मोहोळ : आम्ही वारंवार मागणी करून आमची घरकुल मंजूर होत नाही मात्र चार महिन्यापूर्वी स्थापन झालेल्या अनगर नगरपंचायतीला ४७० घरकूल मंजूर होतात हा भेदभाव कशासाठी, यासह आणि अन्य प्रश्नांचा जाब विचारण्यासाठी आज आसुड मोर्चा काढण्यात आला. Moholkar’s Gharkula canceled and Angar’s but sanctioned discrimination why? Solapur nationalist questions in Asood Morcha
मोहोळचे प्रथम नगराध्यक्ष रमेश बारसकर यांनी या मोर्चाचे आयोजन केले होते. रमेश बारसकर म्हणाले,
आमदार यशवंत माने यांनी मोहोळ नगरपरिषदेसाठी आलेला निधी ओरबाडून नेला. त्यामुळे ते कोणत्या तोंडाने भाषण करणार म्हणून त्यांनी मोहोळ येथे भाषण केले नाही, अशी खणखणीत टीका बारसकर यांनी केली. गवत्या मारुती चौक ते शिवाजी चौक असा नगरपरिषदसमोर हाआसूड मोर्चा काढण्यात आला.
बारसकर म्हणाले, तुम्ही तालुक्याचे नेते म्हणून घेता काम मात्र अनगरचीच कामे करता, १५ वर्षापासून तुमच्या हाती सत्ता असताना तुम्ही तालुक्याचा एकही प्रश्न सोडवू शकला नाही. त्यामुळे मी तालुक्याचा नेता नसून नगरचा नेता आहे, अशी एकदा घोषणा करा, अशी उपरोधिक टीका ही रमेश बारसकर यांनी केली.
मोहोळ शहराचे प्रश्न खऱ्या आर्थाने रमेश बारसकर सोडवित असल्याने त्यांच्या पाठीमागे असल्याचे पद्माकर आप्पा देशमुख यांनी सांगितले. तर माजी आमदार राजन पाटील यांनी फक्त अनगरचा विकास न करता मोहोळ शहराच्या विकासासाठी प्रयत्न करावेत, राष्ट्रवादी मोहोळचे माजी सरपंच आणि राजन पाटील यांचे एकेकाळचे कट्टर समर्थक ब्रम्हदेव भोसले यांनी ही माजी आमदार राजन पाटील यांच्यावर टीका केली.
यावेळी आपल्या मागण्याचे निवेदन मुख्याधिकारी डॉ. योगेश डोके यांना देण्यात आले. यावेळी सूत्रसंचालन प्रदेश प्रवक्ते शीलवंत क्षीरसागर यांनी केले. या मोर्चात अंगावर आसूड मारून घेणारा जथ्था या मोर्चात लक्ष वेधून घेत होता.
आप्पासाहेब देशमुख , ब्रम्हदेव भोसले, शेखर माने, अँड विनोद कांबळे , तनवीर शेख , संगीता पवार , वर्षा दुपारगुडे, ,अंजली मोहीते , शाहीर हावळे जितेंद्र आष्टुळ , रवी डोकडे ,अतुल क्षीरसागर , सावित्रा एकमल्ले, रमेश सनगर, सिद्धार्थ एकमल्ले आदी उपस्थित होते.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
》 रद्द घरकुलांना मुदवाढ मिळण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरपरिषदेसमोर आंदोलन
मोहोळ : पंतप्रधान आवास योजनेच्या मोहोळ नगर परिषद अंतर्गत रद्द झालेल्या ५७९ घरकूलांना मुदत वाढ मिळावी, या प्रमुख मागणीसाठी सोमवारी (ता. ६) मोहोळ नगर परिषदेसमोर राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनात रद्द झालेल्या घरकूलांना मुदत वाढ मिळालीच पाहिजे कोण म्हणत य देत नाही घेतल्या शिवाय रहात नाही, अशा प्रकारच्या घोषणा देत राष्ट्रवादी कॉंग्रेस मोहोळ शहराच्या वतीने रद्द झालेल्या घरकूलांना मुदत वाढ मिळण्यासाठी आंदोलन करण्यात आले.
यावेळेस प्रमोद बापू डोके, मुस्ताक शेख, संतोष खंदारे, गरड कुंदन, धोत्रे, यशोदा कांबळे, स्मिता कोकणे, कल्पना खंदारे, नागेश बिराजदार, राजेश सुतार, बापू आठवले, दाजी गावडे आदीसह पदाधिकारी सहभागी झाले होते.