Wednesday, March 29, 2023
Surajya Digital
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
  • ब्लॉग
  • अर्थाअर्थ
  • शिवार
  • Techनिक
No Result
View All Result
Surajya Digital
No Result
View All Result

ऊस तोडणी मजूर दाम्पत्य एका रीलनं रातोरात स्टार

sugarcane cutting labor couple overnight star beed hazare family instagram sugar factory with one reel

Surajya Digital by Surajya Digital
January 28, 2023
in Hot News, शिवार, सोलापूर
0
ऊस तोडणी मजूर दाम्पत्य एका रीलनं रातोरात स्टार
0
SHARES
170
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

□ मेहनतीच्या कामातून विरंगुळा म्हणून इन्स्टाग्रामवर ‘रील’ बनविण्याचा छंद

 

सोलापूर : ऊसतोड कामगार म्हटलं की समोर दिसतो तो उसाचा फड आणि उसाचा कारखाना. ऊस तोडणीला जाणाऱ्या कामगारांचे काम पाहिलं तर भल्याभल्यांच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही. आतापर्यंत ऊसतोड कामगारांच्या अनेक समस्या पाहायला मिळाल्या आहेत.  sugarcane cutting labor couple overnight star beed hazare family instagram sugar factory with one reel या ऊसतोड कामगारांना ऊस तोडणी मधून वेळच मिळत नाही. मात्र या सगळ्याला अपवाद ठरलंय बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील सोनाखोटा गावातील हजारे कुटुंब. गेल्या वीस ते पंचवीस वर्षापासून ऊस तोडणीला जाणारं हजारे कुटुंब अचानक महाराष्ट्रभर प्रसिद्ध झालंय. त्यामागचं कारणही तसंच आहे.

 

अशोक हजारे त्यांच्या पत्नी मनिषा हजारे यांनी ‘सुराज्य डिजिटल’ शी बोलताना सांगितले, की ऊसतोडणीसाठी घरापासून सहा महिने दूर असतो. समोर फक्त ऊस ,बैल आणि कष्ट हेच दिसते परंतु आमचे दु:ख, काबाडकष्ट हे कुणालाही दिसत नाही. हे जगाला समजावे आणि त्यातून आमच्या साठी कुणीतरी पुढे येत आधार द्यावा तसेच दररोजच्या मेहनतीच्या कामातून विरंगुळा म्हणून आम्ही कष्ट करीत असतानाचा रिल तयार करून तो इन्स्टाग्रामवर टाकला त्यानंतर हजारो लाईक आणि कमेंट्स आल्या त्यानंतर रिल बनविण्याचा जणू छंदच लागला.

 

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

दैनंदिन आयुष्याशी संबंधित व्हिडीओ इन्स्टावर अपलोड करू लागले. मात्र यामध्ये सरस ठरला तो दोघे ऊस घेऊन कारखान्यावर बैलगाडीतून जात असलेल्या व्हिडीओ. त्यामुळे हे कष्टकरी हजारे दाम्पत्य रातोरात स्टार झालं. सोशल मीडियावर या व्हिडीओनं हवा केली.  सध्या ते ऊस तोडणीसाठी सांगली जिल्ह्यात असलेल्या शिवशक्ती साखर कारखान्यात ऊस तोडणीचं काम करतात. ऊस तोडणीसारख्या मेहनतीच्या कामातून विरंगुळा म्हणून त्यांनी इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करण्यास सुरुवात केली.

आपल्या दैनंदिन आयुष्यातील क्षण त्यांनी इन्स्टावर शेअर केले. बैलगाडीतून ऊस घेऊन जाणाऱ्या हजारे दाम्पत्याचा व्हिडीओ इन्स्टावर गाजला. तो तुफान व्हायरल झाला. आयुष्याच्या प्रत्येक क्षणात आनंद शोधता आला पाहिजे. ज्याला ही कला जमली, त्याला आयुष्यातला आनंद समजला. त्याला आयुष्य समजलं, अशा आशयासह अनेकांनी हजारे दाम्पत्याचा व्हिडीओ शेअर केला. त्या व्हिडीओवर कमेंट्सचा पाऊस पडला. आयुष्य जगण्याची कला अगवत झालेलं दाम्पत्य अशा शब्दांत अनेकांनी दोघांचं कौतुक केलं. आयुष्य कितीही परीक्षा घेत असो, काळ कितीही संकटाचा असो परिस्थितीचा आनंद घ्यायला शिका, असा संदेश अनेकांना हजारे दाम्पत्याच्या व्हिडीओतून मिळाला.

ऊस तोडणी करणारे हजारे सहा – सहा महिने घरापासून दूर असतात. ज्या ठिकाणी आपलं कोणीही नाही, त्या ठिकाणी ऊस तोडणीस राहतात. हातातोंडाची गाठ पडावी यासाठी त्यांचा संघर्ष सुरू असतो. मात्र परिस्थिती कितीही कसोटी पाहत असली तरी हजारे दाम्पत्य हसणं विसरलेलं नाही. संकटाच्या, संघर्षाच्या काळात आनंदी, समाधानी राहण्याची कला त्यांना जमली आहे.

Tags: #sugarcane #cutting #labor #couple #overnight #star #beed #hazare #family #instagram #sugarfactory #onereel#ऊसतोडणी #मजूर #दाम्पत्य #एका #रीलनं #रातोरात #स्टार #बीड #हजारे #विरंगुळा #इन्स्टाग्राम #रील
Previous Post

आमदार संतोष बांगरांसह 30 – 40 जणांवर गुन्हा दाखल

Next Post

antelope सोलापुरात 14 काळविटांचा दुर्दैवी मृत्यू; पूर्वीही झाला होता अपघात

Surajya Digital

Surajya Digital

Next Post
antelope  सोलापुरात 14 काळविटांचा दुर्दैवी मृत्यू; पूर्वीही झाला होता अपघात

antelope सोलापुरात 14 काळविटांचा दुर्दैवी मृत्यू; पूर्वीही झाला होता अपघात

वार्ता संग्रह

January 2023
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Dec   Feb »

ट्विटर पेज

Currently Playing

About Us

SurajyaDigital
सुराज्य डिजिटल हा ब्रँड जगाच्या काना-कोपऱ्यातील सर्वंकष माहितीचा अचूक खजिना आपल्यापर्यंत पोहोंचविण्याचे काम करतोय. टाईम मीडिया हाऊसचा हा ब्रँड अल्पावधीतच मराठी वाचकांचा अत्यंत विश्वासार्ह ब्रँड बनला आहे.जगभरातील घटनांचा वेगवान आढावा घेत त्यावर भाष्य करण्याबरोबरच वाचकांच्या आवडीचे विषय, करमणूक यासारखे दृक्श्राव्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी सुराज्य डिजिटल कटीबद्ध आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा timemediahouse@gmail.com timemarathi@gmail.com
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697