मुंबई : तमाम भारतीय सिनेचाहत्यांसाठी आज आनंदाचा दिवस आहे. फिल्मी दुनियेतील सर्वात मोठा पुरस्कार समजला जाणारा ऑस्कर आज भारतात आला आहे. RRR सिनेमातील नाटू नाटू गाण्याला आणि एका भारतीय लघुपटाला ऑस्कर मिळाला आहे. Triumph of Indian Cinema; Natu Natu Anand Mahindra won two awards for India at the same Oscars ceremony यानंतर नाटू नाटू या गाण्यावर डान्स करणारा आणि या चित्रपटातील प्रमुख अभिनेता राम चरणने एक पोस्ट करत हा भारतीय सिनेमाचा विजय असल्याचे म्हटले आहे. तसेच मी अजूनही स्वप्न पाहत असल्याचे रामने सांगितले.
भारताला एकाच ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात दोन पुरस्कार मिळाल्याचा हा इतिहास घडला. याआधी, भारताने एक ऑस्कर पुरस्कार भारताला मिळाला होता तो ए.आर रेहमान यांच्या द स्लम डॉग मिलेनियर या चित्रपटातील ‘जय हो’ या गाण्याला. त्यामुळे आता मिळालेल्या या दोन पुरस्कारांना एक वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे.
सध्या ९५ वा ऑस्कर पुरस्कार सोहळ्याला लॉस एंजेलिस मधील डॉल्बी थिएटरमध्ये सुरुवात झाली आहे. यामध्ये बेस्ट ओरिजनल स्कोअर पुरस्कार एस एस राजामौली यांच्या RRR मधील ‘नाटू नाटू’ या गाण्याला मिळाला आहे.
आरआरआर चित्रपटाने आज इतिहास रचला. या चित्रपटातील ‘नाटू नाटू’ या गाण्याला बेस्ट ओरिजनल गाण्याचा ऑस्कर पुरस्कार मिळाला. ‘RRR’ चित्रपटातील ‘नाटू नाटू’ या गाण्याला ऑस्कर मिळाल्यानंतर आनंद महिंद्रांनी ट्वीट करत विजेत्यांचे अभिनंदन केले. ऊर्जा, आशावाद, पार्टनरशिप, अशक्य विजय. ‘नाटु नाटु’ हे फक्त एक गाणे नाही : हा एक मिनी- एपिक मूव्ही आहे. सगळीकडे हे गाणे लोकांना थिरकायला भाग पाडत आहे. तसेच ऑस्करमध्येही लोक स्वतःला नाचण्यापासून रोखू शकली नाहीत. एसएस राजामौली, एमएम कीरावानी आणि चंद्रबोस यांना नमन, असे ते म्हणाले.
Congratulations… RRR Team winning 95th Academy OSCAR Award in Best original song category for Natu..Natu song. #indianmovies #oscarawards2023 #natunatusong #95academy pic.twitter.com/Myddsv5AuX
— RAJANIKANTA SWAIN (@RKswainRourkela) March 13, 2023
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
#NatuNatu from RRR wins #Oscar for Best original song . Proud moment for every Indian 🙏🇮🇳#Oscars2023 pic.twitter.com/omTQk2qOwP
— Kusum Sharma (@KusumSharma07) March 13, 2023
एस. एस. राजामौली यांच्या आरआरआर चित्रपटातील ‘नाटू नाटू’ गाण्याने गोल्डन ग्लोब पुरस्कारावरही मोहर उमटवली होती. ‘बाहुबली’नंतर दिग्दर्शक एस. एस. राजामौली यांचा ‘आरआरआर’ प्रेक्षकांसमोर आल्यानंतर या चित्रपटाने सर्व विक्रम मोडले. या चित्रपटाने देश-विदेशात बॉक्स ऑफिसवर मोठा गल्ला जमवला. स्वातंत्र्ययोद्ध्यांच्या काल्पनिक कथेवर हा सिनेमा बेतलेला आहे. नाटू नाटू गाणे गाणे ज्येष्ठ संगीत दिग्दर्शक एमएम कीरावानी यांनी संगीतबद्ध केले. कला भैरवी आणि राहुल सिपलीगुंज यांनी लिहिले आहे.
शेवटी तो दिवस आला ज्याची सर्वजण वाट पाहत होते. 95 व्या अकादमी पुरस्कार म्हणजेच ऑस्कर 2023 ला सुरुवात झाली आहे. लॉस एंजेलिसमध्ये होणाऱ्या या अवॉर्ड शोचा हॉलिवूडपासून ते बॉलिवूडपर्यंत अनेक सिनेतारे शॅम्पेन (रेड) कार्पेटवर शोभून दिसत आहेत. या सोहळ्यामध्ये स्टार्स त्यांच्या उत्कृष्ट आणि फॅशनेबल लूकमध्ये दिसत आहेत.
भारताला आणखी एक आनंदाची बातमी मिळाली ती म्हणजे द एलिफन्ट व्हिस्परर्स या शॉर्ट फिल्मसाठीही भारताला ऑस्कर पुरस्काराने गौरविण्यात आले. भारताच्या ‘द एलिफन्ट व्हिस्परर्स’ या लघुपटाने आज ऑस्कर पुरस्कार जिंकला आहे. त्यावर या लघुपटाच्या दिग्दर्शिका कार्तिकी गोंजावलेज यांनी आनंद व्यक्त केला आहे. ‘हा पुरस्कार माझ्या मातृभूमीला समर्पित आहे, मी आज येथे आपल्या आणि नैसर्गिक जगाच्या खास संबंधांवर बोलण्यासाठी उभी आहे, आदिवासी आणि प्राणी यांच्यावर प्रकाश टाकणाऱ्या आमच्या माहितीपटाला पुरस्कार दिल्याबद्दल धन्यवाद,’ असे कार्तिकी यांनी म्हटले.