मुंबई : नगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यात व इतर ठिकाणी गारपीट झाली आहे. नेवासा व कर्जतमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला आहे. या पावसामुळे रब्बी पिकांचे नुकसान झाले आहे. गव्हासह कांदा, हरभरा, मका या पिकांवर या अवकाळी पावसाचा परिणाम झाला आहे. Unseasonal rain, hail in the state; Cloudy weather in many districts resulted in farmers gram onion crop
काल सकाळपासूनच नगर जिल्ह्यात ढगाळ वातावरण होते. हवेतील गारठादेखील वाढलेला होता. त्यामुळे पिकांवर कीड पडण्याचा धोका वाढला आहे. अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यात व इतर ठिकाणी गारपीट झाली आहे. नेवासा व कर्जतमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला आहे.
अहमदनगर शहरासह दक्षिण भागामध्ये रात्री अवकाळी पावसाने हजेरी लावली. श्रीगोंदा,कर्जत, जामखेड या भागात जोरदार पाऊस पडला. यामुळे शेतकऱ्यांच्या रब्बीतील ज्वारी गहू हरभरा या पिकांचं मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे. मागील तीन-चार दिवसांपासून वातावरणामध्ये बदल झाला असून थंडी कमी झाल्याचे जाणवत होते…अशातच रात्री अचानक पाऊस सुरू झाला तब्बल एक तास पडलेल्या या अवकाळी पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झालं. अवकाळीमुळे शेतकरी संकटात सापडला आहे.
मराठवाड्यात बीड, औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यातील काही भागात हलक्या स्वरुपाचा पाऊस झाला. या अवकाळी पावसामुळे रब्बी पिकांचे नुकसान झाले आहे. गव्हासह कांदा, हरभरा, मका या पिकांवर या अवकाळी पावसाचा परिणाम झाला आहे. काल सकाळपासूनच महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात ढगाळ वातावरण होते.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
#कोल्हापूर : कसबा बावडा – शिये परिसरात जोरदार पाऊस सुरू.. अवकाळी चा ऊस तोडणीला फटका#Kolhapur #Pune #Mumbai #Maharashtra #India #rain pic.twitter.com/2wPQDSrwrW
— SUNlL P. PATIL (@PatilSunilSakal) January 25, 2023
राज्यात थंडीचा कडाका वाढला असताना अवकाळी पाऊस झाल्याने याचा फटका शेतीला बसला आहे. आधी औरंगाबाद जिल्ह्यात आणि परिसरात पाऊस पडला. त्याच्या दुसऱ्या दिवशी बुलडाणा, अहमदनगर जिल्ह्यात चांगला पाऊस झाला. बीड, जालना, नेवाश्यात अवकाळी पाऊस झाला. त्यामुळे काढणीला आलेल्या पिकांना फटका बसला आहे. या अवकाळी पावसाने शेतकरी चिंतेत आहेत.
याआधी अतिवृष्टी आणि त्यानंतर परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचा खरीप हंगाम पूर्णपणे वाया गेला आहे. त्यामुळे रब्बीतून काहीतरी हाती येईल, अशी अपेक्षा असतानाच, आता अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची चिंता वाढवली आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली होती. काही ठिकाणी रिमझिम तर, काही ठिकाणी जोरदार पाऊस कोसळला. तर काही ठिकाणी विजाच्या कडकडाटासह जोरदार पाऊस कोसळला. सध्या रब्बीचा हंगाम सुरु असून, हाती आलेल्या पीकांचं या अवकाळी पावसाने नुकसान झाले आहे.
बुलडाणा जिल्ह्यात अवकाळी पाऊस पडला. विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. काही ठिकाणी गारपीट देखील झाली. त्यामुळे रब्बीच्या पिकांना मोठा फटका बसण्याची शक्यताय. हवामान खात्यानं पावसाचा अंदाज वर्तवला होता. या अवकाळी पावसामुळे काढणीला आलेल्या पिकांना फटका बसला आहे. बुलडाणा शहरासह जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला.
हवामान खात्याचा अंदाज खरा ठरत पावसाने बुलडाण्यात धोधो कोसळत आहे. सकाळ पासूनच जिल्ह्यात ढगाळ वातावरण असून विजांच्या कडकडातांसह अवकाळी पाऊस झालाय. रब्बीच्या पिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. कारण काढणीला आलेली आणि काही ठिकाणी काढलेल्या शेतमालाला शेतकरी साठवून ठेवण्याचा आधीच हा पाऊस बरसला आहे, त्यामुळे शेतकऱ्यांची तारांबळ उडाली आहे.
सिंधुदुर्गात येत्या दोन दिवसात हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तविली आहे. त्यामुळे आंबा, काजू पिकांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. काही दिवसांपासून दमट वातावरण निर्माण झाल्याने थंडीचं प्रमाण कमी झाले आहे. याचाही फटका आंबा आणि काजू पिकाला बसण्याची शक्यताय. या पिकांवर करपा रोग आणि फुलकिडीचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी शेतक-यांना दक्षता घेण्याचे आवाहन ग्रामीण कृषी मौसम सेवा केंद्राकडून करण्यात आले आहे.