सोलापूर : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दोन मार्चपासून सोलापूर दौऱ्यावर येत आहेत, अशी माहिती शिवसेना सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख अनिल कोकीळ यांनी दिली. Shiv Samvad Abhiyan: Uddhav Thackeray on a visit to Solapur from March 2 शिव संवाद अभियानाच्या माध्यमातून उद्धव ठाकरे संपूर्ण जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांशी या दौऱ्यामध्ये संवाद साधणार आहेत.
गुरुवारी (दि. 2 मार्च ) सकाळी दहा वाजता पंढरपूर, सांगोला, माळशिरस येथील पदाधिकाऱ्यांची बैठक तनपुरे महाराज मठ पंढरपूर येथे होणार आहे. सकाळी पाच वाजता करमाळा येथे करमाळा आणि माढा येथील पदाधिकाऱ्यांची बैठक होणार आहे. तर 3 मार्च रोजी मोहोळ येथे सायंकाळी मोहोळ मंगळवेढा आणि बार्शी येथील पदाधिकाऱ्यांची बैठक होणार आहे.
तर तीन मार्च रोजी सायंकाळी पाच वाजता शिवसेना प्रणित महाराष्ट्र कामगार सेनालयाच्या कार्यालयात सोलापूर उत्तर आणि शहर मध्ये ची बैठक होणार आहे तसेच शनिवार दिनांक 4 मार्च रोजी सायंकाळी साडेसहा वाजता सोलापूर दक्षिण आणि अक्कलकोट विधानसभा मतदारसंघाची बैठक गोविंदश्री मंगल कार्यालय येथे होणार आहे.
दरम्यान आज उध्दव ठाकरेंनी केंद्र सरकारचे आभार मानले आहे. औरंगाबादचे नामांतर छत्रपती संभाजीनगर करण्यास केंद्राने मंजूरी दिली आहे. याआधी उस्मानाबादचे धाराशीव करण्यास केंद्राने मंजुरी दिली होती. आता याबाबत उध्दव ठाकरेंनी केंद्र सरकारचे आभार मानले. सरकारने माझ्या इतर कामांना स्थगिती दिली. पण माझ्या शेवटच्या मंत्रिमंडळ बैठकीत औरंगाबाद आणि उस्मानाबाद नामांतराचा निर्णय झाला होता. आता या निर्णयाला स्थगिती न देता मंजुरी दिल्याबद्दल सरकारचे आभार, असे ते म्हणाले.
● उद्धव ठाकरेंची 5 मार्चला सभा
पक्ष व चिन्ह गेल्यानंतर उद्धव ठाकरे सक्रीय झाले आहेत. त्यांनी 5 मार्चला खेडमध्ये सभा घेण्याची घोषणा केली आहे. उद्धव यांनी आज ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला व खेडमधील सभा विराट झाली पाहिजे, त्यासाठी तयारीला लागा, असे आदेश सर्व कार्यकर्त्यांना दिलेत. दरम्यान शिंदे गटाने शिवसेना पक्ष मिळाल्यानंतर नवीन कार्यकारिणी जाहीर केली आहे. यात सर्वाधिकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना देण्यात आले आहेत.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
》 ठाकरेंना मोठा धक्का, विश्वासू नेता अपात्र, डॉ. तानाजी सावंत यांच्या पुतण्याने केली होती तक्रार
उस्मानाबाद : ठाकरे गटाचे भूम परंडा मतदारसंघाचे माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांनी अपत्य कमी दाखवल्याचे कारण देत पुढील पाच वर्षे निवडणूक लढवण्यासाठी अपात्र ठरवण्याचा निर्णय लातूर विभागीय सहनिबंधक यांनी दिला आहे. ठाकरेंना हा मोठा धक्का मानला जात आहे.
उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती बँकेत ज्ञानेश्वर पाटील हे संचालक होते. तसेच प्राथमिक कृषी पतपुरवठा व विविध कार्यकारी सोसायटी मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढवली होती.
भूम-परंडा मतदारसंघाचे माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांनी २००१ नंतरचे अपत्य कमी दाखवल्याचे कारण देत पुढील ५ वर्षे निवडणूक लढवण्यासाठी अपात्र ठरवण्याचा निर्णय लातूर विभागीय सहनिबंधक यांनी दिला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंशी सुरू असलेल्या सत्तासंघर्षाच्या संकटात तसेच पक्षचिन्ह आणि पक्षनाव गमावलेल्या ठाकरेंना हा मोठा धक्का आहे.
उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती बँकेत ज्ञानेश्वर पाटील हे संचालक होते. प्राथमिक कृषी पतपुरवठा व विविध कार्यकारी सोसायटी मतदारसंघातून ज्ञानेश्वर पाटील यांनी निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत ते विजयी झाले होते. २१ फेब्रुवारी २०२१ रोजीच्या निवडणुकीत ज्ञानेश्वर पाटील यांनी अपत्य कमी दाखवल्याचे कारण देत आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांचे पुतणे उस्मानाबादचे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत यांनी तक्रार केली होती.
ज्ञानेश्वर पाटील यांच्या पहिल्या पत्नीचे निधन झाले असून त्यांच्यापासून पाटील यांना पहिले अपत्य ७ मार्च १९९३ रोजी झाले होते. दुसरे अपत्य १२ ऑगस्ट १९९५ रोजी झाले होते. यानंतर पाटील यांनी दुसरा विवाह केला. दुसऱ्या पत्नीपासून पहिले अपत्य १५ सप्टेंबर २००६ रोजी तर दुसरे अपत्य १५ ऑक्टोबर २००८ रोजी झाले.
या चारही अपत्यांच्या जन्माची नोंद बार्शी नगरपरिषदेत करण्यात आली होती. दरम्यान २००१ नंतर २ अपत्य असल्याने त्यांचे संचालक पद रद्द करण्याची मागणी धनंजय सावंत यांनी केली होती. याची सुनावणी लातूर विभागीय सहनिबंधक डॉ. ज्योती मेटे यांनी करताना पुढील ५ वर्षे जिल्हा बँकेची निवडणूक लढवता येणार नाही, असा निर्णय दिला आहे. ज्ञानेश्वर पाटील हे भूम परंडा मतदारसंघातून २ वेळेस आमदार होते.