Wednesday, March 29, 2023
Surajya Digital
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
  • ब्लॉग
  • अर्थाअर्थ
  • शिवार
  • Techनिक
No Result
View All Result
Surajya Digital
No Result
View All Result

बलात्कार प्रकरणी आसाराम बापूला जन्मठेप, अटकेपासून मुलगी चालवत आहे ट्रस्ट

Asaram Bapu returned to life imprisonment in rape case, girl is running Trust Gandhinagar since arrest

Surajya Digital by Surajya Digital
January 31, 2023
in Hot News, देश - विदेश
0
बलात्कार प्रकरणी  आसाराम बापूला  जन्मठेप, अटकेपासून मुलगी चालवत आहे ट्रस्ट
0
SHARES
109
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मुंबई : बलात्कार प्रकरणात दोषी ठरलेल्या आसारामला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. स्वयंघोषित धर्मगुरू आसाराम बापू यांना गांधीनगर कोर्टाने मोठा दणका दिला आहे. आसाराम बापू हा 2013 मधील एका बलात्काराच्या प्रकरणात दोषी आढळला आहे. Asaram Bapu returned to life imprisonment in rape case, girl is running Trust Gandhinagar since arrest

 

2013 मध्ये आसारामवर सुरतच्या एका मुलीने बलात्काराचा आरोप केला होता, तर नारायण साईवर तिच्या लहान बहिणीने बलात्काराचा आरोप केला होता. गुजरातच्या सत्र न्यायालयात सोमवारी या प्रकरणी सुनावणी झाली. यावेळी आसारामला दोषी ठरवण्यात आले होते. दरम्यान आसाराम दुसऱ्या एका बलात्कार प्रकरणात शिक्षा भोगत आहे.

 

 

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपाखाली आसाराम बापूंना 31 ऑगस्ट 2013 रोजी अटक करून जोधपूर मध्यवर्ती कारागृहात डांबलेले. या प्रकरणात आसाराम बापूंव्यतिरिक्त त्यांची पत्नी लक्ष्मी, मुलगी भारती, चार महिला अनुयायी ध्रुवबेन, निर्मला, जस्सी आणि मीरा हे देखील आरोपी आहेत.

देशभरात आसारामचे 400 पेक्षा जास्त आश्रम आणि 40 शाळा आहेत. आता हे संपूर्ण नेटवर्क आसारामची मुलगी भारती सांभाळत आहे. आसारामच्या अटकेनंतर वडील आसाराम बापूच्या विश्वासू सहकाऱ्याच्या मदतीने भारती आसाराम ट्रस्ट चालवत आहे.

महत्वाचे म्हणजे आसाराम याआधीच दुसर्‍या एका बलात्कार प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. सध्या तो जोधपूर कारागृहात बंद आहे. याआधीही जेव्हा-जेव्हा आसाराम यांना न्यायालयाकडून दिलासा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती, तेव्हा त्यांना मोठा धक्का बसला आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्येही सुप्रीम कोर्टात आसारामच्या जामीन याचिकेवर सुनावणी झाली होती. म्हातारपण आणि प्रकृती अस्वास्थ्यामुळे जामीन मिळायला हवा, असे त्यावेळी आसाराम म्हणाले होते. मात्र न्यायालयाने प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेतले नव्हते.

 

Gandhinagar Sessions Court sentenced self-styled godman Asaram to life imprisonment in connection with a decade-old sexual assault case. pic.twitter.com/UgIdHOsuiq

— ANI (@ANI) January 31, 2023

 

गांधीनगर येथील न्यायालयाने आसारामला आश्रमातील महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी दोषी ठरवले होते. अहमदाबाद येथील आश्रमात 2001 ते 2006 दरम्यान अनेकवेळा आसाराम बापूने आपल्यावर बलात्कार केल्याची तक्रार महिलेने 2013 मध्ये नोंदवली होती. त्यावेळी महिला आसारामच्या आश्रमात राहत होती. दरम्यान आसाराम सध्या एका दुसऱ्या महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी शिक्षा भोगत आहे.

या मुलीच्या आरोपानुसार, आसारामने तिला जोधपूरजवळच्या आश्रमात बोलावलं होतं. आणि ऑगस्ट 15, 2013 ला तिच्या बलात्कार करण्यात आला. 20 ऑगस्ट 2013ला आसारामानी 15 ऑगस्ट रोजी एका मुलीचं लैंगिक शोषण केल्याची तक्रार दिल्लीत दाखल करण्यात आली नंतर हा खटला जोधपूर कोर्टाकडे सोपण्यात आला. – 23 ऑगस्ट 2013ला आसारामाविरोधात गुन्हा दाखल झाला.

31 ऑगस्ट 2013 ला आसारामला जोधपूर पोलिसांनी अटक केली, आसारामची पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली. पण या दरम्यान समर्थकांनी कोर्टाबाहेर गोंधळ घातला होता. नोव्हेंबर 2013 ला जोधपूर पोलिसांनी आसाराम विरोधात आरोपपत्र दाखल केलं. आसाराम आणि चार लोकांवर बलात्काराचे आरोप करण्यात आले.

गुन्हा दाखल झाल्यानंतर सरकारतर्फे 55 साक्षीदार तपासण्यात आले. सर्व साक्षीदारांच्या परस्परविरोधी जबाबामुळे एकूण 8 पैकी एका आरोपीला साक्षीदार करण्यात आले. याशिवाय सात आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यात आले.

Tags: #AsaramBapu #returned #liifeimprisonment #rapecase #girl #running #Trust #Gandhinagar #arrest#बलात्कार #प्रकरण #आसारामबापू #जन्मठेप #अटकेपासून #मुलगी #ट्रस्ट #गांधीनगर
Previous Post

सोलापुरात पहाटे दत्तनगर येथे  गारमेंट कारखान्यांना लागली आग, कारखाने बंद असताना अचानक आग

Next Post

Shantabai Kale ‘कोल्हाट्याचं पोर’ कार डॉ. किशोर काळेेंच्या आईंची घराच्या मदतीसाठी भटकंती सुरूच

Surajya Digital

Surajya Digital

Next Post
Shantabai Kale ‘कोल्हाट्याचं पोर’ कार डॉ. किशोर काळेेंच्या आईंची घराच्या मदतीसाठी भटकंती सुरूच

Shantabai Kale 'कोल्हाट्याचं पोर' कार डॉ. किशोर काळेेंच्या आईंची घराच्या मदतीसाठी भटकंती सुरूच

वार्ता संग्रह

January 2023
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Dec   Feb »

ट्विटर पेज

Currently Playing

About Us

SurajyaDigital
सुराज्य डिजिटल हा ब्रँड जगाच्या काना-कोपऱ्यातील सर्वंकष माहितीचा अचूक खजिना आपल्यापर्यंत पोहोंचविण्याचे काम करतोय. टाईम मीडिया हाऊसचा हा ब्रँड अल्पावधीतच मराठी वाचकांचा अत्यंत विश्वासार्ह ब्रँड बनला आहे.जगभरातील घटनांचा वेगवान आढावा घेत त्यावर भाष्य करण्याबरोबरच वाचकांच्या आवडीचे विषय, करमणूक यासारखे दृक्श्राव्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी सुराज्य डिजिटल कटीबद्ध आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा timemediahouse@gmail.com timemarathi@gmail.com
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697