Tuesday, March 28, 2023
Surajya Digital
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
  • ब्लॉग
  • अर्थाअर्थ
  • शिवार
  • Techनिक
No Result
View All Result
Surajya Digital
No Result
View All Result

Shantabai Kale ‘कोल्हाट्याचं पोर’ कार डॉ. किशोर काळेेंच्या आईंची घराच्या मदतीसाठी भटकंती सुरूच

'Kolhatya Cha Por' car Dr. Kishore Kale's mother continues to wander for house help Kalwant Mandhan Banvas

Surajya Digital by Surajya Digital
January 31, 2023
in Hot News, महाराष्ट्र, सोलापूर
0
Shantabai Kale ‘कोल्हाट्याचं पोर’ कार डॉ. किशोर काळेेंच्या आईंची घराच्या मदतीसाठी भटकंती सुरूच
0
SHARES
69
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

● ना राहायला घर, ना वेळेवर कलावंतांचे मानधन वनवास संपेना !

 

सोलापूर : जिल्हाधिकारी, झेडपीचे मुख्य कार्यकारी अधिकारी ते मंत्री व मुख्यमंत्री यांच्यापर्यंत अर्ज – विनंती केल्या. ‘Kolhatya Cha Por’ car Dr. Kishore Kale’s mother continues to wander for house help Kalwant Mandhan Banvas Shantabai Kale तरीही घर मिळेना ना राहायला घर ना वेळेवर कलावंतांचे मानधन मिळेना मदतीसाठी ‘कोल्हाट्याचं पोर’ कार डॉ. किशोर शांताबाई काळे यांच्या आईंची मदतीसाठी वर्षानुवर्षे भटकंती सुरूच आहे. अशा परिस्थितीत “सांगा कसं जगायचं ?” आणि या ज्येष्ठ कलावंतास “कुणी घर देता का घर” असा आर्त टाहो ज्येष्ठ कलावंत शांताबाई काळे यांनी फोडला आहे.

 

‘कोल्हाट्याचं पोर’ या आत्मचरित्राचे लेखक डॉ. किशोर शांताबाई काळे यांचा दिनांक 19 फेब्रुवारी 2007 रोजी वयाच्या 37 व्या वर्षी अपघाती मृत्यू झाला. मुलाला डॉक्टर केल्यानंतर सुखाचे दिवस बघण्याची आशा असतानाच त्यांच्या मुलाचे अपघाती निधन झाले. मोठा आधार कोसळला.

चाळीस वर्षे लावणी कला जोपासणाऱ्या आणि या लावणीच्या बळावर मुलाला मोठे केलेल्या डॉ. किशोर काळे यांच्या आई शांताबाई काळे या आज अत्यंत दयनीय अवस्थेत आयुष्य जगत आहेत.  निवृत्त कलावंत म्हणून मिळणारे 1500 रुपये  मानधन आणि डॉक्टर काळे यांच्या पुस्तकाची रॉयल्टी एवढ्यावरच दैनंदिन उदरनिर्वाह करत आहेत. तेही कलावंतांचे मानधन वेळेवर मिळत नाही. तीन-तीन महिने विलंब होतो. राहायला घर नाही. भाड्याने तर कधी इतरत्र राहावे लागते. भाडं द्यावं की पोट भरावं असा यक्ष प्रश्न उपस्थित झाला आहे. अशा विदारक परिस्थितीतून त्यांना रोजचे जीवन जगावं लागत आहे.

 

सोलापूर जिल्हा परिषदेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांनी साडेचार वर्षांपूर्वी शांताबाई काळे यांना घर देण्याचे कृतीशील आश्वासन दिले. तेवढ्यावरच न थांबता डॉ. भारुड यांनी तात्काळ संबंधित अधिकाऱ्यांना आदेश देऊन आवश्यक ती मदत करण्यास सांगितले. त्यावेळी करमाळा तालुक्यातील नेरले येथे त्यांना घरासाठी जागाही उपलब्ध केली. त्या जागेच्या उताऱ्यावर शांताबाई काळे यांचे नावही लागले. बांधकाम सुरू झाले होते. दरम्यान, सीईओ डॉ. राजेंद्र भारूड यांची बदली झाली. त्यानंतर मात्र अचानकपणे विविध अडचणीमुळे हे बांधकाम खोळंबले आहे. प्रशासकीय स्तरावरही संबंधित अधिकार्‍यांकडून दुर्लक्ष झाले.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

त्यानंतर पुन्हा सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हाधिकारी यांच्यासह अधिकाऱ्यांना भेटून अर्ज विनंती केली. राहायला घर मिळावे यासाठी मागणी केली. त्याचबरोबर मुंबई येथे मंत्रालयात जाऊन मुख्यमंत्र्यांनाही लेखी निवेदन दिले. काही दिवसांपूर्वीच नागपूर येथे जाऊन हिवाळी अधिवेशनावेळी त्यांनी राहायला हक्काचे घर आणि वेळेवर मानधन मिळावे या मागणीसाठी पाठपुरावा केला.

