सोलापूर : केसांची खरेदी विक्री करणाऱ्या व्यापाऱ्याला जीवे ठार मारण्याची धमकी देत त्याच्या पॅन्टच्या खिशातून दोन हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतल्याप्रकरणी दोघांवर फौजदार चावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. Solapur. Found cash near the trader, stole cash from trouser pocket by strangulation Faujdar Chawdi Police Lodge
याबाबत विकास मारुती धनगर (-वय-२७, रा.लातूर) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी विकास हे केसांची खरेदी विक्री करण्याचा व्यावसाय करतात. ते व्यावसायासाठी छत्रपती शिवाजी महाराज चौकातील एका लॉजमध्ये राहत होते. ते मंगळवारी (२८ मार्च ) पान खाण्यासाठी पान टपरीवर गेले असता तेथे थांबलेल्या दोन तरूणांनी धनगर यांच्याकडील पैसे पाहिले. त्यानंतर विकास हे आपल्या लॉजकडे जात असताना दोन अनोळखी इसम हे त्यांचा पिच्छा करत लॉज जवळ पोहचले.
त्यानंतर तेथे फिर्यादीला लॉजच्या खाली ओढत आणत पाच हजार रुपये दे, अशी मागणी करत पैसे नाही दिला तर जीवे ठार मारून टाकतो अशी धमकी दिली. शिवाय त्यांचा गळा पकडून त्यांच्या पॅन्टच्या खिशातील दोन हजार रुपये काढून घेतले. त्यानंतर रिक्षाने तेथून निघून गेले. या प्रकरणी दोन अज्ञात इसमांवर गुन्हा दाखल झाला आहे. घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गायकवाड हे करीत आहेत.
● टेक्सटाईल कारखान्यासमोर लावलेली दुचाकी पळवली
सोलापूर : टेक्सटाईल कारखान्यासमोर हॅन्डल लॉक करून लावलेली दुचाकी ( क्र.एमएच.१३. बी एक्स.७०३५) ही अज्ञात चोराने चोरली. याबाबत नरेश कृष्णहरी जिल्ला (वय-३७, रा.दत्त नगर) यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या फिर्यादीवरून अज्ञात चाेरावर गुन्हा दाखल झाला आहे. घटनेचा तपास पोलीस हवालदार पाटील करत आहेत.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
○ शहरातील दोन पानपट्टीतून अडीच हजारांचा गुटखा जप्त
सोलापूर : शहरातील पानपट्टीवर अन्न औषध प्रशासनाकडून कडक कारवाई करण्यात येत आहे. यात मरिआई चौक व भैय्या चौक येथील दोन पानपट्टी मधून अडीच हजारांचा गुटखा व सुगंधित सुपारी जप्त करण्यात आली आहे.
याबाबत अन्न औषध प्रशासनाचे रेणुका पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दीपक रमेश पाटील (रा. मरिआई चौक) याच्यावर फौजदार चावडी पोलिस ठाण्यात व प्रज्ञा सुरसे यांच्या फिर्यादीवरून चंदन विठ्ठलसिंग चव्हाण (रा.भैय्या चौक) याच्यावर सदर बाझार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.घटनेचा पुढील तपास पोलिस करत आहेत.
》 मुद्रा लोन देतो म्हणून पावणे तीन लाखाची फसवणूक, तिघा विरोधात गुन्हा दाखल
सोलापूर : वृत्तपत्रात आलेल्या मुद्रा लोनच्या जाहिरातीमधील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधून लोन संदर्भात चौकशी केली असता त्यांनी कर्ज देतो म्हणून २ लाख ७३ हजार रुपये वेळोवेळी ऑनलाईन भरायला लावून कर्ज न देता फसवणूक केल्याची तक्रार टेंभुर्णी पोलीसात दाखल झाली आहे.
मनिषा तानाजी लकडे (रा. टेंभुर्णी) यांनी याबाबत पोलीसात तक्रार दाखल केली आहे. लकडे यांनी जाहिरातीत आलेल्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधून मुद्रा कर्जाची चौकशी केली असता त्यांनी आधार व पॅनकार्ड आवश्यक असल्याच सांगत कर्जासाठी प्रोसिसींग व इतर फी पाठवण्यास सांगून वेळोवेळी २ लाख ७३ हजार रुपये भरुन घेतले. तसेच फिर्यादीचे वडील तानाजी लकडे यांच्या खात्यावरुन एक लाख, पांडुरंग तोडकर यांच्या खात्यावरुन २० हजार तसेच सतीश हांडे यांच्या फोन पे वरुन १८ हजार रुपये जमा करुन घेतल्याच फिर्यादीत म्हंटलयं. या प्रकरणी तिघा विरोधात गुन्हा नोंद झाला आहे.