Monday, October 2, 2023
Surajya Digital
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
  • ब्लॉग
  • अर्थाअर्थ
  • शिवार
  • Techनिक
No Result
View All Result
Surajya Digital
No Result
View All Result

आमिर खानने केले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक

Aamir Khan praised Deputy Chief Minister Devendra Fadnavis for Pani Foundation's agriculture revolution

Surajya Digital by Surajya Digital
March 13, 2023
in Hot News, महाराष्ट्र
0
आमिर खानने केले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक
0
SHARES
53
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

》 पानी फाऊंडेशनने शेती क्षेत्रात क्रांती आणली : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

पुणे : आमिर खान यांनी पानी फाऊंडेशनची कल्पना मांडली. इतकेच नव्हे तर पाणी फाऊंडेशनने सातत्य दाखवत जलसंधारण अणि शेतकऱ्यांना समर्थ करण्याचे कार्य केले आहे.  Aamir Khan praised Deputy Chief Minister Devendra Fadnavis for Pani Foundation’s agriculture revolution आधी वॉटर कपच्या माध्यमातून जलस्वयंपूर्ण गावे तयार केली. आता फार्मर कप च्या माध्यमातून विषमुक्त शेती आणि शेतकऱ्यांचे गट तयार करून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या समस्यांची सोडवणूक करण्याचे सुंदर मॉडेल तयार केले आहे. पानी फाऊंडेशनने शेती क्षेत्रात क्रांती आणली असल्याचे गाैराेवदगार राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले.

 

पानी फाऊंडेशनतर्फे बालेवाडीतील शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे ‘सत्यमेव जयते, फार्मर कप २०२२’ च्या पुरस्कार वितरणाचा शानदार साेहळा रविवारी पार पडला. त्या कार्यक्रमात फडणवीस बोलत होते. या कार्यक्रमाला पानी फाऊंडेशनचे संस्थापक आमीर खान, किरण राव, सत्यजित भटकळ, डॉ. अविनाश पोळ, पदमश्री पाेपटरावर पवार, कृषी आयुक्त सुनील चव्हाण, दिग्दर्शक आशुताेष गाेवारीकर, अभिनेते अतुल कुलकर्णी व इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी राज्याच्या सर्वच जिल्हयांतून हजाराे शेतकरी गट, शेतकरी महिला गट उपस्थित हाेते. या कार्यक्रमात पानी फाउंडेशनचा राज्यस्तरीय फार्मर कप २०२२ हा प्रथम पुरस्कार अमरावतीच्या परिवर्तन शेतकरी गटाला देण्यात आला.

 

उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, वातावरण बदलामुळे शेतीसमोर मोठी आव्हाने आहेत. अशा परिस्थितीत अवर्षण, अतिवृष्टीच्या फेऱ्यातून शेतकऱ्याला बाहेर काढण्यासाठी शाश्वत शेतीला पर्याय नाही आणि त्यासाठी विषमुक्त, नैसर्गिक शेतीकडे जावे लागेल. उत्पादन खर्च कमी करून जमिनीचा पोत सुधारावा लागेल. या सर्व गोष्टी आपण नैसर्गिक शेतीद्वारे करू शकतो. राज्यात कॅन्सरचा प्रादुर्भाव वाढला. म्हणून आपल्याला नैसर्गिक शेतीकडे यावे लागेल. यावेळी त्यांनी अर्थसंकल्पात शेतक-यांसाठी आणलेल्या याेजनांचाही उल्लेख केला.

 

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

 

आमिर खान म्हणाले, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पानी फाऊंडेशनच्या प्रवासात नेहमीच सहकार्य केले. त्यांनी सकारात्मक दृष्टिकोनातून दिलेल्या सहकार्यामुळे चांगले काम करता आले. शेतकऱ्यांनी गट तयार करून आपल्या क्षमता वाढवाव्यात. वैज्ञानिक आणि संशोधकांनी सांगितलेल्या गोष्टी आत्मसात करून पुढे जावे. येत्या काळात महाराष्ट्रात आणि भारतात हजारो कृषी उद्योजक तयार व्हावेत. शेतीला व्यवसायाच्यादृष्टीने पाहून नवतरुणांनी शेतीकडे वळावे, यातील समस्यांवर मात करून पुढे जावे. यावेळी सत्यजित भटकळ आणि पोळ यांनी पानी फाऊंडेशनच्या कार्याची सविस्तर माहिती दिली.

 

या कार्यक्रमाला भारतीय जैन संघटनेचे शांतीलाल मुथा, कृषी सचिव एकनाथ डवले. अभिनेते अतुल कुलकर्णी, सहयाद्री ॲग्राे फार्मचे विकास शिंदे, राहूरी कृषी विदयापीठाचे कुलगूरू डाॅ. प्रशांत पाटील, पंजाबराव कृषी विद्यपीठाचे  कुलगुरू डॉ . शरद गडाख आदी उपस्थित हाेते. यावेळी ध्वनीचित्रफीत आणि शाहीर अवधूत गांधी, नृत्य दिग्दर्शिका फुलवा खामकर यांच्या पथकाने सादर केलेल्या नृत्याविष्काराच्या माध्यमातून पानी फाऊंडेशनच्या कार्याची माहिती देण्यात आली. नीरज नारकर व स्पृहा जाेशी यांनी सुत्रसंचालन केले.