 

आरोग्यमंत्री प्रा. तानाजी सावंत यांच्या प्रतिनिधींना निवेदन दिले. त्यांनीही कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,  तत्कालीन राज्यपाल विद्यासागर राव यांनाही निवेदन दिले. आश्वासनापलीकडे ठोस अशी कार्यवाही झालेली नाही.

 

तत्कालीन राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनाही पत्र लिहिले होते. राज्यपाल कार्यालयाकडून सांस्कृतिक आणि पर्यटन विभागाचे प्रधान सचिव यांना शांताबाई काळे यांचे राहायला घर आणि उदरनिर्वाहाची तजवीज या मागणीविषयीचे पत्र उचित कार्यवाहीसाठी पुढे पाठवण्यात आले होते. मात्र मराठी भाषा विभाग यासंदर्भात कोणतीही कार्यवाही करू शकत नाही, अशी व्यथा शांताबाई काळे यांनी यावेळी व्यक्त केली.

 

शांताबाई काळेंच्या घराच्या मागणीसह अधिक व्हिडिओ पाहण्यासाठी surajya digital फेसबुक पेजला भेट द्या

 

□ “स्वतःच्या हक्काचं घर मिळावे” हीच शेवटची इच्छा !

मुलाच्या निधनानंतर उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर झाला. हाल अपेष्टा सहन कराव्या लागत आहे. संघर्ष करावा लागत आहे. आणखी किती हेलपाटे मारायचे ? 69 वर्ष वय असताना आता पुढे हेलपाटे मारणे शक्य नाही. आता तरी मुख्यमंत्री व शासनाने हक्काचं घर मिळवून द्यावे आणि स्वतःच्या हक्काचे घर द्यावे अशीच शेवटची इच्छा आहे.

 

हक्काचे घर मिळावे, जेष्ठ कलावंत म्हणून वेळेवर मानधन मिळावे या मागणीसाठी वर्षानुवर्ष कागदपत्राची बॅग सोबत घेऊन शासकीय कार्यालयाचे उंबरे झिजवावे लागत आहेत.  ज्येष्ठ कलावंतास “कुणी घर देता का घर” असाच अर्थ टाहो शांताबाई काळे या फोडत आहेत तेव्हा आता तरी शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन त्यांना न्याय द्यावा अशी मागणी होत आहे.

Tags: #KolhatyaChaPor #DrKishore Kale's #mother #continues #wander #house #help #Kalwant #Mandhan #Banvas #ShantabaiKale#कोल्हाट्याचंपोर #डॉकिशोरकाळेे  #आई #घर #मदत #भटकंती #सुरूच #कलावंत #मानधन #वनवास
Previous Post

बलात्कार प्रकरणी आसाराम बापूला जन्मठेप, अटकेपासून मुलगी चालवत आहे ट्रस्ट

Next Post

पंढरपूर वारी : भाविकांच्या मदतीसाठी चार ठिकाणी आपत्ती व्यवस्थापन कक्ष स्थापन

Surajya Digital

Surajya Digital

Next Post
पंढरपूर वारी : भाविकांच्या मदतीसाठी चार ठिकाणी आपत्ती व्यवस्थापन कक्ष स्थापन

पंढरपूर वारी : भाविकांच्या मदतीसाठी चार ठिकाणी आपत्ती व्यवस्थापन कक्ष स्थापन

वार्ता संग्रह

January 2023
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Dec   Feb »

ट्विटर पेज

Currently Playing

About Us

SurajyaDigital
सुराज्य डिजिटल हा ब्रँड जगाच्या काना-कोपऱ्यातील सर्वंकष माहितीचा अचूक खजिना आपल्यापर्यंत पोहोंचविण्याचे काम करतोय. टाईम मीडिया हाऊसचा हा ब्रँड अल्पावधीतच मराठी वाचकांचा अत्यंत विश्वासार्ह ब्रँड बनला आहे.जगभरातील घटनांचा वेगवान आढावा घेत त्यावर भाष्य करण्याबरोबरच वाचकांच्या आवडीचे विषय, करमणूक यासारखे दृक्श्राव्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी सुराज्य डिजिटल कटीबद्ध आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा timemediahouse@gmail.com timemarathi@gmail.com
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697