्ष सक्तमजुरी

 

सोलापूर : लग्नाच्या आमिषाने मुलीला पळवून नेल्याप्रकरणी आरोपी कोडग्या हरकून काळे (वय 32, रा. मोहोळ) याला जिल्हा न्यायाधीश कविता शिरभाते यांनी दोन वर्षे दहा महिने सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली.

 

13 जानेवारी 2016 रोजी सकाळी पिडीतेची आई शेळ्या घेवून चरण्यासाठी गेली होती. त्यावेळी पिडीता एकटीच घरी होती. संध्याकाळी शेळ्या घेवून पिडीतेची आई घरी आली. त्यावेळेस पिडीता घरी दिसली नाही. शेजारी व नातेवाईकाकडे चौकशी केली असता पिडीता मिळून आली नाही. काही दिवसानंतर पिडीता ही आरोपीकडे असल्याचे कळल्याने फिर्यादी ही आरोपी हा जवळचा नातलग असल्याने त्याच्यागावी जावून तिची भेट घेतली. तेव्हा आरोपीने तिला गोड बोलून तुझ्याबरोबर लग्न करतो असे आमिष दाखवून तिला गाडीवर नेऊन तिच्याशी जबरदस्ती केली. त्यामुळे फिर्यादीने कामती पोलिसात गुन्हा दाखल केला.

 

आरोपी फरार असल्यामुळे तपासी अंमलदाराने न्यायालयात सी.आर.पी.सी. 299 प्रमाणे दोषारोपपत्र दाखल केले. त्यानंतर तपासी अंमलदारास आरोपी हा दुसर्‍या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडीत असल्याचे कळाल्याने त्यास या गुन्ह्यात वर्ग करून त्याच्याविरुध्द पुरवणी दोषारोपपत्र पाठविण्यात आले. यात फिर्यादीची आई, पंच, वैद्यकीय अधिकारी व तपासी अंमलदार यांची साक्ष महत्वाची ठरली. विशेष म्हणजे यामध्ये पिडीतेने सरकारपक्षास सहाय्य केले नाही.

 

यात आरोपीने फिर्यादीस गोड बोलून फुस लावून लग्नाचे आमिष देवून त्याच्या गाडीवर नेल्याचा युक्तीवाद सरकारपक्षातर्फे साक्षीपुराव्याद्वारे करण्यात आला. तो युक्तीवाद ग्राहय धरुन जिल्हा व सत्र न्यायाधीश शिरभाते यांनी आरोपी कोडग्या काळे यास त्याने आजपर्यंत भोगलेला तुरुंगवास म्हणजे 2 वर्षे 10 महिने 14 दिवसांची शिक्षा दिली. पाच हजार रुपये दंड ठोठावला. दंडाची संपूर्ण रक्कमपिडीतेस नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. यात सरकारतर्फे अ‍ॅड. प्रकाश जन्नु व आरोपीतर्फे अ‍ॅड. राजेंद्र बायस यांनी काम पाहिले.

 

Tags: #Abuse #girl #bythreatening #photo #viral #youth #sentenced #custodial #court #sentenced #hardlabor #kidnapping#फोटो #व्हायरल #धमकी #मुली #अत्याचार #तरुण #सुनावली #कोठडी #न्यायालय #अपहरण #सक्तमजुरी
Previous Post

सीसीएच ॲप प्रकरणी आरोपींच्या कोठडीत वाढ, आरोपींमध्ये नाव वाढवले

Next Post

सुब्रमण्यम स्वामी यांनी यापूर्वी श्री विठ्ठलाचे दर्शन घेतले होते का ? – भारत पाटणकर यांचा सवाल

Surajya Digital

Surajya Digital

Next Post
सुब्रमण्यम स्वामी यांनी यापूर्वी श्री विठ्ठलाचे दर्शन घेतले होते का ? – भारत पाटणकर यांचा सवाल

सुब्रमण्यम स्वामी यांनी यापूर्वी श्री विठ्ठलाचे दर्शन घेतले होते का ? - भारत पाटणकर यांचा सवाल

वार्ता संग्रह

January 2023
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Dec    

ट्विटर पेज

Currently Playing

About Us

SurajyaDigital
सुराज्य डिजिटल हा ब्रँड जगाच्या काना-कोपऱ्यातील सर्वंकष माहितीचा अचूक खजिना आपल्यापर्यंत पोहोंचविण्याचे काम करतोय. टाईम मीडिया हाऊसचा हा ब्रँड अल्पावधीतच मराठी वाचकांचा अत्यंत विश्वासार्ह ब्रँड बनला आहे.जगभरातील घटनांचा वेगवान आढावा घेत त्यावर भाष्य करण्याबरोबरच वाचकांच्या आवडीचे विषय, करमणूक यासारखे दृक्श्राव्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी सुराज्य डिजिटल कटीबद्ध आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा timemediahouse@gmail.com timemarathi@gmail.com
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697