Wednesday, March 22, 2023
Surajya Digital
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
  • ब्लॉग
  • अर्थाअर्थ
  • शिवार
  • Techनिक
No Result
View All Result
Surajya Digital
No Result
View All Result

लग्नाच्या आड येणा-या प्रेयसीला गळफास देऊन केला खून, ठोकल्या बेड्या

Girlfriend who was interfering with marriage was killed by hanging, shackled Solapur Akkalkot

Surajya Digital by Surajya Digital
February 2, 2023
in Hot News, गुन्हेगारी, सोलापूर
0
ऊस घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरला कंटेनरची धडक; ट्रॅक्टर चालक ठार
0
SHARES
402
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

अक्कलकोट : येथील दक्षिण पोलीस स्टेशन मध्ये आत्महत्या म्हणून दाखल आकस्मित मयत खुनाचा गुन्हा दाखल असल्याचे पोलीसांनी उघडकीस आणले. लग्नाच्या आड येणा-या प्रेयसीला गळफास देऊन केला खून केल्याचे उघडकीस आलंय. त्यास पोलिसाने बेड्या ठोकल्या आहेत. Girlfriend who was interfering with marriage was killed by hanging, shackled Solapur Akkalkot

 

अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाणे अकस्मात मयत मधील मयत भारताबाई संतोष जमादार (वय २७ वर्षे, रा. जकापूर ता. अक्कलकोट) ही २९ जानेवारी रोजी सकाळी ०६:०० वा चे पुर्वी जकापूर येथील कल्याणी आळगी यांचे शेतातील लिंबाचे झाडाचे फांदीस कोणत्यातरी अज्ञात कारणाने साडीने गळफास घेवुन मयत झाल्याची खबर पोलिसाना मिळाली.

 

मयताचे वडिल विश्वनाथ सायबण्णा करजगी यांनी पोलिसाना माहिती दिली होती. परंतु सदर मयताचे गळ्यावरील व्रण, व घटनास्थळावरील सुक्ष्म निरीक्षण केले असता संशयास्पद आढळून आले. मयताचे पोस्टमार्टम करून अहवाल हस्तगत केला. तसेच संशयीत इसमांचे मोबाईलचे सी. डि. आर. व घटनास्थळाचा डाटा हस्तगत करून त्याचे तांत्रीक विश्लेषण केले.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

 

तसेच मयताचे वडिल विश्वनाथ सायबण्णा करजगी यांनी देखील एका इसमावर संशय व्यक्त केला. यातील मयताचे चौकशीमध्ये तपासाचे धागे दोरे हे देखील सदर संशयीत इसमाचे भोवतीच आढळुन आलेने सदर इसमास पोलीस ठाणेस आणुन चौकशी केली.

यावर संशयीताने आपले नाव बाळु कांतु माळु, (रा गळोरगी ता अक्कलकोट) असे सांगुन यातील मयत भारताबाई संतोष जमादार हि त्याची प्रेयसी असल्याचे कबूल केले. ती त्याचे नातेवाईकातील मुलीशी ठरलेल्या लग्नास विरोध करीत असल्याने तिला ठार करण्याच्या उद्देशाने कल्याणी कंत्यप्पा आळगी यांचे शेतामध्ये घेवुन गेला.

तिच्याच अंगावरील साडीने तिचे गळ्याला बांधुन साडीचे दुसरे टोक लिंबाचे झाडाला बांधुन गळफास देवुन ठार मारल्याची कबुली दिली. मयताचे वडिल विश्वनाथ सायबण्णा करजगी यांची आरोपी विरुद्ध फिर्याद दिली. यावरून बाळूवर भा.द.वि. कलम ३०२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

 

ही कामगिरी पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अप्पर पोलीस अधिक्षक हिंमत जाधव, अक्कलकोट उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश स्वामी, पो.हे.कॉ. सिध्दाराम घंटे, पो.हे.कॉ. अजय भोसले, पो.हे.कॉ. कलशेट्टी, पो. ना. जगदीश राठोड, पो. कॉ. केदार सुतार, पो. कॉ. महादेव शिंदे यांनी केली.

 

 

Tags: #Girlfriend #interfering #marriag #killed #byhanging #shackled #Solapur #Akkalkot#लग्नाच्या #आड #अक्कलकोट #सोलापूर #प्रेयसी #गळफास #खून #ठोकल्या #बेड्या
Previous Post

सत्यजित तांबेंनी बाजी मारली… मोठी आघाडी, निकालाअगोदरच झळकले विजयाचे पोस्टर

Next Post

अल्पवयीन मुलीचा लैंगिक छळ; तरुणाला 1 वर्षे सक्‍तमजुरी

Surajya Digital

Surajya Digital

Next Post
सोलापूर | विनयभंगप्रकरणी आरोपीस तीन वर्षे सक्तमजुरी

अल्पवयीन मुलीचा लैंगिक छळ; तरुणाला 1 वर्षे सक्‍तमजुरी

वार्ता संग्रह

February 2023
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728  
« Jan   Mar »

ट्विटर पेज

Currently Playing

About Us

SurajyaDigital
सुराज्य डिजिटल हा ब्रँड जगाच्या काना-कोपऱ्यातील सर्वंकष माहितीचा अचूक खजिना आपल्यापर्यंत पोहोंचविण्याचे काम करतोय. टाईम मीडिया हाऊसचा हा ब्रँड अल्पावधीतच मराठी वाचकांचा अत्यंत विश्वासार्ह ब्रँड बनला आहे.जगभरातील घटनांचा वेगवान आढावा घेत त्यावर भाष्य करण्याबरोबरच वाचकांच्या आवडीचे विषय, करमणूक यासारखे दृक्श्राव्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी सुराज्य डिजिटल कटीबद्ध आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा timemediahouse@gmail.com timemarathi@gmail.com
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697