सोलापूर : एका महिलेवर सामूहिक दुष्कर्म केल्याप्रकरणी येथील विष्णू गुलाब उर्फ चंद्रकांत बरगंडे (वय-47,रा.औसे वस्ती,आमराई) यास अटक करून तपास अधिकारी पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी जयश्री काकडे यांच्यासमोर हजर केले असता आरोपीस पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. Chapat bus conductor in Vishnu Burgandela police custody in gang rape case
31 ऑक्टोबर 2021 रोजी आरोपी बरगंडे व मुख्य आरोपी गणेश कैलास नरळे यांनी संगनमत करून फिर्यादीस ठार मारण्याची व तिची बदनामी करण्याची धमकी देऊन पुणे येथे फिर्यादीची इच्छा नसताना देखील तिच्यावर आळीपाळीने सामूहिक दुष्कर्म केले,अशा आशयाची फिर्याद पीडितेने नरळे व बरगंडे यांच्याविरुद्ध दिली होती.
दरम्यान, सदर गुन्ह्यात फौजदार चावडी पोलिसांनी नरळे यास अटक केली होती. त्यानंतर त्याच्याविरुद्ध भादंवि कलम 417 अंतर्गत दोषारोपपत्र पाठवून आरोपी बरगंडे यास गुन्ह्यातून वगळण्याचा अहवाल न्यायालयात दाखल केला होता. तदनंतर फिर्यादीने सदर अहवालाविरुद्ध व प्रकरणाचा निष्पक्षपाती तपास व्हावा म्हणून उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. पीडितेच्या याचिकेची गंभीर दखल घेऊन उच्च न्यायालयाने या गुन्ह्याचा तपास वरिष्ठ केडर आयपीएस अधिकार्याने करावा, असे निर्देश दिले होते.
त्याप्रमाणे पोलीस महासंचालकांनी हा गुन्हा ग्रामीणचे पोलीस अधीक्षक सरदेशपांडे यांच्याकडे वर्ग केला होता. त्यानंतर त्यांनी बुधवारी आरोपी बरगंडे यास अटक करून न्यायालयासमोर हजर केले. तपास अधिकार्यांनी आरोपीला सात दिवस पोलीस कोठडी देण्याची मागणी केली. न्यायाधीशांनी सरकारी वकील, तपास अधिकारी व आरोपींचे वकील यांचा युक्तिवाद ऐकून आरोपीस पाच दिवस पोलीस कोठडी सुनावली.
यात मूळ फिर्यादीतर्फे अॅड.प्रशांत नवगिरे,अॅड.श्रीपाद देशक,सरकारतर्फे अॅड.आसावरी जोशी तर आरोपीतर्फे अॅड.शांतवीर महिंद्रकर यांनी काम पाहिले.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
● बस कंडक्टरला शिवीगाळ करीत श्रीमुखात लगावली
मोहोळ : बस कंडक्टरला शिवीगाळ करित गच्ची धरून मारहाण करीत दमदाटी केल्याने एकावर मोहोळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना आज गुरुवारी दुपारी तीन वाजणेच्या सुमारास नरखेड जवळ घडली
याबाबत मोहोळ पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार विष्णू जनार्धन काटे हे मोहोळ बार्शी बस घेऊन बार्शीकडे निघाले होते. एक इसम बस मध्ये पुढे मागे न सरकता एकाच जागेवर उभा होता. बस मध्ये चढलेल्या प्रवाशाना पुढे सरकण्यात अडथळा करित होता. त्यास कंडक्टरने पुढे जाण्यास वारंवार सांगूनही तो ऐकत नव्हता.
कंडक्टरने नरखेड येथे जास्त प्रवासी चिडल्याने गर्दी झाल्यामुळे जवळ जावुन पुढे सरका, असे सांगितले. असता त्याने अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करीत कंडक्टरला गच्चीला धरून चापट मारली. धक्काबुक्की करून तु पुढे चल, मालवंडीत चल तुला बघतोच, तु तिकीट कसे काढतो, ते बघतोच अशी धमकी दिली. त्यामुळे एस टी बस मोहोळ पोलिस ठाण्यात नेली. याबाबत अभय सुखदेव भडकवाड ( रा अनगर) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा तपास पोलिस हवालदार आदलिंगे हे करीत आहेत.