Thursday, March 23, 2023
Surajya Digital
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
  • ब्लॉग
  • अर्थाअर्थ
  • शिवार
  • Techनिक
No Result
View All Result
Surajya Digital
No Result
View All Result

सत्यजित तांबेंनी बाजी मारली… मोठी आघाडी, निकालाअगोदरच झळकले विजयाचे पोस्टर

Satyajit Tambe won... big lead, victory poster visible even before the result

Surajya Digital by Surajya Digital
February 2, 2023
in Hot News, महाराष्ट्र, राजकारण
0
सत्यजित तांबेंनी बाजी मारली… मोठी आघाडी, निकालाअगोदरच झळकले विजयाचे पोस्टर
0
SHARES
127
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

नाशिक : नाशिक पदवीधर मतदारसंघात अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांनी मोठी आघाडी घेतली आहे. त्यांनी आतापर्यंत जवळपास 31 हजार मते मिळवली आहेत. तर त्यांच्या विरोधात असलेल्या शुभांगी पाटील यांना 16 हजारांच्या जवळपास मते मिळालीत. Satyajit Tambe won… big lead, victory poster visible even before the result Nashik Aurangabad Nagpur पाटील यांना ठाकरे गट आणि काँग्रेसने पाठिंबा दिल्यानंतर या ठिकाणी चमत्कार होईल, असा विश्वास त्यांना होता. मात्र शेवटी सत्यजित तांबे यांनीच येथे बाजी मारल्याचे चित्र सध्या दिसत आहेत.

 

कॉंग्रेसने मावळते आमदार डॉ. सुधीर तांबे यांना उमेदवारी दिल्यावरही त्यांनी अर्ज न भरता त्यांचे पुत्र सत्यजीत तांबे यांनी अपक्ष उमेदवारी भरल्याने खळबळ उडाली. तर यामुळे दुखावलेल्या भाजपच्या शुभांगी पाटील यांना महाविकास आघाडीने पाठींबा दिला. निवडणुकीच्या प्रचारात सत्यजीत तांबे यांच्या पाठीशी भाजपचे नेते आणि पदाधिकारी उभे असल्याचे चित्र दिसून आले होते. तर शेवटच्या टप्प्यात महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी देखील तांबे यांना पाठींबा दिल्याने त्यांचे पारडे जड झाल्याचे मानले जात होते. आज दुपारी दोन वाजता नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची मतमोजणी सुरू झाली. महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील यांना तांबे यांच्यापेक्षा निम्मी मते मिळाली आहेत. पहिल्या फेरीत त्यांना अवघी 7 हजार 508 मते मिळाली असल्यामुळे त्या पिछाडीवर आहेत.

 

नाशिक पदवीधर मतदारसंघात मतमोजणीला सुरुवात झाली असून या ठिकाणी सत्यजित तांबे आणि शुभांगी पाटील यांच्यात लढत आहे. पहिल्या फेरीत सत्यजित तांबे आघाडीवर आहेत. तर पाटील या पिछाडीवर पडल्या आहेत. या ठिकाणी उशिरा मतमोजणीला सुरुवात झाली आहे. दरम्यान पाटील यांना महाविकास आघाडीचा पाठिंबा आहे. तांबे यांच्या वडिलांना काँग्रेसकडून तिकीट देण्यात आले होते. मात्र त्यांनी ऐनवेळी उमेदवारी अर्ज दाखल केला नव्हता.

 

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

 

पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाचा निकाल जाहीर होणार आहे. मात्र, पुण्यात हा निकाल जाहीर होण्याअगोदरच सत्यजीत तांबे यांच्या विजयाचे पोस्टर लावण्यात आले आहे. त्यावरून राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. सत्यजीत तांबे यांचे पोस्टर पुण्याचे माजी नगरसेवक सनी विनायक निम्हण यांच्याकडून लावण्यात आले आहेत. मात्र निकाल हाती येण्याअगोदरच हे पोस्टर्स लावण्यात आल्यामुळे त्याची चर्चा अधिक होत आहे. ‘जीत’ सत्याची, विजय ‘नव्या’ पर्वाचा! अशा स्वरूपाचा आशय त्या पोस्टर्सवरती लिहिण्यात आला आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघात भरगोस मतांनी विजयी झाल्याबद्दल आमदार सत्यजीत तांबे यांचे अभिनंदन. असे देखील त्या पोस्टर्सवर लिहिण्यात आल्यामुळे त्याची चर्चा अधिक होत आहे.

 

● औरंगाबादचा निकाल जाहीर… भाजपला धक्का

औरंगाबाद शिक्षक मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार विक्रम काळे विजयी झालेत. त्यांनी भाजपच्या किरण पाटील यांचा पराभव केला आहे. विक्रम काळे यांना 20195 मते मिळाली आहेत. तर किरण पाटील यांना 13570 मते मिळाली. त्यामुळे हा भाजपसाठी मराठवाड्यात मोठा धक्का समजला जात आहे. मात्र आम्हाला यावेळी मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात मतदान झाले, अशी प्रतिक्रिया भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे.

》 नागपूरमध्ये महाविकास आघाडीचे आडबाले विजयी

नागपूरमध्ये शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत महाविका आघाडीचे उमेदवार सुधाकर आडबाले हे विजयी झाले आहेत. सुधाकर आडबाले यांनी भाजपचे उमेदवार नागो गाणार यांचा पराभव केला आहे. गाणार यांच्यापेक्षा दुप्पट मते आडबाले यांनी मिळवली आहेत. नागपूर हा भाजपचा बालेकिल्ला समजला जातो. बालेकिल्ल्यातच भाजपचा पराभव झाला. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पटोले यांनी आडबालेंच्या विजयाची घोषणा केली.

 

 

 

Tags: #SatyajitTambe #won #biglead #victory #poster #visible #beforeresult #Nashik #Aurangabad #Nagpur#सत्यजिततांबे #बाजीमारली #मोठीआघाडी #निकालाअगोदरच #झळकले #विजय #पोस्टर #औरंगाबाद #नागपूर
Previous Post

पंढरपूर | प्रसाद खाल्ल्याने 137 भाविकांना त्रास, रुग्णालयात दाखल

Next Post

लग्नाच्या आड येणा-या प्रेयसीला गळफास देऊन केला खून, ठोकल्या बेड्या

Surajya Digital

Surajya Digital

Next Post
ऊस घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरला कंटेनरची धडक; ट्रॅक्टर चालक ठार

लग्नाच्या आड येणा-या प्रेयसीला गळफास देऊन केला खून, ठोकल्या बेड्या

वार्ता संग्रह

February 2023
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728  
« Jan   Mar »

ट्विटर पेज

Currently Playing

About Us

SurajyaDigital
सुराज्य डिजिटल हा ब्रँड जगाच्या काना-कोपऱ्यातील सर्वंकष माहितीचा अचूक खजिना आपल्यापर्यंत पोहोंचविण्याचे काम करतोय. टाईम मीडिया हाऊसचा हा ब्रँड अल्पावधीतच मराठी वाचकांचा अत्यंत विश्वासार्ह ब्रँड बनला आहे.जगभरातील घटनांचा वेगवान आढावा घेत त्यावर भाष्य करण्याबरोबरच वाचकांच्या आवडीचे विषय, करमणूक यासारखे दृक्श्राव्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी सुराज्य डिजिटल कटीबद्ध आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा timemediahouse@gmail.com timemarathi@gmail.com
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697