 

》 पानी फाउंडेशन आयाेजित राज्यस्तरीय फार्मर कप स्पधेतील विजेत्यांची नावे

प्रथम पुरस्कार- परिवर्तन शेतकरी गट, वाठाेडा, ता. वरुड , जि. अमरावती, रक्कम २५ लाख
द्वितीय पुरस्कार- चित्रा नक्षत्र महिला शेतकरी गट, गाेळेगाव, ता. खुलताबाद, जि. औरंगाबाद, रक्कम १५ लाख रूपये
संयुक्त तृतीय पुरस्कार – जय याेगेश्वर शेतकरी गट , डांगर बुद्रूक, ता. अंमळनेर, जळगाव , रक्कम ५ लाख रुपये
संयुक्त तृतीय पुरस्कार – उन्नती शेतकरी गट, वारंगा तर्फे नांदापूर , ता. कळमनुरी, जि. हिंगाेली, रक्कम ५ लाख रुपये

Tags: #AamirKhan #praised #DeputyChiefMinister #DevendraFadnavis #PaniFoundation's #agriculture #revolution#आमिरखान #उपमुख्यमंत्री #देवेंद्रफडणवीस #कौतुक #पानीफाऊंडेशन #शेती #क्रांती
Previous Post

मुलीच्या लग्नासाठी पूजा करावी लागेल, महिलेची केली फसवणूक

Next Post

भारतीय सिनेमाचा विजय; भारताला एकाच ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात दोन पुरस्कार

Surajya Digital

Surajya Digital

Next Post
भारतीय सिनेमाचा विजय; भारताला एकाच ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात दोन पुरस्कार

भारतीय सिनेमाचा विजय; भारताला एकाच ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात दोन पुरस्कार

Latest News

टोमॅटोच्या भावामुळे शेतकऱ्याचा सोलापुरात रास्ता रोको, शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ

टोमॅटोच्या भावामुळे शेतकऱ्याचा सोलापुरात रास्ता रोको, शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ

by Surajya Digital
October 1, 2023
0

...

बॉलीवूड कलाकार ईडीच्या रडारावर, ईडीची 39 ठिकाणी छापेमारी

बॉलीवूड कलाकार ईडीच्या रडारावर, ईडीची 39 ठिकाणी छापेमारी

by Surajya Digital
September 15, 2023
0

...

सोलापूरच्या दुहेरी पाईपलाईनचे जवळपास 9 किलोमीटरचे काम पूर्ण

सोलापूरच्या दुहेरी पाईपलाईनचे जवळपास 9 किलोमीटरचे काम पूर्ण

by Surajya Digital
September 14, 2023
0

...

मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण मागे, सरकारला एक महिना 10 दिवसांचा दिला वेळ

मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण मागे, सरकारला एक महिना 10 दिवसांचा दिला वेळ

by Surajya Digital
September 14, 2023
0

...

सीईओंच्या दालनात धुडगूस घालून तोडफोड; धनगर समाजाच्या चौघांना घेतले ताब्यात

सीईओंच्या दालनात धुडगूस घालून तोडफोड; धनगर समाजाच्या चौघांना घेतले ताब्यात

by Surajya Digital
September 12, 2023
0

...

जिल्हा परिषदेच्या तब्बल 20  कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा

जिल्हा परिषदेच्या तब्बल 20 कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा

by Surajya Digital
August 17, 2023
0

...

शाळेतील शिपायाने शेततळ्यात जीवन संपवले, सुनेसह तीन नातवंडांना आजोबांनी वाचवले

शाळेतील शिपायाने शेततळ्यात जीवन संपवले, सुनेसह तीन नातवंडांना आजोबांनी वाचवले

by Surajya Digital
August 10, 2023
0

...

ज्येष्ठ विचारवंत हरी नरके यांचे निधन

ज्येष्ठ विचारवंत हरी नरके यांचे निधन

by Surajya Digital
August 9, 2023
0

...

जयंत पाटील व अमित शाह यांच्यात भेट ? फडणवीसांनी दिले उत्तर

जयंत पाटील व अमित शाह यांच्यात भेट ? फडणवीसांनी दिले उत्तर

by Surajya Digital
August 6, 2023
0

...

टीका करणारे अजित पवारांकडून मोदी – शहांचे तोंडभरून कौतुक

टीका करणारे अजित पवारांकडून मोदी – शहांचे तोंडभरून कौतुक

by Surajya Digital
August 6, 2023
0

...

Currently Playing

About Us

SurajyaDigital
सुराज्य डिजिटल हा ब्रँड जगाच्या काना-कोपऱ्यातील सर्वंकष माहितीचा अचूक खजिना आपल्यापर्यंत पोहोंचविण्याचे काम करतोय. टाईम मीडिया हाऊसचा हा ब्रँड अल्पावधीतच मराठी वाचकांचा अत्यंत विश्वासार्ह ब्रँड बनला आहे.जगभरातील घटनांचा वेगवान आढावा घेत त्यावर भाष्य करण्याबरोबरच वाचकांच्या आवडीचे विषय, करमणूक यासारखे दृक्श्राव्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी सुराज्य डिजिटल कटीबद्ध आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा timemediahouse@gmail.com timemarathi@gmail.com

Categories

  • Hot News
  • Techनिक
  • Uncategorized
  • Videos
  • अर्थाअर्थ
  • खेळ
  • गुन्हेगारी
  • टॉलीवुड
  • देश – विदेश
  • ब्लॉग
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • शिवार
  • सोलापूर

वार्ता संग्रह

March 2023
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Feb   Apr »
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697