सोलापूर : अनोळखी वाहनाच्या धडकेने दुचाकीवरील तरुण ठार तर त्याचे चुलते गंभीर जखमी झाले. हा अपघात पुणे महामार्गावरील सावळेश्वर नजीक असलेल्या रिलायन्स पेट्रोल पंपासमोर सोमवारी (ता.20) दुपारच्या सुमारास घडला. Bike accident at Savleshwar;
Young nephew killed, cousin injured Solapur Sawant
गोपाळ महादेव सावंत (वय २४ रा. वाकाव ता. माढा) असे मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्याचे चुलते ज्ञानेश्वर तुकाराम सावंत (वय ३६ रा. वाकाव) हे जखमी झाले. गोपाळ सावंत आणि ज्ञानेश्वर सावंत हे दोघे सोमवारी दुपारी मोहोळ ते सोलापूर असा दुचाकीवरून प्रवास करीत होते. सावळेश्वर येथील रिलायन्स पेट्रोल पंपाजवळ चारच्या सुमारास अनोळखी वाहनाच्या धडकेने दोघेही जखमी झाले होते. त्यांना अॅम्बुलन्समधून त्वरित सोलापुरातील शासकीय रुग्णालयात दाखल केले असता गोपाळ सावंत हा उपचारापूर्वी मयत झाला.
मयत गोपाळ सावंत हा अविवाहित असून तो बार्शी येथील कॉलेजमध्ये शिकण्यास होता. त्याच्या पश्चात आई- वडील आणि एक भाऊ असा परिवार आहे. तो चुलत्यासोबत सोलापुरात चारचाकी वाहनाची नोंदणी करण्यासाठी येत होता. आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचे दोघे जवळचे नातेवाईक असल्याचे बोलले जात आहे. या अपघाताची प्राथमिक नोंद तालुका पोलिसात झाली आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
● काम करण्यास अडवणूक केल्याप्रकरणी सेवानिवृत्त फौजदारासह चौघांवर गुन्हा
सोलापूर : काम करण्यास अडवणूक केल्याप्रकरणी सेवानिवृत्त फौजदारासह चार जणांविरुद्ध जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. हि घटना दि.२० मार्च रोजी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास सीएनडी वेस्ट प्रोजेक्ट शेळगी येथे घडली.
याप्रकरणी राधाकृष्णन रामस्वामी अय्यर (वय-५३, व्यवसाय- चीप एक्झिक्युटिव्ह ऑफिसर, रा.गुलमोहर अपार्टमेंट वसंत विहार सोलापूर) यांनी जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. या फिर्यादीवरून भीमराव लक्ष्मण चव्हाण व त्यांचा मुलगा, पाटील वकील तसेच सेवानिवृत्त फौजदार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
फिर्यादी अय्यर हे सीएनडी वेस्ट प्रोजेक्ट शेळगी सोलापूर येथे जेसीबी काम करण्यास आणला असताना,वरील संशयित आरोपी यांनी तेथे येऊन येथे काम करायचे नाही, तू येथे कसा काम करतो ते बघतो म्हणून काम करत असताना अडवणूक केली आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार नाईकवाडी हे करीत आहेत.
● भाडे मारल्याचा राग मनात धरून फायटरने मारहाण; चौघांवर गुन्हा
सोलापूर : मार्केट यार्ड येथे गाडी भाडे मारल्याचा राग मनात धरून हाताने मारहाण करत फायटरने कपाळावर मारून जखमी केल्याप्रकरणी चार जणांविरुद्ध जेलरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
ही घटना दि.१९ मार्च रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या दरम्यान पासपोर्ट ऑफिस समोर मार्केट यार्ड येथे घडली. याप्रकरणी नागनाथ रामचंद्र दिंडोरे (वय-२९,रा. मुपो. करजगी, ता. अक्कलकोट) यांनी जेलरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीवरून सिद्धू स्वामी,मल्लू स्वामी (रा.बागवान नगर) यांच्यासह इतर दोन अनोळखी इसमानविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार पटेल हे करीत आहेत.