● विद्यार्थ्यांच्या आहारात आढळले प्लास्टिक तांदूळ
सोलापूर : सोलापूरच्या घेरडी गावात शालेय पोषण आहारातील तांदळात प्लास्टिकचे तांदूळ आढळून आल्याचे समोर आले आहे. Solapur. Malnourishing Plastic Rice Sangola Gherdi Found in School Nutrition या भेसळयुक्त आहारामुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या प्रकारामुळे गावात खळबळ उडाली. या गावच्या महिला सरपंच सुरेखा पुकळे यांनी या प्रकरणाला वाचा फोडली. दरम्यान, रेशनच्या दुकानातही तांदूळ भेसळ करून दिला जात असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.
विद्यार्थ्यांना शाळेची गोडी लागावी, त्यांचे आरोग्यही उत्तम राहवे, त्यांचे योग्यरीत्या शारीरिक पोषण व्हावे याकरिता राज्य शासनाने राज्यातील शाळांमध्ये शालेय पोषण आहार योजना सुरू केली. मुलांना शिकवता शिकवता त्यांना तांदूळ शिजवून सकस भात खायला घालायची जबाबदारीही शिक्षकांवर येऊन पडली. ही योजना सुरळीतपणे सुरू असतानाच सांगोला तालुक्यातील घेरडीच्या शाळेत चक्क प्लॅस्टिकचा तांदूळ आढळल्याने विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये खळबळ उडाली आहे. पोषण आहाराच्या नावाखाली कुपोषण करणारा प्लॅस्टिकचा तांदूळ विद्यार्थ्यांच्या पोटात घालवून स्वतःचे पोट भरणाऱ्या भेसळबहाद्दरांबद्दल पालकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
घेरडी (ता. सांगोला) येथील सरपंच सुरेखा यशवंत पुकळे यांनी या भेसळीचा भांडाफोड केला आहे. त्यांना रेशनच्या तांदळामध्ये पहिल्यांदा भेसळीचा हा प्रकार लक्षात आला.
तांदळासारखा हुबेहूब दिसणारा प्लॅस्टिकचा तांदूळ मिसळण्यात आल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी प्लॅस्टिकच्या तांदळाचे दाणे वेचून काढल्यानंतर मूळ तांदूळ आणि प्लॅस्टिकचा तांदूळ यातील फरक स्पष्टपणे जाणवला. त्यानंतर त्यांनी गावातील प्राथमिक शाळेतील तांदूळ तपासला; तेव्हा त्यातही प्लॅस्टिकचा तांदूळ मिसळण्यात आल्याचे निदर्शनास आले.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
● सरपंचांनी घेतली शिक्षकांची शाळा
भेसळीचा हा प्रकार लक्षात आल्यानंतर सरपंच सुरेख पुकळे यांनी गावातील प्राथमिक शाळेतील शिक्षकांची बैठक घेतली. असा प्लॅस्टिकमिश्रित तांदूळ विद्यार्थ्यांना देऊ नये, अशी सूचना त्यांनी शिक्षकांनी केली. संबंधित केंद्रप्रमुखांनी सोलापूर येथील अन्नसुरक्षा अधिकाऱ्यांच्या कानावर हा प्रकार घातला. तांदळाचे नमुने तपासणीसाठी पुण्याला पाठवणार असल्याचे त्यांनी केंद्रप्रमुखांना सांगितले.
○ साखळी शोधणे आवश्यक
शालेय पोषण आहारातील तांदळामध्ये दोषींना कठोर शिक्षा केली पाहिजे. प्लॅस्टिकची भेसळ होणे ही गोष्ट निंदनीय आहे. ही बाब गंभीर स्वरूपाची आहे. विद्यार्थ्यांच्या जिवाशी खेळण्याचा हा प्रकार अत्यंत धक्कादायक आहे. या प्रकाराची योग्य ती चौकशी करून, या मागची साखळी शोधून काढली पाहिजे.
• डॉ. बाबासाहेब देशमुख
(पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष )
○ अहवाल आल्यानंतर कारवाई :
शालेय पोषण आहारामध्ये प्लॅस्टिकचा तांदूळ सापडल्याचा प्रकार घडला आहे. याबाबतच्या तक्रारी पुरवठा विभागास प्राप्त झालेल्या आहेत. या प्रकरणात पुरवठा निरीक्षकांना तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. तांदूळ कोठून खरेदी केला? खरेदी केल्यानंतर त्याच्यामध्ये प्लॅस्टिकच्या तांदळाची भेसळी केली का? किंवा तांदूळ खरेदी करतानाच त्यात भेसळ झाली का ? यासंबंधीचा अहवाल पुरवठा विभागास दोन दिवसात प्राप्त होईल. त्यानंतर योग्य ती कारवाई केली जाईल.
– विवेक साळुंखे
(सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी)
○ नागरिकांच्या जिवाशी खेळणे अयोग्य
काही तालुक्यातून अशा तक्रारी प्राप्त झाल्यानंतर जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडे यासंबंधीची तक्रार केली आहे. असा प्रकार पुन्हा निदर्शनास आल्यास दुकानदारांनी संघटनेशी संपर्क साधावा. प्लॅस्टिकच्या तांदळाची भेसळ करून सामान्य नागरिकांच्या जिवाशी खेळणे योग्य नाही. याबाबत संघटना या प्रकरणाचा सखोल तपास करण्यासाठी पाठपुरावा करेल.
– नितीन पेंटर
(जिल्हा समन्वयक, रेशन दुकानदार संघटना)