Thursday, March 23, 2023
Surajya Digital
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
  • ब्लॉग
  • अर्थाअर्थ
  • शिवार
  • Techनिक
No Result
View All Result
Surajya Digital
No Result
View All Result

मोठ्या गावचा सरपंच नकोरे बाबा : माजी आमदार राजन पाटील

Nakore Baba, sarpanch of a large village: Former MLA Rajan Patil

Surajya Digital by Surajya Digital
January 30, 2023
in Hot News, राजकारण, सोलापूर
0
मोठ्या गावचा सरपंच नकोरे बाबा : माजी आमदार राजन पाटील
0
SHARES
64
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

□ आमदार यशवंत मानेंनी केला कामांना स्थगिती दिल्याचा शिंदे सरकारवर आरोप

 

उत्तर सोलापर : जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांचे रद्द करण्यात आलेले अधिकार पूर्वीप्रमाणे देण्याची गरज आहे. नाही तर जिल्हा परिषद व ग्रामपंचायत सदस्य नकोरे बाबा अशी म्हणण्याची पाळी येणार आहे, लहान गावचा का होईना सरपंच झालेलं बरं, ही कार्यकर्त्यांची मानसिकता होईल, अशी भीती मोहोळचे माजी आमदार राजन पाटील यांनी व्यक्त केली. Nakore Baba, sarpanch of a large village: Former MLA Rajan Patil Yashwant Mane Shinde government suspended the charges

 

वडाळा येथे गावचे सरपंच, सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक जितेंद्र साठे यांच्यावतीने उत्तर सोलापूर तालुक्यातील कौठाळी, गावडीदारफळ, रानमसले, अकोलेकाटी, मार्डी, डोणगाव, पाकणी, नंदूर समशापूर, कवठे व नरोटेवाडी ग्रामपंचायतीमध्ये निवडून आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नुतन सदस्य, सरपंच, उपसरपंच यांचा सत्कार आमदार यशवंत माने, राजन पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बळीरामकाका साठे यांच्या हस्ते करण्यात आला.

त्यावेळी पाटील अध्यक्षस्थानावरुन बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेस ओ.बी.सी. सेलचे जिल्हाध्यक्ष अविनाश मार्तंडे, संयोजक जितेंद्र साठे, अध्यक्ष प्रल्हाद काशीद, प्रकाश चवरे, जिल्हा दूध संघाचे व्हाईस चेअरमन दीपक माळी, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्षा ज्योत्स्ना पाटील, माजी उपसभापती जितेंद्र शिलवंत, उपसरपंच अनिल माळी, हरिभाऊ घाडगे, मनोज साठे, नागेश पवार, जयदीप साठे यांची प्रमुख उपस्थिती होती.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

 

ग्रामपंचायत नेतृत्व तयार करणारी कार्यशाळा आहे. विजयदादा, विलासराव देशमुख हे राज्याचे नेतृत्व करणारे नेते पहिल्यांदा ग्रामपंचायतीत निवडून आले होते. स्थानिक स्वराज्य संस्थेला अधिकार होते. मात्र, नोकरशाहीने हे अधिकार गोठविले आहे. पूर्वीप्रमाणे अधिकार देण्याची गरज आहे. फक्त मोहोळ मतदारसंघात आमदार यशवंत माने यांनी सर्वाधिक निधी दिला आहे. जास्तीत जास्त निधी आणण्यासाठी पुन्हा आमदार माने यांना निवडून द्यावे, तोपर्यंत आरक्षण रहावे असेही पाटील म्हणाले.

 

बळीरामकाका कधीच दुजाभाव करीत नाहीत उत्तर तालुक्यातील २४ गावात अजून बरेच कामे करायची आहेत. काही कामे मंजूर असून भाजप व शिंदे सरकारांनी त्याला स्थगिती दिली आहे, असे आमदार माने म्हणाले. यापुढेही आपण सर्वजण राष्ट्रवादीच्या पाठिशी खंबीरपणे उभी रहावे, काकानी जनतेची कामे केली असल्याचे जितेंद्र साठे म्हणाले.

तीन पिढ्यांचे स्नेहसंबंध पाटील व साठे परिवाराने टिकवून ठेवले असल्याचे जयदीप साठे म्हणाले. यावेळी अभिजीत पाटील, दयानंद पवार, शरद माने सरपंच, उपसरपंच, कार्यकर्ते उपस्थित होते. सूत्रसंचालन दत्ता मोकाशी, नागेश पवार यांनी आभार मानले.

 

Tags: #NakoreBaba #sarpanch #largevillage #Former #MLA #RajanPatil #YashwantMane #Shinde #government #suspended #charges#मोठ्यागावचा #सरपंच #नकोरेबाबा #माजीआमदार #राजनपाटील #आमदार #यशवंतमाने #काम #स्थगिती #आरोप
Previous Post

परिचारक – भालके समविचारी आघाडीमुळे कार्यकर्ते अस्वस्थ; रिचेबल नेतृत्वाच्या शोधात

Next Post

सोलापुरात पहाटे दत्तनगर येथे  गारमेंट कारखान्यांना लागली आग, कारखाने बंद असताना अचानक आग

Surajya Digital

Surajya Digital

Next Post
सोलापुरात पहाटे दत्तनगर येथे  गारमेंट कारखान्यांना लागली आग, कारखाने बंद असताना अचानक आग

सोलापुरात पहाटे दत्तनगर येथे  गारमेंट कारखान्यांना लागली आग, कारखाने बंद असताना अचानक आग

वार्ता संग्रह

January 2023
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Dec   Feb »

ट्विटर पेज

Currently Playing

About Us

SurajyaDigital
सुराज्य डिजिटल हा ब्रँड जगाच्या काना-कोपऱ्यातील सर्वंकष माहितीचा अचूक खजिना आपल्यापर्यंत पोहोंचविण्याचे काम करतोय. टाईम मीडिया हाऊसचा हा ब्रँड अल्पावधीतच मराठी वाचकांचा अत्यंत विश्वासार्ह ब्रँड बनला आहे.जगभरातील घटनांचा वेगवान आढावा घेत त्यावर भाष्य करण्याबरोबरच वाचकांच्या आवडीचे विषय, करमणूक यासारखे दृक्श्राव्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी सुराज्य डिजिटल कटीबद्ध आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा timemediahouse@gmail.com timemarathi@gmail.com
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697