सोलापूर : तिरुपती बालाजी येथे दर्शन घेऊन पुढे जात असताना बुधवारी (ता. २५) दुपारी तवेरा कार रस्ता दुभाजकाला धडकून झालेल्या अपघातात सोलापूरचे चार जण ठार झाले तर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. या नऊ जणांनी तिरूपती बालाचीचे दर्शन घेतल्यानंतर सेल्फी काढला. त्यावेळी त्यांनी अशी पोज दिली होती. यातील चारजणांची शेवटची पोज ठरली. Twins in Solapur; After darshan, the last pose decided is Tirupati Balaji four death selfie
दरवर्षी हे मित्र तिरुपती बालाजी येथे दर्शनासाठी जात असतात. २४ जानेवारीला मित्र राहुल इराणी याचा वाढदिवस असल्याने ते सोलापुरातून २३ जानेवारीला तिरुपती बालाजी येथे दर्शनासाठी निघाले होते. या सर्व मित्रांनी व्हीव्हीपी कॉलेजमध्ये इंजिनिअरिंग पूर्ण केलं असून, एकाच गल्लीत राहत होते. हे सर्व मित्र सामाजिक कार्यक्रमात मोठ्या उत्सहाने सहभागी व्हायचे. अशी माहिती तेथील उपस्थित नागरिकांनी दिली. अपघाताची बातमी जुळे सोलापूर पसरतात तेथील परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे..
तिरुपती इथं बालाजीच्या दर्शनासाठी गेलेल्या सोलापुरातील तरुणांच्या वाहनाला भीषण अपघात झाला. यामध्ये चार जणांचा जागीच मृत्यू झाला असून इतर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यात अंतर अनंत टेंबूकर, मयुर मुत्तन, ऋषिकेश जंगम व अजय लुट्टे या चौघांचा मृत्यू झाल्याचे स्थानिक पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. जुळे सोलापुरातील नऊ जण तिरुपती बालाजी येथे चार चाकी कारने गेले होते.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
तिरुपती बालाजी येथील दर्शन घेतल्यानंतर सोलापूरला वापस परतत असताना त्यांची कार डिव्हायडरला धडकल्याने हा अपघात आज बुधवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास चंद्रगिरी मंडळातील नायडूपेठ-पूथलापट्टू या मुख्य रस्त्यावर घडला.
अपघात इतका भयानक होता की कारच्या समोरील भागाचा चुराडा झाला आहे. भरधाव वेगाने निघालेली चार चाकी (क्र.एम.एच.१२.पी.एच.९७०१) यातील चार जणांचा जागीच मृत्यू झाला तर इतर पाचजण गंभीररित्या जखमी झाले. जखमींना तातडीने रुग्णवाहिकेतून तिरुपती रुईया रुग्णालयात हलवण्यात आले.घटनेची माहिती मिळताच पश्चिम डीएसपी नरसप्पा रुया रुग्णालयात पोहोचले. चंद्रगिरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.
》 राष्ट्रपती पदकाची घोषणा
राष्ट्रपती पदकाची आज घोषणा झाली आहे. देशातील 901 पोलीसांचा सन्मान करण्यात येणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील 74 पोलीसांचा समावेश आहे. यात 31 जणांना पोलीस शौर्यपदकाने गौरविले जाणार आहे. तर 39 जणांना पोलीस पदकाने आणि 4 जणांना राष्ट्रपती पदकाने सन्मानित करण्यात येणार आहे. राष्ट्रपती पदकामधील एक नाव मुंबईचे विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती यांचे आहे.