पंढरपूर/ सोलापूर : चैत्री एकादशी निमित्त पंढरपुरात 2 लाख भाविक दाखल झाले असताना पंढरपुरात कोरोनाचे 4 रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे. आरोग्य यंत्रणा पुन्हा एकदा सतर्क झाली आहे. 4 Corona patients in Pandharpur at the mouth of Chaitri Vari, Solapur District Health Officer appeals to use masks
गेल्या काही दिवसापासून कोरोनाचे रूग्ण वाढत असून 1 एप्रिल 2023 च्या अहवालानुसार सोलापूर जिल्हा ग्रामीणमध्ये एकूण 7 पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले असून यातील 4 पंढरपूर तालुक्यातील आहेत. एक ग्रामीण भागात तर पंढरपूर शहरात तीन जणांची नोंद आहे. यातच पंढरपुरात सध्या चैत्री यात्रा भरली आहे.
सध्या ग्रामीणमधील एकूण 20 जणांवर उपचार सुरू आहेत. आजवर जिल्हा ग्रामीणमध्ये कोरोनाच्या 1 लाख 87 हजार 455 रूग्णांची नोंद असून 3 हजार 731 जणांनी या आजारात प्राण गमावले आहेत. कोरोनाकाळात सर्वाधिक रूग्ण पंढरपूर तालुक्यात 36 हजार 905 इतके नोंदले गेले होते.
● मास्कचा वापर करण्याचे आवाहन
पंढरपुरात सध्या 4 कोरोनाचे रुग्ण आहेत. त्यांच्यावर घरीच उपचार सुरू आहेत. भाविकांनी गर्दीत जाणे टाळावे तसेच मस्कचा वापर करावा असे आवाहन तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ बोधले यांनी केले आहे
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
》 कोरोना….संसर्ग रोखण्यासाठी बुस्टरडोस
○ प्रतिबंधात्मक उपाययोजनाची घ्या काळजी, मास्कचा करा नियमित वापर
सोलापूर : देशाच्या राजधानीसह महाराष्ट्रातही मुंबईसह काही शहरांमध्ये कोरोनाचे नवीन रुग्ण आढळून येत आहेत. त्या दृष्टीने राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने सर्व जिल्ह्यांना परिस्थिती हाताळण्यासाठी पूर्व उपायोजना करण्याचे निर्देश दिलेले आहेत.
सोलापूर जिल्ह्यात सध्या तरी ग्रामीण भागात तुरळक रुग्ण आढळून येत आहेत. परंतु कर्नाटक व आंध्र प्रदेशच्या सीमावरच्या धर्तीवर असल्याने संसर्गाची स्थिती लक्षात घेऊन जिल्हा परिषद आरोग्य विभाग ॲक्शन मोडवर आला आहे. कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी गावागावात शिबिरे घेऊन नागरिकांना बूस्टर डोस देण्याचे नियोजन केले जात आहे.
कोरोना रुग्णाची ग्रामीण भागामध्ये संख्या 20 आहे. तरीसुद्धा आरोग्य यंत्रणेमार्फत सतर्कता वाढली जात आहे. राज्य शासनाकडून जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेला याबाबत निर्देश मिळाले आहेत. त्यानुसार जिल्हा परिषदच्या आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सोनिया बागडे यांनी तालुका आरोग्य अधिकारी यांच्या ऑनलाईन बैठका घेऊन आवश्यक सतर्कता बाळगण्याची सूचना केली आहे.
योग्य ते उपाययोजना सुरू आहे. राज्यातील अन्य जिल्ह्यामध्ये कोरोनाचे नवीन रुग्ण आढळून येत आहेत. कोरोना संसर्ग सोलापूर जिल्ह्यात वाढू नये यासाठी संशयित रुग्णाची तपासणी करण्यावर भर दिला जाणार आहे. चाचणीचे प्रमाण वाढवले जाईल, लसीकरणाचे प्रमाण वाढवणे, कोरोना कक्ष अद्ययावत करणे, कोविड इमर्जन्सी कक्षात आवश्यक त्या सर्व सोयी सुविधा उपलब्ध करणे आदीसह रुग्णांना आवश्यक त्या दृष्टिकोनातून सेवा उपलब्ध केली जाईल.
सोलापूर जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधित लसीकरणाच्या पहिला डोसाचे प्रमाण 86% दुसऱ्या डोसाचे प्रमाण 76% आहे. बूस्टर डोस 1लक्ष 18 हजार जणांनी घेतला आहे.
जिल्ह्यात सध्या कोरोनाचे 20 बाधित रुग्ण आहेत .तरीसुद्धा अन्य शहरातील संसर्गाची स्थिती लक्षात घेऊन आरोग्य विभाग विभाग सतर्क आहे. तालुकानिहाय गावागावात बुस्टर रोज देण्यासाठी शिबिराचे नियोजन आहे. आवश्यकतेनुसार लस मागणी करण्यात येणार आहे. त्यानुसार कारवाई सुरू असल्याचे डॉ सोनिया बागडे ( जिल्हा आरोग्य अधिकारी) यांनी सांगितले.