विरवडे बु : पंचमहाभूत लोकोत्सव कनेरी मठ कोल्हापूर येथे देशी पशु प्रदर्शनात सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील विरवडे बु येथील सुनील बाळासाहेब पवार यांच्या गाईने प्रथम क्रमांक पटकवत एक लाख रुपयांचे बक्षीस पटकावले आहे. Solapur cow won first place in Kolhapur country cattle show, won a prize of one lakh Kanher Math
सिद्धगिरी महासंस्थान कनेरी मठ सिद्धगिरी कृषी विज्ञान केंद्र कनेरी व पशुसंवर्धन विभाग महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या पशुप्रदर्शनामध्ये सर्वोत्कृष्ट खिलार गाय म्हणून सुनील पवार यांच्या गाईला प्रथम क्रमांक मिळाला आहे. त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे , कणेरी मठ कोल्हापूर येथे पंचमहाभूत लोकोत्सव कार्यक्रम संपन्न झाला.
कार्यक्रमाचे उद्घाटन देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते करण्यात आले होते. सदर उत्सवात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट दिली होती. लोकोत्सव कार्यक्रमानिमित्त कणेरी मठ येथे भव्य असे देशी पशुप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
या प्रदर्शनामध्ये 2000 ते 2200 खिलार गुरे सहभागी झाले होते. या मध्ये एक वर्षाखालील गट एक वर्षाच्या पुढील गट, दोन दाती ,चार दाती सह दाती गट असे विविध गट तयार करण्यात आले होते. तर प्रत्येक गटासाठी तीन नंबर देण्यात आले होते. सर्व गटातून एक चंपियन क्रमांक काढण्यात आला व सर्वोत्कृष्ट गाय म्हणून विरवडे बु येथील सुनील पवार यांच्या गाईला देण्यात आला व एक लाख रूपये बक्षिस व ढाल देऊन सन्मान करण्यात आले. या अगोदर ही पवार यांच्या गाईला अनेक ठिकाण बक्षीसे मिळाली आहेत.
》 रद्द घरकुलांना मुदवाढ मिळण्यासाठी मोहोळ राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरपरिषदेसमोर आंदोलन
मोहोळ : पंतप्रधान आवास योजनेच्या मोहोळ नगर परिषद अंतर्गत रद्द झालेल्या ५७९ घरकूलांना मुदत वाढ मिळावी, या प्रमुख मागणीसाठी सोमवारी (ता. ६) मोहोळ नगर परिषदेसमोर राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनात रद्द झालेल्या घरकूलांना मुदत वाढ मिळालीच पाहिजे कोण म्हणत य देत नाही घेतल्या शिवाय रहात नाही, अशा प्रकारच्या घोषणा देत राष्ट्रवादी कॉंग्रेस मोहोळ शहराच्या वतीने रद्द झालेल्या घरकूलांना मुदत वाढ मिळण्यासाठी आंदोलन करण्यात आले.
यावेळेस प्रमोद बापू डोके, मुस्ताक शेख, संतोष खंदारे, गरड कुंदन, धोत्रे, यशोदा कांबळे, स्मिता कोकणे, कल्पना खंदारे, नागेश बिराजदार, राजेश सुतार, बापू आठवले, दाजी गावडे आदीसह पदाधिकारी सहभागी झाले होते.