हिंगोली : प्राचार्याला मारहाण करणे शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांना भोवले आहे. महाविद्यालयात जाऊन वयोवृद्ध प्राचार्याला मारहाण केल्याप्रकरणी संतोष बांगर यांच्यासह 30 ते 40 जणांवर अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. A case has been registered against 30-40 people including MLA Santosh Bangar for beating Hingoli principal
हिंगोलीच्या शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात हा प्रकार घडला होता. त्यानंतर या घटनेचा व्हिडिओ हा व्हायरल झाला होता. यात बांगर प्राचार्यांना मारहाण आणि शिवीगाळ करताना दिसत होते. याप्रकरणी अखेर 10 दिवसानंतर आमदार बांगर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्राचार्याला मारहाण करणे बांगर यांना चांगलच भोवलं आहे. त्या ठिकाणी आमदार बांगर यांनी सीसीटीव्ही यंत्रणेची सुद्धा तोडफोड केली होती. त्यामध्ये पाच हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आलं आहे.
आमदार संतोष बांगरच नाही तर बांगर यांचे कार्यकर्ते सुद्धा प्राचार्यांचे कान पकडत मारहाण करत असल्याचे व्हिडीओमध्ये दिसून येत होते. दरम्यान, या सर्व प्रकरणावर खुद्द आमदार बांगर यांनी खुलासा केला आहे. मारहाण करण्यात आलेल्या प्राचार्याने एका महिलेवर अन्याय केला होता. त्यामुळं माहिलेवर अत्याच्यार होताना छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात संतोष बांगर सहन करणार नाही. यासाठी माझ्यावर गुन्हा दाखल झाला तरी त्याची पर्वा नसल्याचं संतोष बांगर यांनी म्हटलं आहे.
》 आमदार संतोष बांगरांची वयोवृद्ध प्राचार्यांना मारहाण
शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांच्या दादागिरीचा आणखी एक कारनामा समोर आला आहे. बांगर यांनी हिंगोलीत एका वयोवृद्ध प्राचार्यांना मारहाण आणि शिवीगाळ केली आहे. बांगरांनी सर्वांसमोर इंजिनियरिंग कॉलेजच्या प्राचार्यांचे कान पकडले व त्यांना मारहाण केल्याचे व्हिडिओत दिसत आहे.
आमदार बांगर यांनी इंजिनियरींग कॉलेजच्या प्रोफेसरचा कान जोरात पिरगळला आहे. त्यांच्या या कारनाम्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. संतोष बांगर यांनी एका वयोवृद्ध प्राचार्यांना मारहाण आणि शिवीगाळ केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. बांगर यांनी सर्वांसमोर प्राचार्यांचे कान पकडले आणि त्यांना मारहाण केल्याचे व्हिडिओत दिसत आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
फक्त आमदार बांगरच नाही तर त्यांचे कार्यकर्तेसुद्धा प्राचार्यांचे कान पकडत मारहाण करत असल्याचे व्हिडीओमध्ये दिसून येत आहे. दरम्यान, हा व्हिडीओ दोन-तीन दिवसांपूर्वीचा असल्याची माहिती समोर आली आहे. आमदार बांगर यांनी संबंधित प्राचार्याला का मारहाण केली? याचे कारण जरी अस्पष्ट आहे. या संपूर्ण प्रकारामुळे त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. वारंवार आमदार कायदेमंडळात बसून कायदे तयार करतात आणि हेच आमदार बाहेर कसे पायदळी तुडवतात हे यावरून दिसत आहे.
हिंगोलीच्या शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात हा प्रकार घडला आहे. यापूर्वी बांगर यांनी हिंगोलीचे कृषी अधीक्षक अधिकाऱ्याला शिवीगाळ केली होती. वीज कापली म्हणून बांगर यांनी पवार नावाच्या एका कर्मचाऱ्याला रट्टे देईन, अशी धमकी दिली होती.
मुख्यमंत्री शिंदे यांनी समज दिल्या नंतर ही आमदार बांगर यांचे कारनामे सुरूच आहेत. हिंगोलीच्या शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात हा प्रकार घडला आहे. त्यांनी प्राचार्याला का मारहाण केली हे मात्र अद्याप समजू शकले नाही.
आमदार बांगर यांनी प्राचार्याला का मारहाण केली हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही. हातात कायदा घेणाऱ्या या आमदारावर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री काही कारवाई करतात की नाही, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे. आमदार संतोष बांगर अशा कारनाम्यांमुळे नेहमीच चर्चेत
शिंदे गटाचे हिंगोलीतील बंडखोर आमदार संतोष बांगर नेहमीच चर्चेत असतात. मध्यान्ह भोजनामध्ये दिल्या जाणाऱ्या वरणात अळ्या सापडल्या होत्या तेव्हा त्यांनी उपहारगृह व्यवस्थापकाच्या कानशिलात लगावली होती. ऑक्टोबरमध्ये कृषी विभागाच्या कार्यालयात राडा घातला होता. त्यांनी पिकविमा कार्यालयाची तोडफोड केली होती. बांगर यांनी विद्युत विभागाच्या कर्मचाऱ्याला फोनवरुन मारण्याची धमकीही दिली होती. मंत्रालयात प्रवेश करताना संतोष बांगर यांनी पोलिसांना शिवीगाळ केल्याचा आरोप झाला होता. मंत्रालयाच्या गार्डन गेटमधून कार्यकर्त्यांना प्रवेश देण्यावरुन त्यांनी गोंधळ घातल्याची चर्चा होती.