Wednesday, March 29, 2023
Surajya Digital
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
  • ब्लॉग
  • अर्थाअर्थ
  • शिवार
  • Techनिक
No Result
View All Result
Surajya Digital
No Result
View All Result

राज्यात सोलापूर, धाराशिवसह अनेक भागात जोरदार पाऊस अन् गारपीट

heavy rain and hailstorm in many areas including Solapur, Dharashiv in the state

Surajya Digital by Surajya Digital
March 18, 2023
in Hot News, महाराष्ट्र, शिवार, सोलापूर
0
राज्यात सोलापूर, धाराशिवसह अनेक भागात जोरदार पाऊस अन् गारपीट
0
SHARES
48
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

● वीज पडून दोन शेतक-यांसह एका विद्यार्थिनीचा मृत्यू

 

मुंबई : राज्याच्या अनेक भागात आज गारपीट झाली आहे. त्यामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. मराठवाड्यातील बीड, परभणी, उस्मानाबाद या जिल्ह्यात गारपिटीमुळे रब्बीच्या पिकांचे मोठे नुकसान झालेले आहे. काही भागात गहू पूर्ण आडवा झाला आहे.  Farmer students died due to heavy rain and hailstorm in many areas including Solapur, Dharashiv in the state या भागात लिंबाच्या आकाराच्या गारा पडल्या आहेत. सोलापूर जिल्ह्याच्या काही भागात पाऊस आणि गारपीट झाली. नाशिक जिल्ह्यातील शेतात तर जम्मू कश्मीर सारखी बर्फाची चादर पसरली होती.

 

परभणीत वीज कोसळून 2 शेतकऱ्यांचा मृत्यू परभणीतील गंगापूर तालुक्यात आज दुपारी वीजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. यात उखळी (बुद्रुक) येथे बाभळीच्या झाडावर वीज कोसळून झालेल्या दुर्घटनेत 2 शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. तर एका महिलेसह तीन जण जखमी झाले आहेत. त्यांना अंबाजोगाई येथे पुढील उपचारासाठी हलविण्यात आले आहे. बालासाहेब बाबुराव फड (वय 48 ), जयवंत उर्फ परशुराम गंगाधर नागरगोजे (वय 37) असे या मृत शेतकऱ्यांची नावे आहे.

 

राज्याच्या काही भागात विजांच्या कडकडाटासह पाऊस सुरु आहे. गडचिरोलीमधील चामोर्शी तालुक्यातील मालेरचक गावातील नववीच्या विद्यार्थिनीवर शाळेतून घरी जाताना अंगावर वीज कोसळली. स्विटी सोमनकर असे त्या मुलीचे नाव आहे. आसपासच्या लोकांना ही बाब लक्षात येताच त्यांनी तिला जवळच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र प्रकृती खालावल्याने तिला जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले. पण उपचारादम्यान तिची प्राणज्योत मालवली.

 

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

 

 

राज्यभर अवकाळीने थैमान घातले आहे. हवामान विभागाने देखील याबाबत अंदाज वर्तवला होता. त्यानुसार गेल्या तीन दिवसांपासून गारपीटीसह वादळी पाऊस होत आहे. धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात आज दुपारच्या प्रहरी लिंबूच्या आकाराची गार पडल्याने शेतीचे प्रचंड नुकसान झाल्याचा अंदाज आहे. या गारपीट आणि वादळी पावसामुळे गहू, पपई, आंबा, विट भट्टी व्यावसायिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे.

 

गोंदियात हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार आज शनिवारी (18 मार्च) पहाटेपासूनच शहरासह जिल्ह्यातील अनेक भागांना वादळी पाऊस व गारपीटीने झोडपून काढले. या वादळामुळे देवरी तालुक्यातील मासुलकसा येथील वीज पडून भाऊबहिण गंभीर जखमी तर सडक अर्जुनी तालुक्यातील गोठणगाव येथे गुरांचा गोठा पडला. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात गारपीट झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे

नागपूर मधील पोफाळी परिसरात इतिहासात पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात गारांचा पाऊस नव्हे, तर गारपीट होऊन परिसरात फळबाग व पिकांना बसला.

 

त्यामुळे फळबाग, गहू, हरभरा आंबा यांचे मोठे नुकसान झाले आहे. या गारपीटीत पाऊस कमी तर गारांचा वर्षाव मोठ्या प्रमाणात होता. या गारांचा आकार लिंबाचा किंवा त्यापेक्षाही मोठा दिसून आला. त्यामुळे फक्त गारा पडण्याचा आवाज ऐकू येत होता काही ठिकाणी तर अक्षरशः गारांचा सडा दिसून आला. काश्मीरचे चित्र या गारपिटीमुळे परिसरात दिसून आले. आज दुपारी तीन वाजून दहा मिनिटांनी गारा पडण्यास सुरुवात झाली. जवळपास तासभर पाऊस झाला यात वीस मिनितें फक्त गारांचा वर्षाव होत होता. आजपर्यंत या भागात इतक्या मोठ्या आकाराच्या गारा कधीच पडल्या नाहीत असे अनेक वयोवृद्ध नागरिकांनी यावेळी सांगितले.

 

 

Tags: #राज्य #सोलापूर #धाराशिव #अनेकभागात #जोरदार #गारपीट #पाऊस #शेतकरी #विद्यार्थी #मृत्यू #वीज
Previous Post

सोलापूरचे पालकमंत्री बदला… अन्यथा आझाद मैदानावर आंदोलन करणार

Next Post

पेन्शनचे टेन्शन, संपूर्ण राज्य आज टेन्शनमध्ये, सविस्तर विषय वाचून घ्या समजून

Surajya Digital

Surajya Digital

Next Post
पेन्शनचे टेन्शन, संपूर्ण राज्य आज टेन्शनमध्ये, सविस्तर विषय वाचून घ्या समजून

पेन्शनचे टेन्शन, संपूर्ण राज्य आज टेन्शनमध्ये, सविस्तर विषय वाचून घ्या समजून

वार्ता संग्रह

March 2023
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Feb    

ट्विटर पेज

Currently Playing

About Us

SurajyaDigital
सुराज्य डिजिटल हा ब्रँड जगाच्या काना-कोपऱ्यातील सर्वंकष माहितीचा अचूक खजिना आपल्यापर्यंत पोहोंचविण्याचे काम करतोय. टाईम मीडिया हाऊसचा हा ब्रँड अल्पावधीतच मराठी वाचकांचा अत्यंत विश्वासार्ह ब्रँड बनला आहे.जगभरातील घटनांचा वेगवान आढावा घेत त्यावर भाष्य करण्याबरोबरच वाचकांच्या आवडीचे विषय, करमणूक यासारखे दृक्श्राव्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी सुराज्य डिजिटल कटीबद्ध आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा timemediahouse@gmail.com timemarathi@gmail.com
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697