सोलापूर : शहरातील पूर्व भागातील दत्तनगर भागात गड्डम गारमेंट कारखान्याला आज भीषण आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. आज पहाटेच्या सुमारास ही आग लागली. कारखान्याशेजारी असणारे जवळपास चार कारखाने या आगीत भस्मसात झाले आहेत. आगीचे नेमके कारण अस्पष्ट आहे. Garment factories caught fire at Dattanagar in Solapur early morning, sudden fire when the factories were closed
अग्निशामक दलाकडून जवळपास 20 गाड्या पाण्याचा फवारा करून ही आग विझविण्यात यश आले आहे. गारमेंट कारखान्यातील सर्व कपडे जळून खाक झाले आहेत. सोमवारी सकाळी ही आग लागली होती. आग विझवण्यासाठी आजूबाजूच्या नागरिकांनीसुद्धा शर्थीचे प्रयत्न केले आहे.
दोन अडीच महिन्यापासून शहरातील गारमेंट कारखान्यांना वारंवार आगी लागत आहेत.यामुळे उद्योजकांचे कोट्यावधीचे नुकसान होत आहे.सोमवारी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास अशाच प्रकारे शहरातील दत्तनगर भागात असलेल्या गड्डम आणि कुरापाटी यांच्या रेडिमेड गारमेंट कारखान्याला मोठी आग लागली.या आगीत लाखो रुपयांचे शिलाई साहित्य कच्चामाल रेडिमेड कपडे जळून खाक झाले.
लाल बावटा कार्यालय शेजारी माहेश्वरी मंदिरालगत गड्डम आणि कुरापाटी या दोघाचे रेडीमेड गारमेंट फॅक्टरीज आहेत. आज सोमवारी सकाळी आठ वाजण्याच्या दरम्यान दोन्ही गारमेंट्स बंद असताना अचानक या गारमेंट फॅक्टरीला आग लागली.
कुरापाटी गारमेंट जागेचे मालक उमाशंकर कामिनी यांनी याबाबत कुरापाटी यांना आग लागल्याबाबत कळवले.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
आगीत सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. आगीत आजूबाजूचे कारखाने जळून भस्म झाले आहेत. आज पहाटेच्या सुमारास गड्डम गारमेंट फॅक्टरीला आग लागली होती. सर्वजण साखर झोपेत असल्याने आगीचा मोठा भडका उडाला.
आगीचे आगडोंब दिसता अग्नीशामक दलाला माहिती देण्यात आली. परंतु अग्नीने रौद्ररुप धारण केल्याने आजूबाजूला असलेली चिटमिल कारखाना, लारा कारखाना असे चार कारखाने आगीत भस्म झाले आहेत. शहराच्या मध्यभागी ही कारखाने असल्याने नागरिकांची एकच धावपळ उडाली होती.
अग्नीशामक दलाने सुद्धा ताबडतोब पाणी फवारणीचे बंब पाठवले. अग्नीशामक दल आणि नागरिकांनी शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली.
कुरापाटी यांनी येऊन तात्काळ कुलूप उघडून पाहिले असता कारखान्यातील तयार माल,तयार युनिफॉर्म,कच्चा माल,शिलाई मशीन,कापडी गाठी असा जवळपास सात ते आठ लाखाचा माल जागेवर जळून खाक झाला. तर नागेश गड्डम यांच्या गारमेंटला लागलेल्या आगीत ८ शिलाई मशीन्स,कटिंग मशीन, इस्त्री मशीन, कच्चामाल,तयार माल असा जवळपास १५ लाखाचा माल आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. गोवर्धन शेट्टी यांनी याबाबत अग्निशामक दलाला कळवले. अग्निशामक दलाच्या नऊ गाड्यांनी ही आग आटोक्यात आणली. परंतु तोपर्यंत दोन्ही गारमेंट जळून खाक झाले होते. दोन तासानंतर ही आग विझवण्यात आली.
》 कामती पोलीस स्टेशन हद्दीत उसाच्या पिकात आढळला बेवारस महिलेचा मृतदेह
विरवडे बु : मोहोळ तालुक्यातील कामती पोलीस स्टेशनच्या हद्दीत असणारे शिंगोली येथील शेतातील उसाच्या पिकात बेवारस महिलेचा मृतदेह आढळून आला असल्याचे कामती पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश माने यांनी सांगितले आहे.
आज सोमवारी ( ता. ३० ) दुपारी बाराच्या पूर्वी मयत झालेले अंदाजे २५ ते ३० वर्ष वयोगटातील रंगाने गोरी असणारी व पाच फूट दोन इंच बेवारस महिलेचा मृतदेह आढळून आला आहे. संबंधित महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी सोलापुरातील शासकीय रुग्णालयात पाठविले आहे.
अधिक चौकशीसाठी कामती पोलीस स्टेशन येथे संपर्क करण्याचे आवाहन कामती पोलिसांकडून करण्यात आले आहे.