● अश्वाचे मुख्य रिंगण सोहळ्याने वातावरण ‘माऊलीमय’
सोलापूर : माघवारीला पंढरपूरकडे पायी चालत जाण्याची मोठी परंपरा सोलापूरमध्ये आहे. श्री मार्कंडेय मंदिर येथून दुपारी ४ वाजता सर्व पालख्यांचे प्रस्थान झाले. नार्थकोट प्रशाला याठिकाणी सर्व दिंड्या आल्यानंतर ह.भ.प.सुधाकर महाराज इंगळे यांच्या नेतृत्वखाली मोठ्या भक्तिमय वातावरणात हा रिंगण सोहोळा पार पडला. Mauli’s horse’s grand round arena ceremony was held in Solapur maghwari
यावेळेस खासदार जयसिद्धेश्वर महास्वामी, ह.भ.प. भागवत महाराज चवरे, ह.भ.प.विष्णू महाराज केंद्रे, आमदार विजयकुमार देशमुख, शिवाजी सावंत, उद्योजक दत्ताअण्णा सुरवसे, माजी नगरसेवक आनंद चंदनशिवे, शिवानंद पाटील, अमोल शिंदे, ज्ञानेश्वर सपाटे, अमोल भोसले, शेखर फंड, दिलीप कोल्हे, नाना काळे, माऊली झांबरे, दत्ता मुळे आदी उपस्थित होते.
वारकरी परंपरे प्रमाणे बंडोपंत कुलकर्णी (जिल्हा अध्यक्ष ), दत्तात्रय भोसले (शहर सचिव) यांचे माध्यमातून नित्यनेम पुर्ण करुन ह भ प भागवत महाराज चवरे पंढरपूर (राष्ट्रिय उपाध्यक्ष), मधुकर गायकवाड (समिती अध्यक्ष), तानाजी बेलेराव (समिती अध्यक्ष), नामदेव पुलगम (शहर संपर्क प्रमुख) या मान्यवरांच्या शुभ हस्ते संत ज्ञानेश्वर महाराज पालखी व संत तुकाराम महाराज पालखी पूजन करण्यात आले.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
रिंगण सोहळ्यासह अधिक व्हिडिओ पाहण्यासाठी surajya digital फेसबुक पेजला भेट द्या
यावेळी वारकरी संप्रदायाच्या वैभवामध्ये सर्व दिंडीतील भाविकांनी नॉर्थकोट मैदानामध्ये आगमन केल्यानंतर उपस्थित मान्यवरांचा अखिल भाविक वारकरी मंडळ पदाधिकारी जोतीराम चांगभले, बळिराम जांभळे, किसन कापसे,मोहन शेळके , संजय पवार, मधुकर महाराज गायकवाड यांच्या कडून ज्ञानेश्वरी ग्रंथ भेट देऊन सन्मान करण्यात आला.
त्यानंतर प्रत्येक दिंडीतील ध्वजाधारी यांनी पालखीला गोल प्रदक्षिणा मारून रिंगण सोहळ्यास प्रारंभ झाला. तुळशी वृंदावनधारी महिलांचे व मृदंगवादकांचे रिंगण झाल्यानंतर विणेकरी व चोपदारांच्या रिंगणास उत्साहामध्ये प्रारंभ झाला. विणेकरी हे प्रत्येक दिंडीतील मानकरी असतात व ते वयोवृद्ध असतात. तरीसुद्धा या वातावरणामध्ये एक वेगळीच उर्मी त्यांच्या शरीरात प्रवेश करून हे सर्वजण धावत रिंगण पूर्ण करतात.
शेवटी आषाढी वारीतील माउलींच्या अश्वाचे मुख्य रिंगण सुरू झाले आणि संपूर्ण वातावरण माऊलीमय झाले.
रिंगण पूर्ण झाल्यानंतर पालखी सोहळा परंपरेने महादेव मंदिर, साठे चाळ सोलापूर या ठिकाणी येऊन आनंद (दादा ) चंदनशिवे , विजय चोरमुले यांचे हस्ते आरती होऊन नित्यनेमाचे कीर्तन श्री संत मुक्ताई प्रतिष्ठान यांचे कडून करून समारोप करण्यात आला आहे. सोलापूर शहर व जिल्ह्यातील हजारो भाविकांची कार्यक्रमासाठी उपस्थिती होती . ह भ प सुधाकर महाराज इंगळे (राष्ट्रिय अध्यक्ष) यांचे मार्गदर्शनाने अखिल भाविक वारकरी मंडळ यांचे माध्यमातून माघवारी पालखी सोहळा व रिंगण सोहळा संपन्न झाला.