Wednesday, March 29, 2023
Surajya Digital
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
  • ब्लॉग
  • अर्थाअर्थ
  • शिवार
  • Techनिक
No Result
View All Result
Surajya Digital
No Result
View All Result

अल्पवयीन मुलीचा लैंगिक छळ; तरुणाला 1 वर्षे सक्‍तमजुरी

Sexual harassment of a minor girl; Youth 1 year hard labor Solapur Court

Surajya Digital by Surajya Digital
February 3, 2023
in Hot News, गुन्हेगारी, सोलापूर
0
सोलापूर | विनयभंगप्रकरणी आरोपीस तीन वर्षे सक्तमजुरी
0
SHARES
44
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

सोलापूर – अल्पवयीन मुलीचा लैंगिक छळ करणार्‍या तरुणास विशेष न्यायाधीश व्हि.पी. आव्हाड यांनी १ वर्षाची सक्‍तमजुरी आणि ५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. भिमाशंकर रेवणसिध्द बिराजदार (वय २९ रा.जुळे सोलापूर) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. Sexual harassment of a minor girl; Youth 1 year hard labor Solapur Court

 

याबाबत पिडीत मुलीच्या नातेवाईकांच्या फिर्यादीवरुन विजापूर नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पिडीता ही घरी एकटी असताना आरोपी भिमाशंकर बिराजदार याने डिसेंबर २०१८ मध्ये तिच्या घरात घुसून माझ्यावर तू प्रेम कर नाही तर मी तुला कॉलेजला ये-जा करताना पळवून नेतो. अशी धमकी दिली होती. त्यानंतर बिराजदार याने पिडीतेचा सतत पाठलाग करून आपण पळून जाऊन लग्न करू असे म्हणाला.

 

त्यावेळी पिडीतेने पळून जाण्यास नकार दिला. त्यानंतर आरोपीने पिडीतेची बदनामी करून तिला लैंगिक अत्याचार केला. म्हणून विजापूर नाका पोलिसात पोक्सो अधिनियमाप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात तपास विजापूर नाका पोलिसांनी करून आरोपीस अटक करून न्यायालयात दोषारोपपत्र पाठवून दिले होते.

 

या खटल्यात सरकारच्यावतीने ६ साक्षीदार तपासण्यात आले. साक्षीदारांच्या साक्षी, पुरावा व सरकारी वकिलांचा युक्‍तीवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपी बिराजदार यास शिक्षा सुनावली. सरकार पक्षातर्फे अ‍ॅड. शीतल डोके तर आरोपीच्यावतीने अ‍ॅड म्हेत्रे यांनी काम पाहिले.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

 

》 अपहरण करून मारहाण; राज्य राखीव तिघा पोलिसांची निर्दोष मुक्तता

 

सोलापूर – किरकोळ कारणावरून एका तरुणास मोटारीतून पळवून नेऊन मारहाण केल्याच्या आरोपातून राज्य राखीव दलातील रमिझ सिकंदर शेख, इजाज मुबारक शेख आणि रशीद बाशूलाल पठाण ( सर्व रा.एस.आर.पी कॅम्प, सोलापूर) या तिघांना गुन्हा शाबित न झाल्यामुळे निर्दोष मुक्त करण्याचा आदेश न्याय दंडाधिकारी प्रशांत वराडे यांनी नुकताच दिला.

 

७ नोव्हेंबर २०२१ रोजी दुपारच्या सुमारास तिघां आरोपींनी फिर्यादी एस.एन कानकुर्ती यास किरकोळ कारणांवरून पुंजाळ मैदान (भद्रावती पेठ) येथे मारहाण केली. आणि त्यांच्या चारचाकी वाहनामध्ये जबरदस्ती बसवून डफरीन चौक येथे एका दवाखान्याजवळ नेऊन मारहाण केली. त्यानंतर त्यास सात रस्ता येथे घेऊन येऊन पुन्हा काठीने मारहाण केली.

सायंकाळी सात वाजेच्या सुमारास शासकीय पॉलीटेक्निक कॉलेज जवळ गाडीतून ढकलून दिले. अशा आशयाची फिर्याद जेलरोड पोलिसात दाखल झाली होती. त्यावेळी पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून आरोपी क्र.१ व २ यांना अटक केली होती. मा. कोर्टाने आरोपींचा जामीन मंजूर केला होता. पोलिसांनी तीनही आरोपींविरुध्द न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले होते.

आरोपीच्या वतीने ॲड.प्रशांत नवगिरे यांनी साक्षीदारांचे साक्षीत विसंगती असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून देऊन युक्तिवाद मांडला होता. या खटल्यात आरोपींतर्फे ॲड. प्रशांत नवगिरे, ॲड. श्रीपाद देशक, ॲड. सागर मंद्रूपकर यांनी काम पाहिले.

 

Tags: #Sexual #harassment #minorgirl #Youth #hardlabor #SolapurCourt#सोलापूर #अल्पवयीन #मुली #लैंगिक #छळ #तरुण #सक्‍तमजुरी #न्यायालय
Previous Post

लग्नाच्या आड येणा-या प्रेयसीला गळफास देऊन केला खून, ठोकल्या बेड्या

Next Post

कोल्हापूर – बँकेचे 5 कर्मचारी ईडीच्या ताब्यात, कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन

Surajya Digital

Surajya Digital

Next Post
कोल्हापूर – बँकेचे 5 कर्मचारी ईडीच्या ताब्यात, कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन

कोल्हापूर - बँकेचे 5 कर्मचारी ईडीच्या ताब्यात, कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन

वार्ता संग्रह

February 2023
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728  
« Jan   Mar »

ट्विटर पेज

Currently Playing

About Us

SurajyaDigital
सुराज्य डिजिटल हा ब्रँड जगाच्या काना-कोपऱ्यातील सर्वंकष माहितीचा अचूक खजिना आपल्यापर्यंत पोहोंचविण्याचे काम करतोय. टाईम मीडिया हाऊसचा हा ब्रँड अल्पावधीतच मराठी वाचकांचा अत्यंत विश्वासार्ह ब्रँड बनला आहे.जगभरातील घटनांचा वेगवान आढावा घेत त्यावर भाष्य करण्याबरोबरच वाचकांच्या आवडीचे विषय, करमणूक यासारखे दृक्श्राव्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी सुराज्य डिजिटल कटीबद्ध आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा timemediahouse@gmail.com timemarathi@gmail.com
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697