□ 1 लाख 10 हजार भाविक वारकरी दाखल
पंढरपूर :- उद्या बुधवार (ता.1 )माघ शुध्द एकादशी या यात्रेचा कालावधी 26 जानेवारी ते 05 फेब्रुवारी असा आहे. या यात्रा कालावधीत श्री विठ्ठल – रुक्मिणीमातेच्या दर्शनासाठी पंढरपुरात मोठ्या प्रमाणात भाविक येतात. Pandharpur Wari: Disaster management rooms have been set up at four places to help the devotees यात्रा कालावधीत येणाऱ्या भाविकांच्या आरोग्य, स्वछता व सुरक्षेला प्रशासनाने प्राधान्य दिले असून, भाविकांच्या मदतीसाठी चार ठिकाणी आपत्ती व्यवस्थापन कक्षाची स्थापना करण्यात आली असल्याची माहिती प्रातांधिकारी गजानन गुरव यांनी दिली.
माघी वारीत येणाऱ्या भाविकांना आवश्यक सोयी-सुविधा तात्काळ मिळाव्यात त्याचबरोबर आरोग्याच्या व सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणतेही गैरसोय येऊ नये यासाठी पत्राशेड, 65 एकर, चंद्रभागा वाळवंट, विठ्ठल-रुक्मिणी मंदीर या चार ठिकाणी आपत्ती व्यवस्थापन कक्षाची स्थापना केली आहे. तसेच चंद्रभागा नदीपात्रात स्नानासाठी भाविक मोठ्या प्रमाणात जातात. त्यांच्या सुरक्षेसाठी आपत्ती व्यवस्थानतर्गंत दोन यांत्रिक बोटी प्रशिक्षित कर्मचाऱ्यांसह तैनात ठेवण्यात आल्या असल्याचे त्यांनी सांगितले.
□ भाविकांच्या सुरक्षेसाठी वारकरी वेषात पोलीस
माघ यात्रा सुरक्षित व निर्विघ्नरित्या पार पाडण्यासाठी यात्रा कालावधीत भाविकांच्या सुरक्षेसाठी पोलीस प्रशासनाने आवश्यक उपाययोजना केल्या आहेत. भाविकांना संरक्षण देण्यासाठी, चोरी रोखण्यासाठी वारकरी वेषात पोलीस अधिकारी व कर्मचारी तैनात केले आहेत. तर 125 सीसीटिव्ही कॅमेराच्या माध्यमातूनही लक्ष ठेवले जात आहे, असे उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांनी सांगितले.
□ 65 एकरमध्ये दिंड्यासाठी 435 प्लॉटचे वाटप, 227 दिंड्या दाखल
माघी यात्रेच्या कालावधीत पंढरपुरात येणाऱ्या दिंड्याना मुक्कामासाठी तसेच भजन किर्तनासाठी प्रशासनाकडून मोफत जागा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. 65 एकरमध्ये 435 प्लॉटचे वाटप झाले असून, 227 दिंड्या विसावल्या आहेत. तसेच 3 लाख 38 हजार 227 भाविकांची नोंदणी झाली आहे. सध्या 1 लाख 10 हजार भाविक दाखल झाले आहेत.
65 एकरमध्ये भाविकांसाठी नगरपालिका प्रशासनाकडून पिण्याचे शुद्ध पाणी,लाईट, सुरक्षा, आरोग्य,शौचालय आदी आवश्यक सुविधा उलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. भाविकांच्या मदतीसाठी व आवश्यक सेवा सुविधा देण्यासाठी येथे आपत्काली मदत केंद्र 24 तास कार्यरत ठेवण्यात आले असल्याचे मुख्याधिकारी अरविंद माळी यांनी सांगितले.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
》माघी वारी बंदोबस्तासाठी आलेल्या पोलिसांना मोफत जेवण
पंढरपूर : पोलिसांसाठी बंदोबस्त म्हटलं की अन्नपाणी वेळेवर त्यांना कधीच मिळत नाही. बंदोबस्ताच्या ठिकाणी पोलीस जेवणा-विना उपाशी राहू नये यासाठी स्वतः पोलीस दलामध्ये सामील असलेले वामन यलमार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पंढरपूर माघी वारी बंदोबस्तासाठी आलेल्या सर्व पोलीस अधिकारी कर्मचारी आणि होमगार्ड यांना मोफत जेवणाची सोय केली आहे.
माघी वारी बंदोबस्तासाठी 1700 पोलीस अधिकारी आणि कर्मचारी पंढरपूर मध्ये आले आहेत. बंदोबस्तासाठी विविध पॉईंट वर पोलिसांच्या नेमणुका केल्या जातात. वारी असल्यामुळे पंढरपुरातील सर्व हॉटेल भरलेली असतात आणि चवीचे जेवण मिळत नसतं. त्यामुळे पोलिसांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत असते स्वतः पोलीस असलेले वामन यलमार ,आर के चव्हाण, राजू पवार यांनी मिळून पोलिसांसाठी मोफत जेवणाची सोय केली आहे. त्यामुळे बंदोबस्तासाठी आलेल्या पोलिसांना चांगल्या प्रतीचे जेवण मिळत आहे.
कार्तिकी वारीपासून वामन यालमर आणि त्यांचे सहकारी पोलिसांसाठी मोफत जेवणाची सोय करत आहेत. माघी वारीत देखील त्यांच्याकडून पोलिसांसाठी मोफत जेवणाची सोय केली आहे। त्यामुळे कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी देखील त्यांचे कौतुक केले आहे.
दिवसासाठी तीन हजार पोलीस जेवण करून जातात जेवणामध्ये एक सुकी भाजी एक पातळ भाजी जिलेबी शिरा, चपाती असा मेनू असतो. स्वयंपाकासाठी 34 महिला काम करत आहेत. सहा आचारी आहेत 10 मुलांच्या मदतीने जेवण बनवले जाते. दोन वेळेला 125 किलो तांदूळ 120 किलो गहू 200 किलो भाजीपाला 50 किलो साखर एवढे सामान लागते असल्याचे वामन यलमार (पोलीस कर्मचारी) यांनी सांगितले.