□ थकीत कर वसुलीला प्राधान्य देण्यावर प्रशासनाचा भर
सोलापूर : सोलापूर महापालिकेच्या अंदाजपत्रकासाठी तयारी सुरू आहे. याबाबत बैठकही पार पडली आहे. यंदाचे अंदाजपत्रक हे वास्तववादी राहील. वाढीपेक्षाही थकीत कर वसुलीला प्राधान्य देणार असल्याचे महापालिका आयुक्त शीतल तेली – उगले यांनी स्पष्ट केले. This year’s budget of the Municipal Corporation will be realistic: Commissioner Teli – Ugle Solapu picture exhibition
महापालिका प्रशासनाकडून यंदाच्या अंदाजपत्रक तयारीसाठी लगबग सुरू आहे. यासाठी नुकतीच एक बैठकही घेण्यात आली आहे. थकीत वसुली करण्यात येत असताना खर्च मात्र जैसे ते आहे. गेल्या अनेक वर्षापासूनची थकबाकी त्याचबरोबर चालू कर असे दोन्ही मिळून ३० टक्के वसुलीचे प्रमाण आहे. तर चालू कर वसुलीमध्ये ८८ टक्के वसुली करण्यात यश आले आहे. महापालिका प्रशासनाकडून या थकबाकी वसुलीकडे प्राधान्याने लक्ष देण्यात येत आहे.
दरम्यान, यंदाचा महापालिकेचे अंदाजपत्रक हे वास्तववादी राहील. यंदाचा अंदाजपत्रके वास्तववादी करण्याचा प्रयत्नराहील. कोणत्याही वाढीपेक्षा थकबाकी वसुलीला प्रशासन प्राधान्य देणार आहे. दरम्यान, उत्पन्न वाढीसाठी नवे स्त्रोत्र काही निर्माण करता येतील का? याचाही विचार करण्यात येत असल्याचेही आयुक्त उगले यांनी यावेळी सांगितले.
• रेडीरेकनर संदर्भात शासन आदेशामुळे वसुलीला ब्रेक
रेडीरेकनर दरासंदर्भात गाळे भाडे वसुलीला शासनाने सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना स्थगितीचे आदेश दिले आहेत. यामुळे सोलापूर महापालिकेच्या गाळे भाडे वसुलीला ब्रेक लागला आहे. यामुळेही उत्पन्नावर परिणाम झाला असल्याचे आयुक्त शितल तेली – उगले यांनी सांगितले.
• कनिष्ठ अभियंत्यांच्या बदल्या
महापालिकेतील कनिष्ठ अभियंत्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. कामाच्या सोयीसाठी या बदल्या करण्यात आल्याचे महापालिका आयुक्त तेली-उगले यांनी स्पष्ट केले.
》 डॉ . सुहास सरवदे यांच्या चित्रांचे प्रदर्शन
सोलापूर : येथील नेत्ररोग तज्ज्ञ डॉ सुहास सरवदे यांच्या चित्राचे प्रदर्शन उद्या गुरुवारी (ता. 26 जानेवारी) आय एम ए हॉल येथे आयोजित करण्यात आले आहे.
या प्रदर्शनात व्यक्तिचित्रे , वस्तुचित्रे , निसर्गचित्रे आणि वन्यजीवांची चित्रे यांचा समावेश आहे. ही चित्रे वेगवेगळ्या माध्यमातून साकारलेली आहेत. सर्व चित्रातला जिवंतपणा वाखाणण्याजोगा आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
या प्रदर्शनाचे उद्घाटन डॉ वैशंपायन महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांच्या हस्ते दिनांक 25 जानेवारी रोजी संध्याकाळी 7.00 वाजता होणार आहे . सदर प्रदर्शन सोलापूर आय एम ए यांच्यातर्फे आयोजित करण्यात आले आहे अशी माहिती आय एम ए चे अध्यक्ष डॉ वच्चे यांनी दिली.
या प्रदर्शनाचा आस्वाद समस्त सोलापूरकरांनी घ्यावा असे त्यांचे आवाहन आहे . प्रदर्शनाची वेळ दिनांक 26 जानेवारी रोजी सकाळी 8.00 वाजल्यापासून ते रात्रौ 9.00 वाजेपर्यंत आहे.
》 सोलापूरच्या स्नेहा पुळूजकर यांची न्यायाधीशपदी निवड
सोलापूर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या दिवाणी न्यायाधीश कनिष्ठस्तर व प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी या परीक्षेत सोलापूरच्या स्नेहा सुनील पुळूजकर यांनी पहिल्याच प्रयत्नात प्रथम येण्याचा मान मिळवला आहे. स्वतः पुळूजकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
स्नेहा पुळूजकर यांचे दहावीपर्यंतचे शिक्षण सेवासदन प्रशाला येथे तर विज्ञान शाखेतील महाविद्यालयीन शिक्षण दयानंद महाविद्यालयात झाले असून बी.ई. अभियांत्रिकीची पदवी त्यांनी नागेश करजगी ऑर्किड महाविद्यालयातून संपादन केली आहे. त्यानंतर दयानंद विधी महाविद्यालयातून एलएल.बी.करून एलएल.एम.मध्ये सोलापूर विद्यापीठातून त्यांनी गोल्डमेडल प्राप्त केले आहे.
सोलापूर येथील सेवासदन प्रशालेतून दहावी तर दयानंद महाविद्यालयातून बारावी विज्ञान शाखेतून शिक्षण पूर्ण केले. स्नेहाचे वडील सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत शिपाई पदावर- तर आई जिल्हा क्षयरोग केंद्रात कक्ष सेविका म्हणून कार्यरत असून सामान्य परिस्थितीतून आपण न्यायाधीश परीक्षेतील यश संपादन केल्याचे त्यांनी सांगितले.
यासाठी आपल्याला ॲड. सत्यनारायण माने, ॲड. गणेश पवार यांचे मार्गदर्शन लाभल्याचेही त्या म्हणाल्या. ॲड. ए. बी. अंदोरे यांच्याकडे आपण जुनियर म्हणून काम केल्याचेही त्यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेस पुळूजकर यांचे वडील सुनील पुळूजकर, आई उज्ज्वला पुळूजकर, भाऊ ॲड. सुयश पुळूजकर तसेच किरण फडके आदी उपस्थित होते.