मोहोळ : जन्मठेपेची शिक्षा लागलेल्या आणि पॅरोलवर आलेल्या आरोपीने दुसऱ्या पत्नीच्या त्रासाला कंटाळून खुनेश्वर येथील शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी (ता. २७ जानेवारी) उघडकीस आली आहे. या घटनेची नोंद मोहोळ पोलीस ठाण्यामध्ये झाली आहे. The accused, who was on parole, committed suicide because of the trouble of his second wife
तिथून मिळालेल्या माहितीनुसार मृत वैभव कालिदास मगर (व ४१ रा .खुनेश्वर ता. मोहोळ ) याला पत्नीच्या खुनाच्या गुन्ह्यामध्ये जन्मठेप शिक्षा लागली होती. तो येरवडा जेलमध्ये ही शिक्षा भोगत होता. १३ जानेवारी तो आपल्या गावी पॅरोलवर आला होता. मात्र पॅरोल रजेवर असल्यामुळे त्याला एक दिवसाआड तामलवाडी (ता. तुळजापूर जि.उस्मानाबाद ) येथे पोलीस स्टेशन मध्ये हजेरी साठी जावे लागत होते.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
》 आंतरजिल्हा सराईत गुन्हेगाराकडुन जबरी चोरी, घरफोडीसह चार गुन्हे उघड
सोलापूर – शहरात चोरी, घरफोडी,जबरी चोरी, चाकू दाखवून लुटमार करणाऱ्या सराईत आंतरजिल्हा गुन्हेगाराला शहर गुन्हे शाखेच्या पोलीसांनी अटक करून चार गुन्हे उघड केले.हरजितसिंग टाक ( वय 45, रा. सध्या लातूर) असे अटक करण्यात आलेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे.
शहर परिसरात विविध प्रकारचे गंभीर गुन्हे घडत असताना शहर गुन्हे शाखेच्या पोलीसांनी रेकॉर्डवरील गुन्हेगारांचा तपास सुरू केला असता त्यामध्ये हरजितसिंग टाक याने काही गुन्हे केल्याचे उघड झाले त्याला अटक करून त्याच्याकडून जोडभावी पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दोन जबरी चोरीचे, एमआयडीसी आणि फौजदार चावडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील प्रत्येकी एक चोरीचे गुन्हे त्याने त्याच्या इतर दोन साथीदारांच्या मदतीने केल्याचे कबुल केले.
चोरीतील दोन मोटारसायकली व सोन्याच्या दागिन्यासह 2 लाखाचा ऐवज पोलीसांनी जप्त केला. ही कामगिरी शहर गुन्हे शाखेच्या सहाय्यक पोलीस आयुक्त प्रांजली सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक सुनिल दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय क्षिरसागर, प्रकाश गायकवाड, कृष्णात कोळी, राजु मुदगल, महेश शिंदे, कुमार शेळके, सिध्दाराम देशमुख, वसिम शेख, सतीश काटे यांनी पार पाडली.