● वीज पडून दोन शेतक-यांसह एका विद्यार्थिनीचा मृत्यू
मुंबई : राज्याच्या अनेक भागात आज गारपीट झाली आहे. त्यामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. मराठवाड्यातील बीड, परभणी, उस्मानाबाद या जिल्ह्यात गारपिटीमुळे रब्बीच्या पिकांचे मोठे नुकसान झालेले आहे. काही भागात गहू पूर्ण आडवा झाला आहे. Farmer students died due to heavy rain and hailstorm in many areas including Solapur, Dharashiv in the state या भागात लिंबाच्या आकाराच्या गारा पडल्या आहेत. सोलापूर जिल्ह्याच्या काही भागात पाऊस आणि गारपीट झाली. नाशिक जिल्ह्यातील शेतात तर जम्मू कश्मीर सारखी बर्फाची चादर पसरली होती.
परभणीत वीज कोसळून 2 शेतकऱ्यांचा मृत्यू परभणीतील गंगापूर तालुक्यात आज दुपारी वीजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. यात उखळी (बुद्रुक) येथे बाभळीच्या झाडावर वीज कोसळून झालेल्या दुर्घटनेत 2 शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. तर एका महिलेसह तीन जण जखमी झाले आहेत. त्यांना अंबाजोगाई येथे पुढील उपचारासाठी हलविण्यात आले आहे. बालासाहेब बाबुराव फड (वय 48 ), जयवंत उर्फ परशुराम गंगाधर नागरगोजे (वय 37) असे या मृत शेतकऱ्यांची नावे आहे.
राज्याच्या काही भागात विजांच्या कडकडाटासह पाऊस सुरु आहे. गडचिरोलीमधील चामोर्शी तालुक्यातील मालेरचक गावातील नववीच्या विद्यार्थिनीवर शाळेतून घरी जाताना अंगावर वीज कोसळली. स्विटी सोमनकर असे त्या मुलीचे नाव आहे. आसपासच्या लोकांना ही बाब लक्षात येताच त्यांनी तिला जवळच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र प्रकृती खालावल्याने तिला जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले. पण उपचारादम्यान तिची प्राणज्योत मालवली.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
राज्यभर अवकाळीने थैमान घातले आहे. हवामान विभागाने देखील याबाबत अंदाज वर्तवला होता. त्यानुसार गेल्या तीन दिवसांपासून गारपीटीसह वादळी पाऊस होत आहे. धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात आज दुपारच्या प्रहरी लिंबूच्या आकाराची गार पडल्याने शेतीचे प्रचंड नुकसान झाल्याचा अंदाज आहे. या गारपीट आणि वादळी पावसामुळे गहू, पपई, आंबा, विट भट्टी व्यावसायिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे.
गोंदियात हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार आज शनिवारी (18 मार्च) पहाटेपासूनच शहरासह जिल्ह्यातील अनेक भागांना वादळी पाऊस व गारपीटीने झोडपून काढले. या वादळामुळे देवरी तालुक्यातील मासुलकसा येथील वीज पडून भाऊबहिण गंभीर जखमी तर सडक अर्जुनी तालुक्यातील गोठणगाव येथे गुरांचा गोठा पडला. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात गारपीट झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे
नागपूर मधील पोफाळी परिसरात इतिहासात पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात गारांचा पाऊस नव्हे, तर गारपीट होऊन परिसरात फळबाग व पिकांना बसला.
त्यामुळे फळबाग, गहू, हरभरा आंबा यांचे मोठे नुकसान झाले आहे. या गारपीटीत पाऊस कमी तर गारांचा वर्षाव मोठ्या प्रमाणात होता. या गारांचा आकार लिंबाचा किंवा त्यापेक्षाही मोठा दिसून आला. त्यामुळे फक्त गारा पडण्याचा आवाज ऐकू येत होता काही ठिकाणी तर अक्षरशः गारांचा सडा दिसून आला. काश्मीरचे चित्र या गारपिटीमुळे परिसरात दिसून आले. आज दुपारी तीन वाजून दहा मिनिटांनी गारा पडण्यास सुरुवात झाली. जवळपास तासभर पाऊस झाला यात वीस मिनितें फक्त गारांचा वर्षाव होत होता. आजपर्यंत या भागात इतक्या मोठ्या आकाराच्या गारा कधीच पडल्या नाहीत असे अनेक वयोवृद्ध नागरिकांनी यावेळी सांगितले.